सिंगापुरातील खाद्यसंस्कृती (भाग-पहिला)

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मला इथे सिंगापुरमधे येऊन तब्बल २० वर्ष पुर्ण झालीत. ३० वर्षाचा पुर्ण होता होता इथे आलो तो इथे इतके वर्ष होतील असे तेंव्हा जराही वाटले नव्हते. अगदी माझ्या पहिल्याच दिवशी मी भुकेजल्या पोटी अन्न शोधायला बाहेर पडलो आणि समोर दोन मोठी कावसे उलटी टांगलेली होती आणि त्यांच्या तोंडातून काळेकुट्ट लाल लाल भडक रक्त वाहत होते.

मी ते दृश्य बघून खंतावलो. त्यापुढे दोन पाऊले टाकली तर .. इथे माकडाच्या मेंदुचे सुप मिळेल अशी पाटी होती. त्याही पुढे गेलो तर सी-फुड ह्या नावाने परिचित असलेले अनेक जलचर प्राणी मला तिथे भेटले. मी जिथे उभा होता.. अर्थात गोल गोल फिरत होतो त्याला फुडकोर्ट असे नाव होते. सिगांपुरमधे आपल्या भारतातल्यासारखे हॉटेल्स, रेस्टॉरंट ह्यांच्यापेक्षा फुडकोर्ट च जास्त आहेत. आणि, सॅड टु से पण बहुतेक ठिकाणी खायला प्यायला सीफुडच जास्त प्रमाणात मिळते. अशा ह्या देशात तब्बल २० वर्ष राहूनही माझा शाकाहार भ्रष्ट झाला नाही ह्याला कारण म्हणजे मास चाखायची माझी कधीच च च हिम्मत झालेली नाही. माझं आणि मासाहारचं प्रचंड मोठ्ठ द्वंद्व आहे. जे कधीच मिटणार नाही! आमच्यात एक फार मोठी दरी होती, असेल आणि राहील.

माझ्या बालपणी मी आणि माझी बहिण आम्ही एकमेकांचे कान दोन्ही हाताचा डायगोनल करुन धरत .. च्याऊ म्याऊ घुगर्‍या खाऊ. पाळण्या खालच्या घुगर्‍या खाऊ असे काहीतरी म्हणत नंतर खूप जोरात हसायचो. तो खेळच तसा फार फनी होता. माझ्या वाट्याला घुगर्‍या (अख्ख्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजे घुगर्‍या) आल्या नाहीत पण च्याऊ म्याऊ जेवण रोज बघायला मिळतं आणि रोज मला प्रश्न (उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न) पडतो की ही लोक हे अन्न कसे खातात!!! म्हणजे मला कुणाच्याही संस्कृतीचा अवमान करायचा नाहीये पण तरीही जे काही चालत फिरत सरपटत ते सगळ चिनी लोकांच्या पोटात जातचं जातं! शाकाहारी अन्नाचा जराही गंध नसलेली रेस म्हणजे चिनी लोक. इथे जे मॉक मीट मिळते ते शाकाहारी असते पण ते बघून असे वाटते की हे मॉक मीट नसून खरेखुरे मास आहे. ह्या लोकांच्या पोटात मॉकमीट मधून भाज्या वगैरे जात असतील पण केवढी ही मानसिकता! (आणि त्यांना दोष देता देता मग मलाही माझे हसायला येते की ते अन्न शाकाहारी दिसत नाही म्हणून मी मॉक मीट ग्रहण करत नाही. शेवटी मग मी आणि ते सारखेच की!)

माझे अनेक मित्र आपण शाकाहारी आहोत म्हणून स्वतःला कमी लेखत लेखत शेवटी मासाहारी बनली. एक मुलगी मेघना तिचे नाव. एके दिवशी मला भेटली. चांगली शाकाहारी होती. आणि म्हणाली आज मी परागला मास खाऊनच दाखवते. खरच तिने डक राईस मागवला आणि तो पुर्ण खाऊन दाखवला. आपण मास खाल्ले म्हणून तिच्या चेहर्‍यावर एक विजयी भाव उमटला होता. आणि मी ह्या कोडयात सापडलो होतो की नक्की काय बाजी मारली हिने ही हिला मास खाल्ले म्हणून इतका आनंद होतो आहे.

