कथा

सॉफ्टकथा - २ (जुन्या गुलमोहरावरून)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ऑनसाईटवरून आलेल्या एका अत्यंत दुर्बोध मेलला मी जीव तोडून री करत होते.
"आज कीबोर्डची स्ट्रेस टेस्ट चालू आहे वाटतं?" भान विसरून कीबोर्ड बडवत असल्यामुळे मी दचकले.
मागे संयुक्ता उदास चेहर्‍याने उभी होती. एकमेकींच्या चेहर्‍यावरचे हे असे भाव बघायची आम्हाला सवय आहेच.
"काय झालं आता?" तरी मी खर्‍या उत्सुकतेनं विचारलं. कारण भाव तेच असले तरी कारणं जनरली रंगतदार असतात.
"हे बघ." संयू हात हलवायचा प्रयत्न करत म्हणाली.
आता तिच्या हातातल्या निळ्या ट्रॅवल बॅगेकडे माझं लक्ष गेलं.
"कुठे निघालीस?" आता मी जरा घाबरले. इतकं ऑफिसातून परस्पर प्रवासाला जाण्यासारखं काय असेल? कुठले नातेवाईक वगैरे...

विषय: 
प्रकार: 

Black and White

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

'नील'... जॉन जवळ-जवळ धावतच नीलच्या अॉफिसमध्ये शिरणार तेवढ्यात त्याला लक्षात आलं की अॉफिसचा दरवाजा अोढून घेतलेला होता. दार उघडून जॉन आत शिरला आणि क्षणभर त्याला काही सुचेनासं झालं - इतकं की आपण नीलकडे का आलो ते सुद्धा तो विसरायच्या बेतात होता. समोरचं दृश्य पाहून त्याला हसावं की वैतागावं हेही कळेना... अॉफिसमधल्या मोठ्ठ्या मॉनिटर वॉलवर एरवी जेम्स वेब किंवा चंद्रा दुर्बिणीवरुन येणारं चित्र आणि जवळच भल्यामोठ्या व्हाईटबोर्डवर मोठ-मोठी समीकरणं यात हरवलेला नील हे नेहमीचं दृश्य.

विषय: 
प्रकार: 

सवेरे का सूरज तुम्हारे लिये है ....

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बाहेर किती मिट्ट काळोख पडलाय! जणू संध्याकाळ झालीसुद्धा! थंडीच्या दिवसात दिवस असतोही छोटा आणि हा आजच्यासारखा एखादा दिवस उगवतानाच बरोबर ढगाळ वातावरण घेऊन उगवतो. बातम्यांत त्या वेदरवाल्यानेही काही आशा दाखवली नाही एखादा क्षण तरी सूर्य दिसेल याची. 'As you can see on the radar map, we have a lot of cloud cover and it doesn't look like it is going anywhere any time soon. So today seems to be a typical, cold winter day. As the week progresses, weekend holds a very good chance for some good football weather.' सकाळी-सकाळी असं काही ऐकलं की दिवसातला निम्मा उत्साह संपतो तिथेच.

प्रकार: 

मैफल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

# 'माहेर' मासिकाच्या ऑक्टोबर २०११ अंकामधे पूर्वप्रकाशित.
# मायबोलीवर आयोजित केल्या गेलेल्या एका कथाबीज स्पर्धेतील मुद्यांवरून ही कथा बनवली होती. तेव्हा मर्यादित स्वरूपात लिहीलेली ही कथा नंतर विस्तारीत केली होती.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

"थोडा. थोऽऽडा कमी पडतोय बघ. जऽरा वर लागुदे.." हवेत चिमुट नाचवून, डोळे बारिक करत सुधीर म्हटला, "किंऽचित."

त्याच्या तिरक्या मानेकडे बघुन चंदू हसला. समजल्यागत मान हलवली आणि परत आकारात चालू झाला.

प्रकार: 

एक सॉफ्टकथा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

जुनीच गोष्ट.. इथं टाकतेय ते सगळं लिखाण एका ठिकाणी रहावं म्हणून. शोधायला आणि लिंक द्यायला सोपं जातं.

===================================================================

" बोला. "
न वळताही संयूचा चिंताक्रांत मूड लक्षात घेत मी विचारलं.
" काही नाही गं. चल ना कॅन्टीनला "
म्हणजे नक्कीच ताजा खबर.
" चल. " मी पिसी लॉक केला.
संयू माझी जवळची मैत्रीण. याच ऑफिसात फ्रेशर्सची सेम बॅच आणि पहिलं प्रोजेक्ट सुधा.
फक्त ती जावावाली आणि मी ऑरॅकल मधे. ट्रेनिंग़मधे फुल धमाल केली होतीच आणि पहिल्या प्रोजेक्टमधे पण.

प्रकार: 

माझा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

रोजच्या सारखी बरोबर सहा वाजता तिला जाग आली. डोळे उघडल्याबरोबर आपसूकच मान वळली. अंगावरचे पांघरुण फेकून तो वेडावाकडा पालथा झोपला होता. त्याची ही नेहमीची सवय. कधी कधी झोपेतच तिच्या गळ्यात हात पडत. हात सोडवायला गेले तर त्याची झोप चाळवे. ती मग टक्क छताकडे बघत विचारांच्या माळा गुंफत पडून राही, तो बाजूला होईतो.

प्रकार: 
शब्दखुणा: 

कविता महाजन अभिनंदन!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'भिन्न' सारखे नवीन काहीतरी पुस्तक वाचून मला ते पुस्तक विचार करायला प्रवृत्त करणारे वाटले. फक्त पुस्तक लिहिण हे एकवेळ सोप काम असेल पण जे लिहिल तस आयुष्य जगण हे फार अवघड काम आहे. 'भिन्न' वाचून कविता महाजनांविषयी मला फार आदर वाटायला लागला. नंतर फेसबुवकर त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांचे लेखन मला जादू सारखे संमोहित करुन टाकणारे वाटू लागले. त्यांचे शब्द आणि वाक्य अतिशय तरल असतात म्हणून पदोपदी सवड मिळाली की माझी गाडी त्यांच्या वॉलवर जाते. अलिकडे त्यांची 'कुहु' पाहिली. त्यांच्या 'कविता' त्यांचे नाव सार्थ करतात. आज वाचले...

विषय: 
प्रकार: 

' मुक्त '

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

http://www.maayboli.com/node/30444

माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे या आणि केवळ याच हेतुने ही लिंक इथे ठेवली आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)

लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.

प्रकार: 
शब्दखुणा: 

एका प्रेमाची गोष्ट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

एक डॉलर आणि सत्यांशी सेंट्स. बास! त्यातले सुद्धा साठ सेंट्स नुसतीच एक एक पैशाची सुट्टी नाणी. कधी वाण्याशी, कधी भाजीवाल्याशी आणि कधी बेकरीत घासाघीस करून त्यातला एक एक पैसा जमला होता. डेलाने ते पैसे तीन तीन वेळा मोजले. एक डॉलर आणि सत्त्याऐंशी सेंट्स. क्रिसमस एक दिवसावर येऊन ठेपला होता. अतीव दु:खात डेलाने तिथल्या जुन्या जीर्ण सोफ्यावर झोकून देत हुंदक्यांना वाट करून दिली. याखेरीज ती करू तरी काय शकत होती. आयुष्य हे असेच सुख दु:खानी विणलेले असते ह्याची टळटळीत शिकवणच तिला मिळत होती जणू. सुख थोडे आणि दु:ख भारी!

विषय: 
प्रकार: 

लक्ष्मी अन अवदसा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - कथा