नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान

नाते समुद्राशी (भाग ३)

हा लेख मुद्दाम माझ्या वडलांच्या शब्दामधे लिहित आहे. त्यानी सर्व मुद्दे इंग्रजीतून मला कळवले आहेत. मी भाषांतर करून आणि थोडा मालमसाला घालून लिहिलेले आहे. भावनांचा विचार करून काही ठिकाणी नावांचे उल्लेख केलेले नाहीत.
===============================================

ही घटना साधारण वर्षापूर्वीची. आमचं एक जहाज काही अंडर वॉटर रीपेअरसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ड्राय डॉकला गेले होते. म्हणजे जहाज पाण्यात लाँचिंग केलं तरी नंतर कधी कधी काही कामे पुन्हा करावी लागतात, त्यासाठी जहाज ओढून जमिनीवर आणावं लागतं. हा उलटा व्यायाम भयंकर डोकेदुखीचा असतो.

युवा महोत्सव

यंदाचा १७वा राष्ट्रीय युवा महोत्सव यंदा मंगलोरमधे १२ ते १६ जानेवारी साजरा करण्यात आला. भारतातील सर्व राज्याचे तसेच केंद्रशासित प्रदेशामधील विविध शालेय तसेच कॉलेजवयीन मुले या महोत्सवामधे सामील झालेली होती. लोक नृत्ये, लोकसंगीत तसेच शास्त्रीय नृत्य, गायन-वादन, एकांकिका स्पर्धा अशी विविध कार्यक्रमाची लयलूट होती. त्याशिवाय साहसी खेळ व प्रात्यक्षिके देखील होती. मात्र एकाच वेळी अनेक ठिकणी कार्यक्रम असल्याने सर्वत्र जाता आले नाही.. तरीपण मंगला स्टेडियम घरापासून अगदी जवळ असल्याने (म्हणजे बघा, भाषणे संपली, आता कार्यक्रम चालू होतोय, हे घरात ऐकू येतं इतक्या जवळ) तिथले सर्व कार्यक्रम बघता आले.

नाते समुद्राशी -भाग २

पप्पानी जेव्हा भारती जॉइन केली तेव्हा ती खूप लहान कंपनी होती. तेव्हा कंपनी टगच्याच ऑर्डर जास्त घ्यायची. भारतीला तेव्हा टगमास्टर म्हणत असत. तरीदेखील उत्कृष्ट कामामुळे कंपनीला मोठ्यामोठ्या ऑर्डरी मिळत गेल्या. या लेखामधे जहाजबांधणी यावर थोडेसे लिहिणार आहे. तांत्रिक बाबी कमीतकमी ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. त्यातही मी इंजीनीअर नसल्याने जर काही तांत्रिक चुका आढळल्या तर जरूर सांगा. स्मित

नाते समुद्राशी- भाग १.

काठावरचा समुद्र वेगळा आणि समुद्रामधला समुद्र वेगळा. समुद्राचा आणि माझा संबंध फार जुना. त्यातही ज्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून आहे अशा कुटुंबातली मी. माझे वडील जहाजबांधणी क्षेत्रामधले. त्यामुळे समुद्राचे विविध रंगरूप आणि नखरे बघायला-अनुभवायला मिळालेले. पप्पाकडचे काही किस्से तर अक्षरश: अफलतून आहेत. अशाच काही माझ्या आणि पप्पांच्या अनुभवाबद्दल हे माझे लेख.

मायबोलीवर नवीन

काय आहे आज मायबोलीवर नवीन?

===============================================

अ‍ॅडमिन, टाळं लावायला मी मदत करू का?

प्राचीन कोकण संग्रहालय

गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमीवर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलीना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे.

या संग्रहालयाच्या सुरूवातीलाच आपले स्वागत या मामाकडून केले जाते.

कोळिसरे-गणपतीपुळे-प्राचीन कोकण (भाग १)

रत्नागिरीच्या ट्रिपला गेलं की एकदा तरी गणपतीपुळे वगैरे फिरायची ट्रिप होतेच होते. पूर्वी कॉलेजचा अख्खा ग्रूप असे मिळून जायचो. आता एक गावात असेल तेव्हा दुसरा जगाच्या दुसर्‍या टोकाला. त्यामुळे गेल्या तीनचार वर्षात कुटुंबासोबतच फिरावं लागतय. त्यात कुटुंबसदस्य वाढत असल्याने बाईकऐवजी कारनेच फिरावे लागणे अरेरे

टक्कूराम

बीफोर:

From Drop Box

<आफ्टर

शेवट सुचवा...

गणेशोत्सवाम्धे मी लिहिलेली ही अर्धवट कथा.

माझ्या डोक्यात असलेला शेवट मी इथे लिहिलेला आहे.
=========================================

अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.