गद्यलेखन

होळी विशेषांक २०१२ संबंधीचे निवेदन!

0

मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.

फक्त ग्रूप सभासदांसाठी

'लव्ह ऑन द रॉक्स' - पुस्तकपरीक्षण

0
Average: 10 (1 vote)

इंग्रजीतून सातत्याने लिहिणारे भारतीय लेखक म्हटले की दोन पिढ्यांमागे अगदीच एका हाताची बोटे पुरायची मोजायला. मुल्कराज आनंद, मनोहर माळगांवकर, आर के नारायण, झाले. फारतर खुशवंत सिंह आणि कमला मार्कंडेय.
ही यादी पूर्णतः स्मरणाधारित असल्याने एखादे ताकदीचे नाव सुटले असेल तर आधीच 'चुभूदेघे' म्हणतो.
आणि एखादे(च) पुस्तक लिहून प्रसिद्ध झालेले कुणी असतील तर ते माझ्या रडारवर नाहीत हेही नोंदून ठेवतो.

नाते समुद्राशी- भाग १.

काठावरचा समुद्र वेगळा आणि समुद्रामधला समुद्र वेगळा. समुद्राचा आणि माझा संबंध फार जुना. त्यातही ज्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून आहे अशा कुटुंबातली मी. माझे वडील जहाजबांधणी क्षेत्रामधले. त्यामुळे समुद्राचे विविध रंगरूप आणि नखरे बघायला-अनुभवायला मिळालेले. पप्पाकडचे काही किस्से तर अक्षरश: अफलतून आहेत. अशाच काही माझ्या आणि पप्पांच्या अनुभवाबद्दल हे माझे लेख.

'अंक'

लहानपणी कोणताही विषय आला तरी २०-२५ ओळी निबंध आपण ठोकूनच द्यायचो परीक्षेत. मध्यंतरी असेच एक पुस्तक वाचले. वेगवेगळ्या ८०-९० विषयांवर दीड-दोन पानांचे लेख होते. सहज वाटले आपणही प्रयत्न करावा अजून 'ते' स्कील आहे का स्मित. दिवाळीचा सुमार होता, दिवाळी अंकांची चर्चा जोरात होती, म्हणून तोच विषय घेतला.

'अंक'

गंगासागर

टाईप करण्यासाठी इथे धागा उघडला होता. तो ना आता मला डिलिट करता येत आहे ना तेंव्हा तो मला तिकडे हलवता आला. तो तसाच अप्रकाशीत पडुनच रहाणार होता तर त्याचा उपयोग करावा असे वाटले. आणि माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे हा पण एक हेतु आहेच. त्यासाठी ही लिंक इथे आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)

http://www.maayboli.com/node/30839

लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.

लमाण

0

श्रीराम लागू यांचे नाव हल्लीच मराठी संकेतस्थळावरील एका चर्चेत आले. तेही मी त्यांचे नास्तिकतेचे उदाहरण दिले म्हणून. नास्तिकतेची इतर अनेक उदाहरणे असताना मला लागूंचेच नाव सुचावे याचे कारण म्हणजे गेले काही दिवस मी वाचत असलेले 'लमाण' हे पुस्तक. हे पुस्तक मी अगदी प्रकाशित झाल्याझाल्या २००४-०५ च्या सुमारास पहिल्यांदा वाचले होते. लागूंची दरम्यान असलेली ओळख म्हणजे मराठी चित्रपटांत अप्रतिम अभिनय करणारा ( 'सामना', 'सिंहासन', 'पारध' ) आणि हिंदीत पाट्या टाकणारा ( 'हेराफेरी' (जुना) या चित्रपटातला त्यांचा वेड्याचे सोंग घेतलेला आणि अमिताभ बच्चन-विनोद खन्नाला अत्यंत नाटकीपणे 'क्यूं मिस्टर एम.ए.एल. एल.

मन्वंतरः एक दृश्यकथा

0

मन्वंतर ही ’जोशी की कांबळे’ हा चित्रपट ज्या कथेवरून घेतला आहे, तिची दृश्यकथा. कथानक तसं सरळसोट आहे. जातिव्यवस्थाग्रस्त भारतीय समाजात माणसाची आयडेंटिटी जातीमुळे कशी अधोरेखित केली जाते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीस तीच ओळख कशी चुकीची आहे हे लक्षात येतं तेव्हा कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. जस्टिस जोशींचा मुलगा लहानपणी पळवला जातो आणि अपघाताने तो एका कांबळे कुटुंबात वाढतो. बारा/चौदा(यात लेखकाने घोळ घातलाय) वर्षांनी जोशींना आपला मुलगा कुठे आहे हे कळते आणि ते मुलाला घरी घेऊन येतात.

' मुक्त '

http://www.maayboli.com/node/30444

माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे या आणि केवळ याच हेतुने ही लिंक इथे ठेवली आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)

लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.

अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले)

0

पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता. त्यावरचे वाक्य होते (COEP-All Men are Equal but Some are more equal). त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते. फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे. नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या "अ‍ॅनिमल फार्म " या पुस्तकातील "All animals are equal but some are more equal than others" या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले. त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते, आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो, तसे अर्धवट राहिले.