मायबोली गणेशोत्सव २००८

मायबोली गणेशोत्सव २००८ स्पर्धा निकाल

10
Average: 10 (1 vote)

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातल्या स्पर्धांना भरघोस दाद तसेच प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार!

गणेशोत्सव २००८ - स्पर्धा मतदान

0

सर्व स्पर्धा संपल्या आहेत आणि आता मतदान. तुम्हाला कुठल्या प्रवेशिका आवडल्या ते खालील दुव्यावर जाउन कळवा. मतदानाची पद्धत दुव्याखाली दिली आहे.
मतदान २७ सप्टेंबर पर्यंत चालु राहील.

राजे

5.48
Average: 5.5 (25 votes)

RAAJE.jpg

मायबोली गणेशोत्सव २००८ : आभार !!

0

आनंद, उत्साह, धांदल, धावपळ, थट्टा मस्करी, स्पर्धांमधली चढाओढ आणि बरोबरच श्लोक, घोषणा, स्वरचित आरत्या, नैवेद्य, प्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळं घेऊन येणारा गणेशोत्सव बघता बघता संपून गेला आणि मागे राहिली एक वेगळीच हूरहूर.

आंबोली

0

जुलै महीन्यात आम्ही डिपार्टमेंटची वर्षा सहल आंबोली इथे नेली होती. अगोदर माळशेज ठरवीले होते, पण गाडि भाडे आणि १ दिवस मुक्कामासाठी प्रती व्यक्ती १२५० खर्च येणार होता. मुंबईच्या जवळ इतके पैसे भरुन जायला सगळ्यांच्या जीवावर आले.

गाजराचे पॅनकेक

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/३ कप गव्हाचे पीठ
१/३ कप सोयाबीनचे पीठ
१/३ कप ओटचे पीठ **
१ टेबलस्पून जवसाची पूड
१/३ कप किसलेले गाजर
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
२ टेबल्स्पून साखर
चिमुटभर मीठ
१-२ वेलदोड्याची पूड
१ कप पाणी

क्रमवार पाककृती: 

IMG_1273_0.jpg

कृती - एका भांड्यात जवसाची पूड आणि १ चमचा पाणी घेउन २-३ मिनीटे नीट फेटा. त्यात साखर, गाजर, वेलदोड्याची पूड, मीठ, घालून मिसळावे. त्यात सगळी पिठे घालून नीट मिसळावे. वरुन १ कप पाणी घालुन साधारण भज्याच्या पिठाइतपत पातळ होउ द्यावे. वरुन बेकिंग सोडा घालून चमच्याने भराभर फेटावे. मिश्रणाला थोडे बुडबुडे येतील. तवा तापवुन मोठ्या पळीने एक पळी पीठ तव्यावर घालावे. डोश्याला पीठ पसरतो तसे पसरु नये. वरील बाजुने कोरडे झाले की पॅनकेक उलटावा. असे ३-४ पॅनकेक झाले की त्याचा स्टॅक करुन त्यावर केळ, स्ट्रॉबेरी, वगैरे घालावे. त्यावर मेपल सिरप घालुन खावे. मेपल सिरप नसेल तर मध पण छान लागतो.

** मी इंस्टंट कुकिंग ओट्स मिक्सरमधे बारीक करुन पीठ करते किंवा नॉन फ्लेवर्ड इंस्टंट ओट्मील वापरते. ओट्स नसतील तर गव्हाचे पीठ वापरावे.

वाढणी/प्रमाण: 
साधारण ८-१० पॅनकेक होतात
अधिक टिपा: 

मध वापरला नाही तर ही पाककृती वेगन होते.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक + स्वतःचे प्रयोग.

केळ्याचे गोड आप्पे, शेवग्याचे कबाब - शेफ विष्णू मनोहर यांच्या पाककृती

8
Average: 8 (1 vote)

मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
---------------------------------------------------------------
. केळ्याचे गोड आप्पे

गणपतीला नैवेद्यासाठी हे आप्पे करता येतील.

लागणारा वेळ :
१० मिनिटे

पयलं नमन

0

"हाय गॅनी कसा आहेस रे? किती दिवसांनी दिसतोयस..." विशनं नेहमीच्या रुबाबदार स्टाईलमधे विश केलं.
"विश अरे किती तू स्वताःच्या व्यापात गुंतून गेलायस? मी जाताना बोल्लो नव्हतो का? चाल्लोय जरा म्हणून."

गणराज रंगी नाचतो

10
Average: 10 (1 vote)

गणपतीला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिष्ठाता मानलेले आहे. यातील एक कला म्हणजे नृत्य कला. श्री गजाननाच्या नृत्य निपुणतेचे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

सगुण रुपाची ठेव l महा लावण्य लाघव ll

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं...४

0

आनंद अन कांचन बॅगेज क्लेमपाशी पोचायच्या आधीच अस्मिता तिथे उभी होती. तिला पाहिल्याबरोबर कांचन जवळजवळ धावतच तिच्यापाशी पोचली होती.