मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |
हे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का ? पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात?
ह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.
पण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा!!



