चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान

अन्नं वै प्राणा: (८) - पूर्वार्ध

ওগো, তুমি কোথা যাও কোন্‌ বিদেশে?
বারেক ভিড়াও তরী কূলেতে এসে।
যেয়ো যেথা যেতে চাও,
যারে খুশি তারে দাও—
শুধু তুমি নিয়ে যাও
ক্ষণিক হেসে
আমার সোনার ধান কূলেতে এসে॥ - সোনার তরী (রবীন্দ্রনাথ ঠাকুর)

Oh to what foreign land do you sail?
Come to the bank and moor your boat for a while.
Go where you want to, give where you care to,
But come to the bank a moment, show your smile -
Take away my golden paddy when you sail. - The Golden Boat (Rabindranath Tagore)

अन्नं वै प्राणा: (७)

मेरा काट कलेजा दिल्ली, ले गयी काट कलेजा दिल्ली
मेरी जान भी ले जा दिल्ली
ससुरी काट कलेजा दिल्ली
मुई दिल्ली ले गई...

poliralism.jpg

चित्र क्र. १

अन्नं वै प्राणा: (६)

शूरवीर पाय घट्ट रोवून उभे,
झाडंही त्यांच्याकडून उभं राहायला शिकली - अकबरनामा

untitled.JPG

अन्नं वै प्राणा: (५)

I am going to kill you, Rice Plate Reddy, and teach the whole world how to eat holy broccoli. Mind it. - Quick Gun Murugan

annamvai.jpg

रुपयाची नवी ओळख

भारतीय रुपयाला आता नवी ओळख मिळाली आहे. अमेरिकन डॉलर, ब्रिटिश पाउंड, युरो आणि जपानी येनप्रमाणे आता रुपयाला नवीन संकेतचिन्ह मिळालं आहे.

indian-rupee-symbol.jpg

भारत सरकारनं हे चिन्ह रेखाटण्यासाठी एक स्पर्धा घेतली होती, व आयआयटीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डी. उदय कुमार यांनी रेखाटलेलं संकेतचिन्ह आज केंद्र सरकारनं निवडलं. येत्या काही महिन्यांत हे चिन्ह आपल्या संगणकावर उमटू शकेल, व या चिन्हाचा सार्वत्रिक वापर सुरू होईल.

रुपयाला मिळालेल्या या नव्या ओळखीचं स्वागत!!!

हेमलकशाचे श्रमसंस्कार शिबिर

बाबा आमट्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि त्यातूनच आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ यां ठिकाणी प्रकल्प उभे राहिले. 'श्रम हि है श्रीराम हमारा' हा त्यांचा नारा होता. 'अपंग, कुष्ठरोगी जर असे आदर्श प्रकल्प उभारू शकतात, तर तुम्ही मागे का?', असा सवाल ते नेहमी तरुणांना करत. तरुणांनी श्रमाला महत्त्व द्यावं, घाम गाळावा, हा त्यांचा आग्रह असे. त्यातूनच बाबांनी सोमनाथला श्रमसंस्कार शिबिर सुरू केलं. स्वतः श्रम केल्याशिवाय कष्टकर्‍यांची दु:खं कळत नाहीत, श्रमाचं महत्त्वही पटत नाही, हे जाणून बाबांनी ही शिबिरं दरवर्षी घेतली जाऊ लागली. या शिबिराला दरवर्षी भारतभरातून लहानमोठी मंडळी हजेरी लावतात. श्रमदान करतात.

ब्रेल लिपीतली पुस्तकं

माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर ताईआत्या राहायच्या. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांतच नवर्‍यानं त्यांना माहेरी आणून सोडलं. त्यांचं माहेर तसं श्रीमंत. मोठा भाऊ डॉक्टर. पण ताईआत्या मात्र बंगल्याच्या आऊटहाउसात राहायच्या. ताईआत्या उत्तम कविता करत. संध्याकाळी आई ऑफिसातून घरी आली की ताईआत्या घरी येत. त्यांना सुचलेली कविता आई त्यांच्या वहीत त्यांना उतरवून देई. ताईआत्यांना लिहिता वाचता येत नसे. त्या अंध होत्या.

सचिनचं द्विशतक

आज सचिनने आंतरराष्ट्रिय एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवलं..
सचिनच्या विक्रमांच्या मांदियाळीत अजून एका विक्रमाची भर..

त्याला मानाचा मुजरा!!!

15_sachin_tendulkar_2.jpg

देवा, आमचा प्रणाम स्वीकार!!!

अन्नं वै प्राणा: (४)

Sit at dinner tables as long as you can, and converse to your hearts’ desire,
for these are the bonus times of your lives. (Annals of the Caliphs’ Kitchens)

jalebi_coll.jpg

चांद्रयानाला गवसलं चंद्रावर पाणी...

भारतानं गेल्या वर्षी अंतराळात सोडलेल्या चांद्रयानाला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शोध आहे. भविष्यात हाती घेण्यात येणार्‍या चांद्रमोहिमांना या शोधामुळे अतिशय वेगळी दिशा आता मिळणार आहे.

चांद्रयानावर असणार्‍या NASAच्या Moon Minerology Mapper (M3)नं मिळवलेल्या dataच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

चंद्रावरील मानवी वसाहत, अंतराळातील जीवसृष्टीचा शोध यांनाही आता वेग मिळू शकेल.