Luwan of Brida - सारंग महाजन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

सारंग महाजन हा माझ्या धाकट्या भावाचा मित्र. त्याच्या हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ रिंग्ज प्रेमामूळे आमचं बरं जमायचं. हॅपॉ सिरीजमधलं पुस्तक बाजारात आलं की याच्या हातात आणि नंतर एक-दोन दिवसात त्याच्याकडून माझ्या हातात यायचं. माझ्या लग्नाची इ पत्रिका याने मला बनवून दिली होती.

भावाबरोबर बीएससी करून नंतर एमबीए ( ??) झालेला हा पोरगा. नोकरीच्या भानगडीत न पडता याने वेब पेज डिझायनींग सुरु केलं. सारंग काय करतोय याचं उत्तर दर काही दिवसांनी बदलायचं. वेब पेज डिझायनींग /मेन्टेनंस चालू होतंच. सोबत जीम, फोटोग्राफी, भटकंती, वाचन, लिखाणही चालू होतं.
मध्येच त्याने एलोरा फेस्टिव्हलच्या दरम्यान कसलीतरी सीडी बनवली असं कळलं. मग तो सध्या पुस्तक लिहितोय असं समजलं. काही दिवसांनी तो पुस्तकासाठी प्रकाशक शोधतोय असं समजलं. मग मध्येच त्याने ट्रॅव्हल वेबसाइट सुरु केल्याचं कळालं. सारंगच्या पुस्तकाचं काय झालं रे असं मी मधून अधून भावाला विचारायचे. सध्या बंद आहे, काम करतोय असं उत्तर मिळायचं.

आणि अचानक ५-६ दिवसांपूर्वी आईचा फोन आला -"सारंगचं पुस्तक प्रकाशित झालंय. आणि मराठवाड्यातल्या, मराठी माध्यमात शिकलेल्या तरूणाने इंग्रजीत पुस्तक लिहिल्याबद्दल कौतूक करणारा लेख कुठल्याशा पेपरात आला म्हणून. पुस्तक परिक्षण पण आलंय. पॉप्युलरनी प्रकाशित केलंय पुस्तक." फेसबुकवर बघितलं तर त्याच्या पुस्तकाची लिंकपण त्याने पाठवली होती.

मी अजून पुस्तक वाचलं नाहीये. माझी कॉपी भावाकडे ठेवलिये आणि आम्ही भेटलो की मिळेल मला काही दिवसात. पण पुस्तक चांगलं लिहिलं असेल याची खात्री आहे. पूर्वी त्याच्या काही कथा ब्लॉगवर वाचल्या होत्या आणि त्या आवडल्या होत्या.

ही सारंगच्या पुस्तकाची वेबसाइट.
http://www.inkredia.com

प्रकार: 

मस्त ग अल्पना, त्याच्यातल्या लेखकाला प्रोत्साहन मिळून त्याची पुस्तक प्रकाशित होण्यापर्यंत झालेली प्रगती नक्कीच कौतुकास्पद. त्याच आणि त्याच्या पालकांच अभिनंदन आणि शुभेच्छा!

लुवान ऑफ ब्रिडा वाचलं. चांगलं आहे. (फार भावलं नाही.) जरा संथ वाटलं. पण तरीही पुढचा भागही वाचेन.

लॉऑरीं सारखंच प्रवासवर्णन आणि संघर्षांचं वर्णन आहे. पण काही काही नविन संकल्पना/व्यक्तीरेखा मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. भाषा सोपी आणि ओघवती आहे. दुवे योग्य जुळले आहेत. आता पुढच्या पुस्तकात काय होते ते पहावे.