सिंगापुरमधे चिनी, मलय, ईंडोनेशियन, जॅपनिज, भारतीय-मुस्लिम, भारतीय-मलय, भारतीय, कोरियन, फिलिपीन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण एकाच ठिकाणी मिळते. ह्यामधे एक भारतीय जेवण बाजूला काढले तर बाकी पद्धतीचे जेवण जवळपास सारखेच दिसते. निदान मला तरी ह्या सगळ्यात सी-फुड असते म्हणून ते सारखेच वाटते. खूप वर्षांपासून मी इथे ईंडोनेशियाचा एक पदार्थ ऐकतो आहे - "मी-गोरे" पण हा मीगोरे नक्की कसा दिसतो हे काही मला अजून कळलेले नाही. मी कित्येकदा फुडकोर्टात गेल्यानंतर कुठे अभारतीय शाकाहारी अन्न कुठे मिळते का म्हणून प्रयास केलेले आहेत पण ह्या लोकांना चिकन पावडर, कुठल्या तरी मासाचा अर्क कमीतकमी हे घातल्याशिवाय त्यांचे अन्न शिजत नाही. वर आपल्याला सांगतात की ह्यात मास नाही पण एक जरी घास तोंडात टाकला की लगेच कळते ह्यात काहीनाकाही घातलेले आहे. माझा भ्रमनिरास चिक्कार वेळी झालेला आहे. आता तर मी वाट्यालाच जाणे सोडले.

हो.. पण इथल्या खीरी माझ्या प्रचंड आवडीच्या आहेत. इथले चायनीज डीझर्ट मला फार प्रिय आहे. मुगाची खीर, रेडबीन्सची खीर, रताळ्याची खीर, नाना प्रकारचे नट्स घालून केलेली खीर. कमळाच्या बिया घालून केलेली खीर. ह्या खीरींमधे नारळाचे दुध घातलेले असते आणि ह्या फार गोड नसतात. शिवाय पौष्टिक असतात.

ह्या पहिल्या भागाचा शेवट गोड केला आहे .. आता बघुया दुसरा भाग लिहायला मुहुर्त कधी उगवतो Happy

बी

प्रकार: 

बी, छान लिहिले आहेस ! आणि शाकाहार सोडला नाहीस त्याचा खुप आनंद झाला.

मी पण तिथे जपूनच खात असे. शक्यतो तामिळ किंवा अन्य भारतीत स्टॉलवरचेच खात असे. तूझे पुढचे अनुभव लवकरच लिही.

बी छान लिहिले आहे. खिरीचे, मी-गोरे नाव ऐकुन तोंडाला पाणी सुटलय.

मी पण शाकाहारी असल्याने मला फुडकोर्ट वर जास्त choice नसायचा. तेव्हा फुडकोर्ट वरील चायनीज शाकाहारी स्टॉल वरुन मी-गोरे आणि चायनीज डेझर्ट हा मेनु ठरलेला असायचा.

बी, खूप अपेक्षेनी उघडला होता धागा पण वाचून भ्रमनिरास झाला. खूप एकांगी वर्णन झाल्यासारखे वाटले. तुम्ही खात नाही म्हणून सगळे चूक असा टोन वाटला तुमचा.

पुलेशु!

जिथे जे सहजगत्या मूबलक प्रमाणात आणि स्वस्तात मिळते ते खाल्ले जाते. त्यामूळे चिनी लोकांच्या खाण्याला नावे ठेवू नका. कोणाच्याच खाण्याला नावे ठेवू नयेत. ज्याला जे हवे ते तो/ती खाईलच. Happy

बर सिंगापूरमधले शाहाकारी फूडकोर्टबद्दल लिहा. कधी आलो तर बरे पडेल. Happy

वर आपल्याला सांगतात की ह्यात मास नाही पण एक जरी घास तोंडात टाकला की लगेच कळते ह्यात काहीनाकाही घातलेले आहे. माझा भ्रमनिरास चिक्कार वेळी झालेला आहे. आता तर मी वाट्यालाच जाणे सोडले.
>>>>>>>>

बी, म्हणजे तुम्ही नकळत मांसाहार केला आहे का?

