दीड कप शेवया.
अर्धा कप बारिक रवा
२ कप दही
चणा डाळ (ऐच्छिक) १ लहान चमचा
उडीद डाळ -१ लहान चमचा
२-३ लाल मिरच्या
पाव वाटी नारळ -खवून.
मीठ,
साखर
एक लहान चमचा इनो फ्रूट सॉल्ट
कढिलिंबाची ७-८ पानं
चिमुटभर हिंग
मोहरी
* किंचित तेलात किंवा तुपात शेवया आणि रवा (वेगवेगळा) भाजून घ्यायचा.
* दह्यात मीठ आणि साखर घालून फेटून घेऊन, रवा आणि शेवया यात मिसळून घ्यायच्या. हे मिश्रण अर्धा तास तरी मुरू द्यायचं.
* तेलाची/तुपाची फोडणी करून त्यात डाळी, मोहरी, हिंग, मिरच्यांचे तुकडे, कढीलिंबाची पानं असं सगळं घालायचं. ही फोडणी आता मिश्रणात ओतायची.
* इडल्या लावण्याआधी या मिश्रणात ओला नारळ आणि इनो घालून ढवळायचं.
* इडली पात्राला तेलाचा हात लावून लागलीच इडल्या वाफवायला घ्यायच्या. साधारण २० मिनिटं वाफवायच्या.
*दक्षिणभारतात इडल्यांच्या मिश्रणात गाजर किसून घालतात.
*नारळ नसला तरी चालतं.
*मिश्रण पळीवाढं असावं. घट्ट वाटलं तर किंचित कोमट पाणी घालून पातळ करायचं.
*मुख्य म्हणजे आंबवणे प्रकार नसल्यामुळे भिजवण्यापासून तासाभरात इडल्या पोटात. स्मित
*कुठल्याही चटणीशी छान लागतात.
दीपांजलीने केलेल्या इडल्यांचे फोटो इथे आहेत.

