३१सावी मॅरीएज अॅनीवर्सरी
रोज माझी करकरीत सकाळ
तुझ्यामुळे उद्ध्वस्त होते
आणि माझ्यामुळे तुझी सकाळ
उमलत.. उमलतच जाते!
तुझ्या पुढ्यात असते
करकरीत वर्तमानपत्रांची चळत
एका पाठोपाठ येणारे चहाचे कप
खमंग रुचकर उपहार
सुगंधित झुळका
आणि तुझ्या खास प्रिय
जगभरातील बातम्या!!!!
माझ्या वाट्याला मात्र
हाताला लागणारे चटके
कधी पायाच्या बोटावर आदळणारे
एखादे भांडे
कधी करकन चिरुन जाणारे बोट
फोडणीतले ठसके
अंगावर येणारी गरम वाफ
निवलेला चहा ..उरलेले चार घास
हळद मसाल्याचे डाग
काटकसर, आवराआवर, घासपुस
आणि तुझ्या बिनपगारी ऑर्डरी
खरेच! तुझे जग न्यारे आहे
जितक्या सहजपणे तू
वर्तमानपत्रे विखरुन ऐटीत
खुर्चीवर बसलेला असतो
तितकीच मीही विखुरलेली असते
कुणाच्या खिजगणतीतही नसते
वाट बघत असते कुणाच्या तरी
कोरड्या अभिप्रायाची!
बाकी तुझे महत्त्व बातम्यांना
राजकारण, क्रिडाजगत, सेन्सेक्स, गुंतवणूक
इथे भावनांना बाकी कोण मोजतं!?
तुझे जग दुरवर पसललेले आहे
मी भावनांची बंदीस्त आहे!!!
३१ वर्ष झालेच कसे हा एक यक्षप्रश्न आहे!!!
== इथे सिंगापुरमधे आमचा कविता वाचनाचा एक वर्ग आहे. ह्यावेळी 'बातम्या' ह्या विषयावर खरडायला सांगितले आहे. मला ही खरडपट्टी मनापासून आवडत नाही. ह्यावेळी मात्र उपस्थिती दाखवायची आहे म्हणून ही एक कविता केली
-बी
मस्तय कविता! हे जर 'खरडण'
मस्तय कविता!
हे जर 'खरडण' असेल तर ठरवुन समजुन उमाजुन लिहीलेल कस असेल
छान आहे. आवडली. (जळ्ळां मेला
छान आहे. आवडली. (जळ्ळां मेला बायकांचा जन्म !)
छान आहे.
छान आहे.
आवडली कविता. मुद्दाम केलेली
आवडली कविता.
मुद्दाम केलेली वाटत नाही इतकी सहज आहे.
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
मस्त आहे कविता.
मस्त आहे कविता.
धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप
धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप छान वाटल.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
मलाही आवडली.
मलाही आवडली.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
आवडेश!
आवडेश!
अतिशय सहज आणि विचारात पाडणारी
अतिशय सहज आणि विचारात पाडणारी कविता आहे बी.
छान लिहिली आहेस. आवडलीच.
हे जर 'खरडण' असेल तर ठरवुन
हे जर 'खरडण' असेल तर ठरवुन समजुन उमाजुन लिहीलेल कस असेल >> +१
आवडली.
कधी कधी आपल सामान्य असण फार
कधी कधी आपल सामान्य असण फार बर असत
आपण बातम्यात झळकत नाही
चारचौघात आपण चर्चेचा विषय बनत नाही
कुणी आपला फोटो काढत नाही
आपला विषय घेऊन कुणी चघळत नाही
कधी कधी आपल सामान्य असण फार बर असत
रात्री अपरात्री घरी परतलेल कुणी बघत नाही,
लडखळत दारु प्यायलो तर कुणी विचारत नाही
कमी कपडे खालून रस्त्यावर उतरलो ह्याची कुणी दखल घेत नाही
कुणाच्या सोबत स्वैर झालो ह्याचीही कुणी बातमी करत नाही
छान आहे खुप कविता.
छान आहे खुप कविता.
आवडली हं कविता!
आवडली हं कविता!
वरती लिहिलेली कविता आणि
वरती लिहिलेली कविता आणि प्रतिसादात लिहिलेली दोन कडवी दोन्ही आवडलं, बी.
धन्यवाद अन्जू. छान वाटले तुझी
धन्यवाद अन्जू. छान वाटले तुझी प्रतिक्रिया वाचून.
कविता आवडली बी .. मस्त
कविता आवडली बी .. मस्त लिहिलीयं
आवडली.
आवडली.
छान आहे कविता ! आवडली !!
छान आहे कविता ! आवडली !!
आवडली
आवडली