आपण शाकाहाराचा त्याग केला नाहीत, शाकाहाराशी आणि आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहिलात याचे नक्की कौतुक करेन. Happy

पण त्याचबरोबर जे शाकाहाराचे मांसाहारी झाले त्यांनीही परिस्थितीशी जुळवून घेतले असे म्हणता येईल.

अवांतर - अजब प्रेम की गजब कहाणी चित्रपट उगाचच आठवला.

सेनापती >>>++++१

तिकडे वेगळे शाहाकारी फूडकोर्ट नसते. एकाच फूडकोर्ट वर चायनीज , कोरीयन, जापनीस , भारतीत मुस्लीम ( फूडकोर्ट वर हलाल फुड असल्याने हे नाव पडले आहे), मलेशियन , चायनीज शाकाहारी स्टॉल असतात. ( चायनीज शाकाहारी फक्त ५०% फूडकोर्ट वर असते. बाकी सगळे opions ८०-९०% फूडकोर्ट वर available असतात ).

चायनीज शाकाहारी मध्ये कांदा , लसुण आणि दुधाचा वापर व्यर्ज आहे पण अंडी चालतात. त्यामुळे अंडे चालत नसेल तर ऑर्ड्रर करताना सांगावे.

आपल्याला ज्या स्टॉल वरुन जेवण घ्यायचे आहे तिथे रांग लाउन घ्यायचे. फूडकोर्ट मध्ये बेंच वर बसुन खाउन झाल्यावर तिथेच सोडुन जायचे असते. आपण निघुन गेल्यावर क्लिनर टेबल साफ करुन डिशचा कलर बघुन त्या स्टॉलवर परत पाठवतो.

बी, छान लिहिले आहे.
तुम्ही शाकाहारी आहात त्यामुळे तुम्हाला मांसाहाराची किळस येणे स्वाभाविकच आहे.तरीही पुढील लेखनात ,सेनापतींनी म्हटल्याप्रमाणे लोकांच्या खाण्याला नावे ठेवू नका.

बी, मीगोरे नाही, मी-गोरेंग म्हणजे फ्राइड नूडल्स. (मी-नूडल्स. गोरेंग-तळलेले, फ्राइड.)

सिंगापुरात शाकाहारी लोकांनाही लिटल इंडियाव्यतिरिक्त भरपूर पर्याय आहेत, हे मी स्वानुभवावरून सांगू शकते. लव्हिंग हट, होन्झेन कॅफेसारखे पूर्ण व्हीगन पर्याय तर आहेतच, पण अगदी फूडकोर्टातही 'नो फिश नो मीट नो एग नो पोर्क नो फिश पेस्ट' असा तपशीलवार मंत्र म्हटल्यावर कुठल्याही डिशचं पूर्ण शाकाहारी व्हर्जन मिळू शकतं. (अर्थात म्हणून व्हेजिटेरियन बाक-कुत्-ते नाही मिळणार. :फिदी:) विस्मा अट्रियातल्या फूडकोर्टातला हँडमेड नूडलवाला मी पूर्ण शाकाहारी नूडल्स मागितल्या तर आधी कढईपण विसळून घ्यायचा. Happy

मला तरी नाव वगैरे ठेवलेले वाटलेले नाही. ती सहज प्रतिक्रिया(हे लोकं कसे खातात?) आहे शाकाहरी लोकांची तरी रोजच्यासारखी. Proud

पण जोक्स अपार्ट, मी मासांहारी असले तरी, मला सिंगापूरला घरीच टँकात साप,कासव वगैरे ठेवून मग काढून घेवून नाश्त्याला काहितरी बनवतात पाहून जरा कसेतरी झालेले(साप सोलताना पाहिले असेल तर समजेल) पण मी काही बोलले नाही. प्रत्येकाची आवड आणि पद्धत असतेच. Happy

खरतर हे काहीच नाहिये. मी एक सो एक खतरनाक फिलिपिनो पदार्थ बघितलेत.
नाव नाही ठेवत आहे पण ते पदार्थ खतरनाक आहेत हे नक्की!!! Proud

