ऑटो एक्स्पो २०१२

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

काल गाड्यांच्या कुंभ मेळ्याला भेट देवून आलो. ऑटो एक्स्पो बघण्याची ही माझी तिसरी वेळ. गेल्या दोनही वेळेस ऑटो एक्स्पो संपताना शेवटच्या काही दिवसात बघितला होता. यावेळी मात्र भावाने पहिल्या दोन दिवसातच बघा, नंतर गर्दी वाढेल असं सांगून ठेवलं होतं. पहिल्या दिवशी बरेचसे सेलिब्रटीज असणार म्हणून आम्ही दुसर्‍या दिवशी बघायचं ठरवलं होतं.

ऑटो एक्स्पोची चुणूक रस्त्यातल्या ट्रॅफिकनी दाखवलीच. आम्ही पोचलो पण नेमकं १ नं गेट ला. मग ८ नंबर गेटसाठी आख्ख्या प्रगती मैदानाला वळसा घालतानाच पार्किंग शोधायला सुरवात केली. बहूदा पार्किंग न मिळाल्याने ड्रायव्हर काकांना गाडी घेवून घरी पाठवावं लागणार असं वाटायला लागणारी परिस्थिती जवळच्या सगळ्या पार्किंग लॉटस मध्ये होती. मेट्रोच्या पार्किंगमध्ये कशीबशी जागा मिळाली आणि आम्ही रांगेत उभे राहिलो. कालचा दिवस खरंतर बिझिनेस ओनली दिवस होता. फक्त मिडिया आणि पासेस वाल्यांना एंट्री होती, पण अर्थातच भरपूर पासेस वाटले गेल्याने आत शिरण्यासाठी रांगा लागल्या होत्या.नेहेमीप्रमाणे गर्दी, गोंधळ. प्रगती मैदानाचा नकाशा जरी सगळीकडे लावलेला असला तरी कोणत्या हॉलमध्ये कोणत्या कंपनीच्या गाड्या आहेत ही माहिती कुठेच लिहिलेली नव्हती. रस्त्यात काही कंपनींच्या जाहिरातींमध्ये फक्त त्यांच्या हॉलचे नंबर लिहिले होते.

पुर्वानुभवामूळे आम्ही एक्स्पोच्या दिशेने चालायला सुरवात केली. पहिलाच हॉल मर्सिडिझचा. आहाहा!!बाहेर मर्सिडिझ स्टार ड्राइव्ह चा अनुभव घ्यायची संधी होती.

star drive.JPGstar drive G class.JPG

ही एएमजी

AMG.JPG

ही मला आवडलेली त्यांची ए क्लास कंसेप्ट कार.
a class.JPG
ए क्लास कंसेप्ट कार आतमधून.

a class interior.JPG

ही अजून एक -
M-sports car.JPG

मर्सिडिझनंतर शेव्हर्लेच्या स्टॉलवर. त्यांनी दोन कंसेप्ट कार्स लाँच केल्या आहेत.
एक एनव्ही
enV.JPG
ही इटूकली टु सीटर एलेक्ट्रिक कार ५०० किलोपेक्षापण कमी वजनाची आहे म्हणे. आमच्या पोराला खूपच आवडली.

आणि दुसरी स्टींगरे ही हायब्रीड कार
sting ray.JPGsting ray 2.JPG

याशिवाय शेव्हर्लेची नवी इलेक्ट्रिक कार वोल्ट, कॅमरो कन्वर्टेबल, स्पार्क विथ एलपीजी, क्रुज, कॅप्टिव्हा आणि टव्हेराचे नवे मॉडेल्सही होते.

camero.JPG

सगळ्यात जास्त आवडलेली गाडी म्हणजे शेव्हर्लेची व्हिंटेज कार. ५०च्या काळातली ही गाडी.
vintage1.JPGvintage2.JPG

(क्रमशः)

विषय: 
प्रकार: 

.

एक दोन प्रश्न - उत्तरे नाही दिलीत तरी चालेल.
किमती काय आहेत या गाड्यांच्या?
ऑटोमॅटिक की क्लच, गिअर वगैरे? पॉवर ब्रेक, पॉवर स्टीअरिंग वगैरे? लहान गावातल्या रस्त्यांसाठी फोर व्हील ड्राईव्ह?