कथा

' मुक्त '

http://www.maayboli.com/node/30444

माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे या आणि केवळ याच हेतुने ही लिंक इथे ठेवली आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)

लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.

एका प्रेमाची गोष्ट

एक डॉलर आणि सत्यांशी सेंट्स. बास ! त्यातले सुद्धा साठ सेंट्स नुसतीच एक एक पैशाची सुट्टी नाणी. कधी वाण्याशी, कधी भाजीवाल्याशी आणि कधी बेकरीत घासाघीस करुन त्यातला एक एक पैसा जमला होता. डेलाने ते पैसे तीन तीन वेळा मोजले. एक डॉलर आणि सत्याएंशी सेंट्स. क्रिसमस एक दिवसावर येऊन ठेपला होता. अतीव दु:खात डेलाने तिथल्या जुन्या जीर्ण सोफ्यावर झोकून देत हुंदक्यांना वाट करुन दिली. याखेरीज ती करु तरी काय शकत होती. आयुष्य हे असेच सुख दु:खानी विणलेले असते ह्याची टळटळीत शिकवणच तिला मिळत होती जणु. सुख थोडे आणि दु:ख भारी !

लक्ष्मी अन अवदसा

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.

शेवट सुचवा...

गणेशोत्सवाम्धे मी लिहिलेली ही अर्धवट कथा.

माझ्या डोक्यात असलेला शेवट मी इथे लिहिलेला आहे.
=========================================

अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.

संधीस्वप्न

संधीस्वप्न
लमाल, ११ जुन २०११
विषय: स्वप्न
आिशष महाबळ

[अमरेंद्र संगणकाबरोबर चेस खेळतो आहे तर युवराज नुकताच आपल्या संगणकासमोर स्थानापन्न झाला आहे].
अमरेंद्र: 'युवराज, चेसच्या कोड्यासारखी एक केस आहे. White Elephant Detective Agency ने घ्यावी का हाती'?
युवराज: 'कोड्यासारखी म्हणजे? सगळीच तर सोडवेपर्यंत कोडी असतात'.
अमरेंद्र: 'एका अर्थी मृत. खरे लोक गुंतलेले नाहीत. किंवा आहेत, पण डाव आधीच होऊन गेलेला आहे'.
युवराज: 'कोड्यात बोलु नकोस. निट काय ते सांगशील जरा'? [जरा उतावीळपणे युवराजने विचारले]

ती आणि तो..

त्याचं नदीशी नातं खूप जुनं. म्हणजे अगदी रोज नाही, तरी नियमितपणे तो इथे नदीकिनारी येऊन तासनतास रेंगाळायचा. आपली सुख दु:ख हक्कानी या नदीशी बोलायचा. धीरगंभीरपणे नदी सगळं पहायची ऐकुन घ्यायची. कधी एखाद्या खळाळत्या लाटेनी कोपरखळी मारुन त्याला हसवायची देखील. नदीची आठवण त्याला छळायची. खूप दिवसात नाही यायला मिळालं किनार्‍यावर की बेचैन व्हायचा तो.

Miss you.

लॅच उघडून विकी आत आला. बाहेरचा लोखंडी दरवाजा उघडा होता, म्हणजे अंकिता घरी आलेली होती. हे जाणवताच हळूहळू त्याचा पारा चढायला लागला.
अंकिता स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती. तो तिथे गेल्यावर तिनेही त्याच्याकडे बघितल्यासारखं केलं, पण बोलली काहीच नाही.
घरात एक कृत्रिम शांतता पसरली. एक दबलेली शांतता. कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकेल अशी शांतता.
आजकाल सर्रास अशी शांतता पसरायची. भडका कधी उडेल, ह्याची वाट पाहणारी अस्वस्थ शांतता...

सापशिडी

'अमरेन्द्रा, ही बातमी पाहिलीस का'?, सिरीअल तोंडात ढकलत संगणकावरील बातम्यांवर दररोजप्रमाणे नजर फिरवीत युवराजने विचारले.
'कोणती, ती माकडचेष्टांची'?, त्याला पुर्ण बोलु न देताच पटावरील सोंगट्यांवरुन नजर न काढता अमरेंद्र बोलला.
'तुला कसे कळले की मी त्याच बातमीबद्दल बोलतोय म्हणुन'?, युवराज आश्चर्यचकीत होऊन म्हणाला.
'आम्हाला डिटेक्टीव्ह मांजरेकर उगीचच म्हणतात का लोक'?
'तेही खरेच म्हणा, पण तरीही'?
'अरे, सोपे आहे. लक्ष वेधुन घेणारी तीच एक बातमी आहे आज'.

आता काय करावं? (एक जुनी (च) गोष्ट)

मायबोलीवरचं जुनं साहित्य पुन्हा इथं पोस्ट करायचं नाही असं ठरवलं होतं.
पण मधे एकदा शोधायचं म्हटलं तर इतका घाम गाळावा लागला.
स्वतःच्या शोधताना इतकी मारामारी तर इतरांच्या आवडलेल्या कथा शोधणं किती अवघड आहे ते कळलं.
कथाकथीचा घाट घालणार्‍याला सलाम...

तर ही मायबोलीवर मी लिहीलेली पहिली कथा.

वाड्याच्या दारातून पळत येताना बैठकीत पोहोचेपर्यंत तान्याला दम नव्हता. 'बाबासायब बाबासायब बाबासायब'

या हृदयीचे त्या हृदयी!

ही माझी तशी पहिलीच कथा. २००५ मधे लिहिलेली. माबो वर टाकली होती पण तेव्हाचे अर्काइव्हज नाहीयेत. आणि तेव्हानंतर आता काही बदलही केलेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
"केवढा फुललाय चेहरा! काय विशेष आज?"
"आज खूप आनंद झालाय.. मस्त वाटतंय.."
"काय झालं काय एवढं? नवर्यानं काही गिफ्ट आणलं वाटतं नवीन!!"
"केलात पचका!! लावलीत वाट!!‘
"का? नाही आणलं काही त्यानं? मग काय झालंय? का काही विशेष? काही खावंसं वाटतंय का? मला सांग हो, इथे तुझी आई नाही आणि सासूही नाही पण मी करीन हो सगळं!!"