१/४ किलो ओली हळद, त्याच्या निम्मी आंबे हळद ( मिळाल्यास ), ४-५ हिरव्या मिरच्या, ८-९ लिंबू,
४ ईंच आल्याचा तुकडा, १ चमचा लोणच्याचा मसाला, १ चमचा तिखट, फोडणीचे साहित्य, ( हिंग, मोहरी
व २ चमचे तेल ) अंदाजे मीठ.
१/४ किलो ओली हळद आणावी. आंबे हळद पण कधी कधी बाजारात मिळते. ती पण अर्धा पाव आणावी.
दोन्ही स्वछ धूवुन एकतर त्याचे बारीक तुकडे करावेत किंवा किसुन घ्यावी. मी ओ. हळद किसुन घेतली.आंबे हळ्द मला मिळाली नाही. हात एकदम पिवळे पिवळे होतात. 
मग आले पण किसुन घ्यावे. ४ लिंबु कापुन त्याच्या बारीक बारीक फोडी कराव्यात. मिरच्या पण बार्रीक चिरुन घ्याव्यात. उरलेले ४-५ लिंबु घेऊन त्याचा रस घ्यावा. हे सगळे मिक्स करून त्यात १ चमचा लोणच्याचा मसाला घालावा. नसल्यास १ चमचा तिखट घालावे. व नंतर नेहमीसारखी फोडणी तयार करून ( हिंग, मोहरी ) घालुन गार झाल्यावर घालावी.
हे लोणचे काही दिवस मुरवत ठेवावे. मगच ते खुप मस्त लागते. वेगळ्या चवीचे असे हे लोणचे आहे.
दिसायला पण केशरी रंगाचे ,रंगीबेरंगी असे दिसते.