बी, तुमचा लिंक्ड ईन प्रोफाईल तुमचं वय वेगळंच ( बरंच कमी ) दाखवतोय. आता मी ५० वर्षांचा झालोय हे दाखवायचं काय खूळ काढलंत Proud

बी, छान लिहिले आहेस. कुणाला नावे ठेवण्याचा हेतू जरी नसला तरी माझ्या बाबतीत तरी काहीसा असाच प्रकार झालाय. त्यातल्या त्यात 'काही' चायनीज अन फिलिपिनो डिशेश फारच किळसवाण्या वाटतात. (कुणाला शंका असल्यास अधिक माहिती पुरवतो, फोटूसहीत :)) माझ्या फिलिपिनो मित्रांच्या रुममधला वास आजही मला अस्वस्थ करतो.
>>विस्मा अट्रियातल्या फूडकोर्टातला हँडमेड नूडलवाला मी पूर्ण शाकाहारी नूडल्स मागितल्या तर आधी कढईपण विसळून घ्यायचा. स्मित<< नशिबवान आहात! बर्‍याचदा शाकाहार म्हणजे काय हे त्यांना माहितीच नसावं अशी शंका येते, उदा. एखादी व्हेज डिश मागवावी अन त्या बह्हाद्दराने त्यातील मिट पीस काढून मग सर्व्ह करावी! Sad

नाव "खादाडी" दिले पण तुम्ही खीर शिवाय इतर काहीही खाल्ल्याचे लिहीले नाही. तेव्हा शीर्षक बदलणे योग्य ठरेल.

अजून जे आवडत नाहिये, त्यावरच लिहिलेय. जे आवडलेय ते पण लिही.
बाकी भारतिय जेवणाच्या नावाने इथे जी काही लुटालूट चालते, त्याला तोड नाही. आणि इतकी हॉटेलं, त्यातली ७०% बेक्कार....
त्यामानाने, फूडकोर्टात खावं लागलं तर मी एकदम एका पायावर तयार असते.
आपलं आवडतं फूड म्हणजे, कोरियन मासा, मिक्स्ड राईस (यात भात, भाज्या, साईड डीश असे आयटम्स मिळतात), बी हून, मी गोरेंग.
माझे कित्तेक शा. दोस्त पण या मिक्स राईस काउन्टर वर खातात, मांसाहारी गोष्टी सोडून.

तुम्ही उल्लेखलेलं "काहितरी" घातलेलं म्हणजे त्यांचा सॉस्/चटणी. त्यात सुक्या प्रॉन्सची पावडर असते. आणि ग्रीन लिफीमधे पण ती असते. ते सोडून बाकि झकास.

पुर्व ग्रह सोडून, एक खवैय्या म्हणून खाऊन बघा. (शाकाहारीच)

वर मी लिहिलय ते मिक्स्ड राईस कांउंटर बद्दल.
सिंगापोरात शाकाहारी कांउंटर वर संपुर्ण शाकाहारीच जेवण मिळते, मॉक पदार्थांमधे सुद्धा चिकन पावडर नसते. बी, नीट तपास करून मग लिहा. इथे फूड कन्ट्रोल खूप टाईट आहे, आणि एका दिवसाच्या वर अन्न विकत नाहित. बाय लॉ.

धन्यवाद. मजा आली अभिप्राय वाचताना. मी वर लिहिले आहे की मला कुणाच्याही संस्कृतीचा अवमान नाही करायचा तरी तुम्ही वर इतके लिहिले हे वाक्य न वाचता Happy असो.. Happy

ही मालिका पुढे नेणार आहे.

ऋन्मेष, हो नकळत एकदा चिकन गेल होत पोटात Sad

मी एकदम रिलेट करु शकले. मी इथे वर्षभरापुर्वी आले आणि आल्याआल्या अशीच घराजवळच्या फुडकोर्टात गेले ती आठवण आली :).

लेखातलि वर्णन अतिशयोक्तीची वाटतील कदाचीत पण अशी दृश्य इथे खुप कॉमन आहेत. पुर्व आशियातल कुकिंग खुप मिनिमलिस्ट असत म्हणजे आपल्यासारख मसाल्यात मुरवण वगैरे भानगडी कमी असतात त्यामुळे प्राणि कधीकधी अक्षरशः मुळ रुपात समोर येतात. जिगरबाजांनी 'बलुत' ही फिलिपिनो डिश गुगल करावी.

