निश्चल

निश्चल

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सकाळचे साडेसहा वाजले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सूर्यनारायण नुकताच उगवला होता. खरंतर मला अजिबात उठायची इच्छा नव्हती. पण आता ड्युटीची वेळ झाली होती. सगळं आवरून मी रूमच्या बाहेर आले. हलकंसं धुकं उन्हाबरोबर लपंडाव खेळत होतं. त्यातच दवबिंदू हलकेच चमकत होते. दूरवरचा धबधबा मोत्यासारखा दिसत होता. माझ्या रूमबाहेरची दरी हिरवी शाल ओढून अजून साखरझोपेत होती. मी मात्र उठून कामाला लागले होते. अख्ख्या रीझॉर्टमधे इतक्या लवकर कुणीच उठले नसेल. इथे येणारे बहुतेक हनीमून कपल्सच. ते कशाला इतक्या पहाटे उठतील? मी आणि अभि जेव्हा गोव्याला गेलो होतो, तेव्हा काय केलं होतं? अभिच्या आठवणीसरशी अंगावर काटा आला.

प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - निश्चल