लोणचं

'काकाक'डे

स्मित

बेत काय करावा यावर
विचार करणारी मी
आज 'काकाक'डे जेवायला जाऊ
असे हळुच सुचवणारा तु..

गुलमोहोर गल्लीतल्या त्या
५व्या वाड्यातल्या 'काकाक'डे
भाकरी अन पोळी कशी लुसलुशीत असते..

लोणचे, मुरंबा आणि चटणी डावी कडे
खमंग फोडणीची कोशिंबीर, पापड अनलिमीटेड...
चविष्ट भाजी अन वाफाळते वरण
वाटीत कधी असते गोड गोड शिकरण...

आपुलकीने सगळे आग्रह करतात
आणि पोटभर जेवल्यावर फक्कड विडाही देतात...

अहो... ऊठा... पान वाढलंय...

आज तुम्ही नुसता कढी-भातच खा..
'काकाक'डे उद्या पंचपक्वान्नांचा बेत आहे म्हणे
फोन करुन सांगितलय आमच्यासाठी जागा राखा... फिदीफिदी

सनड्राइड टोमॅटोंचं लोणचं

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाटीभर वाळके टोमॅटो. (कॅलिफोर्निया सनड्राइड टोमॅटोचे काप वापरले.)
मोठा चमचाभर मोहरीगर
१ चमचा तिखट
चवीप्रमाणे मीठ
मोहरीगराऐवजी (किंवा बरोबर) एक मोठा चमचा कैरी लोणच्याचा तयार मसाला.
वाटीभर किसलेला गूळ.
अर्धी (किंवा पाव) वाटी तेल
लहान चमचा मोहरी
एक लहान चमचा बडीशेप
हिंग

क्रमवार पाककृती: 

तेल कढवून घ्यावं. ह्यात मोहरी, बडीशेप तडतडवून हिंग घालावा.

एका भांड्यात टोमॅटोचे काप घेऊन त्यात तिखट, गूळ, मसाले, मीठ एकत्र करावं.

तेल कडकडीत गरम असतानाच टोमॅटॉच्या कापट्यांवर ओतून नीट कालवून घ्यावं.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसं
अधिक टिपा: 

हे टोमॅटो जरा चिवट आणि आंबट असतात. तेव्हा गूळ बर्र्‍यापैकी घालावा लागतो. गरम तेलामुळे (आणि वितळलेल्या गुळाच्या पाकामुळे) किंचित मऊ होतात.

ह्यात खारकांचे तुकडे आणि मनुका घातल्या तरी छान लागतील.

माहितीचा स्रोत: 
म्याच! इतक्या वाळक्या टमाट्यांचं काय करावं म्हणून केलेला नसता उद्योग!