श्रध्दा, 'नो फिश नो मीट नो एग नो पोर्क नो फिश पेस्ट' ह्या मंत्रासाठी धन्यवाद :). आता प्रयोग करुन पाहिन.

'नो फिश नो मीट नो एग नो पोर्क नो फिश पेस्ट'>> हा मंत्र अनेकदा उच्चारुनही ही लोक काहीनाकाही तरी घालतातच घालतात Sad जसे पुर्वी इथे शाकाहारी मिळायचे तसे शाकाहारी हल्ली दिसतच नाही Sad पुर्वी छान ग्रेव्ही असायची, तळलेले शेंगदाणे मिळायचे, उकडलेल्या पालेभाज्या आणि फळभाज्या मिळायच्या. तसे दुकान आता हल्ली दिसतच नाही. आणि काय तो वास! नाकबंद होते माझे.

ऋन्मेऽऽष | 17 February, 2015 - 03:11 नवीन
वर आपल्याला सांगतात की ह्यात मास नाही पण एक जरी घास तोंडात टाकला की लगेच कळते ह्यात काहीनाकाही घातलेले आहे. माझा भ्रमनिरास चिक्कार वेळी झालेला आहे. आता तर मी वाट्यालाच जाणे सोडले.
>>>>>>>>

बी, म्हणजे तुम्ही नकळत मांसाहार केला आहे का? >> मला पन अगदी हाच विचार आला वाचल्या वाचल्या .. Happy

धनि , सेनापती >> सहमत तुमच्याशी ..

जिगरबाजांनी 'बलुत' ही फिलिपिनो डिश गुगल करावी.
>>>>>
पाहिले.
शिवल्या/शिंपले बघितल्याचा फील आला. म्हणजे त्या नजरेने बघितले तर काही वाटू नये.
पण एकदोन इमेजमध्ये छोटूसे बदक दिसत होते ते जरा भारतीय मांसाहारी मनाला कसेसेच वाटू शकते.

बी मला लेख पटला. तु तुझ्या दृष्टिकोनातून लिहिलास त्यामुळे इतरांना वाचताना तु तिथल्या खाद्य संस्कृती ला नावं ठेवतोयस असं वाटलं असेल, पण मला नाही वाटलं.
मांसाहार माझ्यासाठी सुद्धा कधी काळी, आश्चर्य, कुतूहल, किळस असं सर्व काही होता.

पण मला एक प्रश्न पडलाय >> तब्बल २० वर्ष पुर्ण झालीत. ३० वर्षाचा पुर्ण होता होता इथे आलो >> तु ५० वर्षाचा आहेस? Uhoh

माफ करा पण मला किळस वगैरे हा भाव नव्हता आणायचा माझ्या लेखात. मला फक्त एकच इथे व्यक्त करायचे आहे की ह्या लोकांनी शाकाहारी लोकांचे प्रश्न ओळखलेले नाहीत. म्हणजे बघा आता एकीकडे वेज नुडल्स दयायचे पण त्यातील मसाल्यांमधे मासाहारी पावडर घालतात. ते मला खपत नाही. खूप चीड निर्माण होते की शेवटी तुम्ही काहीनाकाही मास त्यात घालतातच ना! अजून एक म्हणजे अजिनोमोटो हा प्रकार.

@ बी - तुम्ही ५० वर्षाचे आहात? काहीतरी जाम गडबड आहे.
बर्‍याच लोकांनी हा प्रश्न विचारला आहे. तुम्ही आधी त्याचे उत्तर द्या.

बलुत म्हणजे बेडूक नाही हो.

बदकाचे अल्मोकाट अंड्यात तयार पिल्लु.

सिंगापूरम्धले फूड कोर्ट्स मला नाही आवडले. मी एकदम पट्टीची मासे, मटाण खाणारी असून ते वास नकोसे व्हायचे.

-----

बी, तुमचे वय एखाद्या नटीसारखे फ्लाँट का करता? गंमत वाटतेव्वाचून.

Pages