ख्रिसमस एल्फ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीपण शाळेतून फॅन्सी ड्रेसची नोट आली होती. गेल्या वर्षीच्या अनुभवामूळे यावेळी मी स्वतःच जरा आधी काय काय बनवता येईल याची कल्पना घेतली होती. शाळेतली एक महत्वाची अट नाताळाच्या संदर्भातलीच वेशभुषा असावी अशी होती.

एल्फ, सँटा, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल असे काही पर्याय मुलाला दिले आणि नेटवर त्यांची चित्रं दाखवली तर त्याने आधी मला रावण बनायचंय असं सांगितलं. Uhoh मग सँटा आणि सर्वात शेवटी एल्फ बनूंगा असं उत्तर मिळालं. (वर्गात दरवर्षी बरेच सॅन्टाक्लॉज येत असतात म्हणून एल्फच बन हे मला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगावं लागलं. )

मग घरात साजेसे कपडे शोधले. थंडी असल्याने हिरवं स्वेटर, पिवळा लोकरी पायजमा हे आधी बाजूला ठेवलं. त्यावर घालायला डगला म्हणून माझा शेवाळी रंगाचा जुना टॉप सापडला. गळ्याजवळच्या लाल कॉलरीसाठी एक लाल कपडा घेवून गळ्यात घालायला झूल बनवली. सॅन्टाची टोपी आणून कागदाचे कान त्यावर स्टेपल केले. (नीरजेने खरंतर कापडी कान टोपीला शिव असं सांगितलं होतं, पण तितका खटाटोप करत बसले नाही). नेहेमीच्या शाळेच्या लाल शुजना वरुन लाल ग्लेझ कागद लावून टोकदार बनवलं.

DSCN0475.JPG

आणि मग आमचा एल्फ तयार झाला.

धन्यवाद.
गिटारचं आधी लक्षातच नाही आलं. आमचा एल्फ त्याची छोटी गिटार तर वाजवतोच पण बाबाची मोठी गिटार पण शिकायच्या प्रयत्नात आहे. Happy

झकास

एकद क्युट एल्फ, Happy
या ड्रेससाठी काय काय उद्योग केलेस तेपण लिहि की

छान!