केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान

केरळ मधील काही प्रकाशचित्रे

ही काही प्रकाश चित्रे माझ्या केरळ भेटीतली (माझ्या फुटक्या फोटोग्राफीतून)

१) टी मुस्झीयम मधील एक सुंदरस फूल
180920101626_0.jpg

२) टेकाड्डी मधील एक कलती संध्याकाळ
200920101783.jpg

३) पेरीयार लेक. नभ उतरू आल मन झिम्माड झाल
200920101814.jpg

४) पून्हा पेरीयार लेक. नो कमेंटस

गजालीकर गटग २५/०९/१० (पुणे) वृत्तांत

(परतीच्या वाटेवर भावना, निलू ताई आणि जाये ह्यांच्या विनंती वजा हुकुमावरून २५/०९/२०१० रोजी पुणे येथे श्री रवळनाथाच्या कॄपेने पार पडलेल्या ग ट ग चा वॄत्तांत लिहीण्याचा हा किडूक-मिडूक प्रयत्न.)

मला वॄत्तांत लिहीयला जमत नाही पण देवाचे स्मरण करून आणि "व्रुत्तांत-वर्धक वटी" घेऊन लिहीण्यास प्रारंभ करत आहे.

केरळ मून्नार मधील हे काही दोस्त- ४

हा एकटा जीव सदाशिव

अफलातून ड्रेस सेन्स (अगदी फूलावर फुकपाखर बसल्या सारख वाटतय ना.)

ekata.jpg

केरळ मून्नार मधील काही मित्र-मैत्रीणी - ३

आणि हा एक ग्रूप फोटू

purples.jpg

केरळ मून्नार मधील हे काही दोस्त २

हे आणखी काही दोस्त

180920101626.jpg

केरळ मून्नार मधील हे काही दोस्त

माझ्या फुटकळ फोटू ग्राफी तून

180920101604.jpg

ekata.jpg

purples.jpg

180920101626.jpg

माझी हॉस्पीटल भरती

त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला.

कापूसकोंड्याची गोष्ट

आज मला शलाकाची प्रकर्षाने आठवण येतेय. आज जर ती माझ्याबरोबर असती तर कदाचित आम्ही आज सर्व एकत्र असतो. आम्ही म्हणजे मी, शलाका आणि आमच पिल्लू अक्षत. पण तिला खूप मोठ व्हायच होत.उंच उंच उडायच होत. माझ्या सारख्या 'सामान्य वकूबाच्या माणसाबरोबर'....

'मी सामान्य वकूबाचा माणूस' हे तीने मला कित्येकदा ऐकवल होत. आहेच मी सामान्य, नाहीये मला उडण्याची जीद्द. पण म्हणून मी जगायला, संसाराला नालायक होतो का? कदाचित हो. नाहीतर आज मी असा एकटा नसतो.
_________________________________________________

दुरितांचे तिमीर जावो

काल आमच्या कडे वीज गेली (वीज म्हणजे याना गुप्ता नव्हे) . गेली म्हणजे काय जायचीच होती. आलेली वीज जायचीच. ते लोड शेडींग का काय ते म्हणतात ना त्याचाच परिणाम. वेळ दिवेलागणीची होती हे मूद्दाम सांगायला नको. वीज गेल्यावर नेहेमी सारखाच पोरांचा गोंगाट , तरुणांचा चित्कार असे ध्वनी निघाले. घातलेले फाटके बनीयन काढून मी नेहेमी सारखा चाळीच्या पॅसेज मध्ये जाऊन उभा राहीलो.

" अहो निदान अंगात कपडे घाला" आमची सौ
" अग अंधारात कोण बघतय मला ? "
" तुम्हाला काही समजच नाही. आत्ता लगेच दिवे आले तर ? "
" अग आत्ताशी कुठे गेले आहेत. येतील सावकाशीने. घाई काय आहे "

चुकले का हो ?

(इलाही जमादारांच्या 'चुकले का हो ? ' ह्या अत्यंत सुंदर गझलेचे एक असुंदर विडंबन)

श्वसुराला, त्रास म्हणालो,
श्वसुराला, त्रास म्हणालो, चुकले का हो?

मेहुणीस, 'लै खास' म्हणालो, चुकले का हो?