निचरा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

निचरा
बरं असतं कधीकधी

जगाला तात्पुरता गुडबाय करणं,
हसून निरोप देणं,
परत येईल असं म्हणून
दीर्घकाळ वनवासासाठी कुठेतरी दडून बसणं!
आपल्या भटंकतीत आपली उत्तरे आपणचं शोधणं
आपल्या स्वैर मनाला कुठेही भरकटु न देणं.

खूप काही साचत जात घोळक्यात वावरताना
नकोसा होऊन जातो रोजचा अभिनय
ओठावर हसू आणि हृदयात किल्मीष बाळगताना
ओळखीच्या चेहर्‍यासमोर काहीतरी लपवताना
आणि लपवलेलं ताडलं हे पचवताना!!!

बर असतं कधीकधी ..नको ते रिक्त करुन
फिरुन परत .. नव्याने मैफलीत येताना!

-बी

प्रकार: 

छान.

Class!

आवडली कविता.
, परवा तुझी कॉपी करून ठेवलेली (अर्थातच तुझ्या परवानगीनेच!) आठवते तुला...गुलमोहराच्या पाकळ्यांची चव
चिंचेचा फुलांचा सांडलेला बहर
ही कविता अचानक समोर आली. मस्तच!

सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप आभार.

आशूडी, तुझी प्रतिक्रिया छान आहे म्हणजे ती ओळ जी तू सुचवलीस ती खरेचं तशी असायला हवी आहे. मी नंतर योग्य शब्द सुचलेत की तसा बदल करेन.