'काकाक'डे

स्मित

बेत काय करावा यावर
विचार करणारी मी
आज 'काकाक'डे जेवायला जाऊ
असे हळुच सुचवणारा तु..

गुलमोहोर गल्लीतल्या त्या
५व्या वाड्यातल्या 'काकाक'डे
भाकरी अन पोळी कशी लुसलुशीत असते..

लोणचे, मुरंबा आणि चटणी डावी कडे
खमंग फोडणीची कोशिंबीर, पापड अनलिमीटेड...
चविष्ट भाजी अन वाफाळते वरण
वाटीत कधी असते गोड गोड शिकरण...

आपुलकीने सगळे आग्रह करतात
आणि पोटभर जेवल्यावर फक्कड विडाही देतात...

अहो... ऊठा... पान वाढलंय...

आज तुम्ही नुसता कढी-भातच खा..
'काकाक'डे उद्या पंचपक्वान्नांचा बेत आहे म्हणे
फोन करुन सांगितलय आमच्यासाठी जागा राखा... फिदीफिदी

.....................................................

Submit to kanokani.com

ही काकाक म्हणजे कडी आहे त्या सगळ्या काकाकवर हसून हसून गडबडा लोळण

हाहा

व्वा ...... 'काकाक' कडची संतुलित अहाराची मस्त थाळी ..... स्मित

ही सहीये हाहा

छान !!
[ 'काकाक' फक्त 'प्युअर व्हेज' थाळीच देतो हें मात्र कांहीसं खटकलं. डोळा मारा ]

लाजोजी कही पे निगाहें कही पे निशाना.. हां? फिदीफिदी

मस्त जमलिये पण पंगत.. स्मित

ह्म्म्म्म्म

"लाजो"वाब आहे फिदीफिदी

भारी ! ए मी पण येणार संध्याकाळी 'काकाक'डे ; मला कंटाळा आलाय स्वयंपाकाचा फिदीफिदी

लाजो, फक्कड जमलिये. एकदम चविष्ट! फिदीफिदी

हाहा

कळतात बरं कळतात टोमणे, लाजोबै!!!! फिदीफिदी

हं गुलमोहोराच्या दुसर्‍या फ्लॅट मधे गेल्या पेक्षा काका कडे जाण खुपच सोप आहे. लिप्ट ही २ र्‍या मजल्याचे वरचेच जास्त वापरतात ना.
मस्त !

जो हाहा मस्त जमलिये पंगत

साजरा करू आजचा डे
सगळे जाऊ 'काकाक' डे !

खो खो

धन्यवाद मंडळी स्मित

काकाची थाळी शाकाहारीच आहे भाऊ... स्मित

गुड वन लाजो. हाहा
परजीवी पानावरचे परजीवी विचार फिदीफिदी डोळा मारा

यम्मी.... स्मित

[ 'काकाक' फक्त 'प्युअर व्हेज' थाळीच देतो हें मात्र कांहीसं खटकलं. ] >> आता बाकी 'नॉन व्हेज' पदार्थाना जागा कुठे आहे ताटात (सॉरी, पानात..) स्मित

हाहा