१ वाटी मैदा,
२ अंडी,
पावूण कप दूध
मीठ
ऑर्गॅनिक अर्थ बॅलेन्स्/बटर २ चमचे.
खास वर्षा साठी, 
पद्धत १)
सगळे मिक्सीत टाकून घुसळून घ्यायचे व पातळ असे पसरवायचे फ्लॅट तव्यावर. ह्याचा खास तवा असतो. माझ्याकडे ईलेक्ट्रीक पॅन आहे व ते क्रेप स्प्रेडर आहे; मस्त होतात. मला हा प्रकार खूप आवडतो.
पद्ध्त २)
मी मैदा खात नसल्याने गव्हाचे पीठ व ओटचे पीठ , दही, जरासेच तेल, मीठ घुसळून करते.
माझा एक अनुभव पॅरीसला लोकांना भारी बाबा वेड क्रेपचे. ऑफीसमध्ये पण हाच नाश्ता रोज सकाळी. ..मज्जा.
ह्याचे फीलिंग्स्च्या अगणित रेसीपी आहेत.
१)चीज + पालक + मश्रूम्स -
२) गोड मध्ये नुट्रेला + चॉकलेट सॉस
३)स्ट्रॉबेरीज + ब्लुबेरीज +सिन्नामन फिलींग्स
४) अॅपल +सिनामन फिलींग्स
५) पर्सिमन सिनामन फिलींग्स
६) ऑमलेट +चीज
७) मिक्स वेजी + चीज
८) चिकन्/मटण खिमा मिक्स
९) पोहे +गूळ + वेलची +काजू + बेदाणे + ओले खोबरे मिक्स (देसी ईस्टाईल. ) 
१०) बनाना + मेपल सीरप+ सिनामन +बेदाणे
११) पीच + लेमन बटर सॉस
१२) अवाकडो सॅलड वुईथ ब्लॅक ऑलीव्स फिलींग्ज
१३) पाईनॅपल + वीप क्रीम + किवी
१४)पीनट बटर सॉस +जेली
१५)ड्राय फ्रूटस + क्रीम चीज + पाहिजे ते फळं
सर्व फिलींग्ज सोप्या आहेत बनवायला. हव्याच असतील तरच लिहिते डिटेल मध्ये.




