काहीच्या काही कविता

ऑनलाइन

तुझं सांभाळुन बोलणं
मर्याद्शील वागणं
किति राग आला तरि
मुळिच नाहि तोडणं

तुझि प्रत्येक गोष्ट
मला भुलवत गेलि
अशि तुझि माझि
मैत्रि खास झालि

मग सुरु झाले
वाट बघायचे तास
ऑनलाइन नाहिस म्ह् णुन
डोक्याला त्रास

मग तुझा मेसेज

फुलपाखरू (बडबड गीत)

फुलपाखरू फुलपाखरू
पिवळं पिवळं धम्मक
कधी फुल कधी पाखरू
कशी करत गंम्मत

सगळ्यांना फसवून
खदाखदा हसतं
पंखांचे हात करुन
टाळ्या पिटत बसतं

इकडे तिकडे बागडून
खुप खुप थकलं
मधाच कोल्ड्रींक पित
फुलावर बसल

उडता उडता फुलपाखरू

कुणास ठाउक!

वासनेच्या गूढगर्भी
तुझ्या नजरेतले कमळ
जेव्हा उलट्या रंगात अवतरले
तेव्हा मी कूस पालटली
चादरीवरच्या सुरकुत्यांचं जाळं झालं
तुझ्या जलसमाधीची
अशी तयारी झाली.

तरी चादरीवरच्या लाटांमधे
एक कमळ उमलले
आणि
आणि

प्रश्न उत्तर

प्रश्न प्रश्न...
उत्तर उत्तर...
सखे अगं केवढीशी ती तू
अन् त्याहून केवढासा तो मी.

आभाळ निळे का उतरावे जळी
नी का फुलते कळी?
माझी गाडी इथेच अडली
अन् तू मात्र...

प्रश्न प्रश्न...
उत्तर उत्तर...
सखे अगं केवढीशी ती तू

गोरापान चांदोमामा (बालकविता)

का गं आई चांदोमामा
असतो गोरा गोरापान
शुभ्र ढगांच्या फेसात तो
आंघोळ करतो छान

उंच उंच ढगात
त्याचा बाथटब असतो
दिवसभर शुभ्र फेसात
आंघोळ करत बसतो

त्याची झाली आंघोळ की
ढग काळे काळे होतात
भराभर पाणी ओतुन
चांदण्या त्यांना धुतात

एक विडम्बन

दिवस आहेत गर्मिचे अन घरी पहा लाईट नाही
आज माझ्या पाडसाला झोप काही येत नाही
वारा घालून दुखले हात
घरी दूसर कोणी नही
ऐमेसेबी रुसली आज
बहेरही वारा नाही
मीट पापण्या डोळ्यांच्या
हाती माझ्या त्राण नाही

’येते हं’

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत

आज्जीचा बत्तासा.. (फक्त छोत्या पिल्लांसाठी)

आ़जी ने दिला बत्तासा वर आभाळात फेकला
आभाळातच अडकून त्याचा चांदोमामा झाला

वाटत रोज चोरुन बप्पा, माझा बत्तासा खातो
तरीच रोज चंद्र अस्सा छोटा छोटा होतो

हळुहळू करत त्याने एकदा सगळाच गटम केला

आई ताप आलाय....

मला जे दिसत
ते तुम्हाला पण दिसत का?
कळोखात न दिसणार भुत
तुम्हाला पण बघुन हसत का?

मी नाही घाबरत त्याला
तेच घाबरत मला
येवढी जर हिम्मत असेल
तर उजेडात ये म्हणाव त्याला

तुम्हाला माहित्ये का?

वर वर ढगात एक
लांब दाढीवाला असतो

लोच्या झाला रे...

पेरूच्या फ़ांदीवर बसुन देखील
पोपट उपाशी
सारे पेरू खाउन गेले
कावळे मघाशी

पोपट म्हणतो. . .

आह हा हा ! पेरूच खरा
पेरूच्या पानालादेखील काय स्वाद आहे
हे साले कावळे म्हणजे
जन्माची ब्याद आहेत !

कावळे म्हणतात. . .