गाजर १ मध्यम
लसूण २-३ पाकळ्या
तिखट आवडीनुसार
मीठ चवीप्रमाणे
लिंबाचा रस १ चमचा
तेल
मोहरी
हिंग
१) १ मध्यम गाजर साल काढून जाडसर किसून घ्यावे(मोठ्या भोकाच्या किसणीने)
२) गाजराच्या किसात २-३ लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. बारीक वाटले तरी चालेल. शक्यतो पाणी न घालता वाटावे पण अगदीच मिक्सर फिरत नसेल तर अगदी थोडे घालावे.
३) तयार चटणी बोलमधे काढून घेऊन वरून हिंग मोहरी ची चरचरीत फोडणी घालून हलवावे.
१) याच चटणीत थोडे दाण्याचे कूट घातले तरी छान खमंग होते.
२) फोडणीत हळद घालू नये नाहीतर चटणीचा रंग बदलतो.
३) पोळी, भाकरी, डोसे, पराठे, सँडविच कशाही बरोबर छान लागते.




