प्रक्रिया

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

अजब.. विचित्र असते
आतल्याआत तुटत जाण्याची प्रक्रिया...

चेहर्‍यावर पसरलेली असते
वाळवंटासारखी रुक्ष कोरडी शांतता
आतमधे मात्र सलसलत असतात
चरचरणार्‍या जखमा ओल्या!!!!

जितकी ती आपल्याला तोडत जाते
तितकीच ती जोडत जाते
आपल्यातील बळ.. सामर्थ्य कणकणाने!

ह्या सगळ्याची अनपेक्षित सवय होईपर्यंत
ही प्रक्रिया आयुष्याचा एक हिस्सा बनून जाते...
एखाद्या कडेकोट अभेद्य किल्ल्यासारखी
ती स्वतःला बंदीस्त करुन ..सामावून घेते...

हळूहळू आपल्या जगण्याच्या कलेवर
प्रतिकुल परिस्थितित मात करुन
प्राप्त केलेल्या बळावर.. सामर्थ्यावर
कोरडेपणावर आणि हृदयहीनतेवरही
आपले प्रेम होऊन जाते...

मग जीवनात प्रेम उरले असेल ..नसेल
पण तुम्ही जगता ह्या प्रेमामुळेच!!!!

बी

प्रकार: