व्यवसाय

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय

Submitted by मंगलाताई on 13 March, 2023 - 07:57

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .

येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

Submitted by संदीप डांगे on 11 January, 2019 - 03:12

येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

1. येत्या वीस वर्षांत सरकारी नोकरीला काही अर्थ राहणार नाही, महत्त्वाची मलिदा खाऊ पदे सोडली तर सगळंच्या सगळं औटसोर्स होणार आहे, अगदी लष्करात सुद्धा होत आहे. म्हणजे सरकारचे खाजगीकरण वाऱ्याच्या वेगाने सुरु आहे.

2. आजच्या सर्व पारंपरिक शिक्षणसंस्था, इर्रीलिव्हेण्ट होणार आहेत. कारण कामाचे स्वरूप इंडस्ट्रीनुसार बदलत आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्पेशलायज ज्ञानाची कौशल्याची गरज भासत आहे. उद्योगांना स्वतः चे कर्मचारी स्वतःच्या स्पेशल गरजेनुसार स्वतः प्रशिक्षित करून घ्यावे लागतील.

नविन लघुउद्योग, व्यवसाय, कंपनी यांचे Registration बद्दल माहिती हवी आहे

Submitted by क्षितिज on 6 June, 2017 - 12:54

नविन लघुउद्योग , कंपनी सुरु केल्यानंतर त्या कंपनीची अधिकृत नोंद कुठे आणि कशी करावी. लघुउद्योग, कंपनी ची जर online जाहिरात केलेली असेल, कंपनीचे व्यवहार हे ९५% online असतील, कुणी त्या जाहिराती चा गैरवापर करू नये अथवा कंपनी चे online details बदलण्याचा प्रयत्न
करु नये यासाठी कुठे नोंद करावी? कंपनी चे हक्क मूळ मालकाच्या नावावर राहावेत यासाठी कंपनी चे अधिकृत registration कुठे करावे? याबाबत Government ची website आहे का? (सदर लघुउद्योग , व्यवसाय, कंपनी अतिशय छोट्या स्वरूपात आहे याची नोंद घ्यावी. )

श्री. भावेश भाटिया: एक अवलिया

Submitted by मी ओंकार on 23 October, 2015 - 03:37

वयाच्या १५ व्या वर्षी अचानक आंधळेपण आले तर तुम्ही काय कराल? आणि सोबतच आई कर्करोगाने आजारी आणि वडिलांची तुटपुंजी कमाई ही संकटे ह्याच काळात उभी ठाकली तर?

एकुन कदाचीत धक्का बसेल पण ही खरी गोष्ट आहे अश्याच एक अवलियाची ज्याला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या अस्मानी संकटांचा सामना करावा लागला, आणी त्यातुन खचुन न जाता जोमाने उभा राहुन आज करोडा रुपयांचा व्यवसाय आणी सोबत शेकडो अंध लोकांना रोजगार देउन त्याने आपले जिवन सार्थकी लावले. अशा या अवलियाचे नाव आहे श्री. भावेश भाटिया.

तुम्ही नावे ठेवता का?

Submitted by रश्मी. on 27 April, 2015 - 05:53

तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणा, शालेय जीवनात म्हणा किन्वा कॉलेज मध्ये म्हणा, कोणाला नावे ठेवली आहेत का? नाव म्हणजे फिशपॉन्ड नव्हे, तर त्या मुलीच्या/ मुलाच्या/ शिक्षकान्च्या वागणूकीमुळे त्याना नावे ठेवली का कधी?

शाळेचे मला फारसे लक्षात नाही, पण कॉलेजमध्ये बहार होती. आमच्या कॉलेजमध्ये २ जिगरी दोस्त होते. त्याना आमच्या गृपने बरीच नावे ठेवली होती. राम-श्याम, जाड्या-रड्या ( कारण त्यातला एक खूप जाड व दुसरा एकदम काठीच वाटायचा), लॉरेल-हार्डी. माझी युपीची मैत्रिण एकदा त्याना चकला-बेलन म्हणाली. माझी हसून वाट लागली.

विषय: 

ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2014 - 02:49

माझ्या "फ्रेंडस अ‍ॅण्ड कलीग्ज" या धाग्यावर `बेफिकीर' यांनी सुचवल्याप्रमाणे "ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव" हा वेगळा धागा काढत आहे.

धाग्याचा फायदा सर्वांनाच, खास करून माझ्यासारख्या ४-५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि तुलनेत मॅनेजमेंटच्या लोअर लेव्हलला असलेल्यांसाठी येथील अनुभवी लोकांचे अनुभव, त्याचे विश्लेषण आणि एक्स्पर्ट टिप फार मोलाचे ठरतील.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 

इडली, हॉटेल आणि भामटा !

Submitted by चंपक on 4 January, 2014 - 05:57

गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!

ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!

'पॅशन ग्रीन' कंपनीच्या संचालिका अलका बजोरिया : मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 December, 2013 - 04:45

शोभेच्या रोपांना एखाद्या कलाकृतीचे रूप देण्याचे कौशल्य हाती असलेल्या मुंबईस्थित व्यावसायिका अलका बजोरिया यांची 'पॅशन ग्रीन' कंपनी आणि त्यांच्या कंपनीद्वारे दिल्या जाणार्‍या समग्र सुविधा त्यांच्या झाडा-पानांवरच्या प्रेमाची साक्षच देतात. आपल्या छंदाला व्यवसायाचे रूप देणार्‍या, नोकरीतून ब्रेक घेतल्यावर आपल्या सेकंड इनिंगमध्ये बागकामाच्या छंदाला कॉर्पोरेट स्तरावर नेणार्‍या व त्यात यश मिळवणार्‍या अलका यांचा हा खास परिचय मायबोली व संयुक्ताच्या वाचकांसाठी!

'पॅशन ग्रीन' सुरू करण्याअगोदरच्या तुमच्या वाटचालीविषयी सांगाल का?

लोकरी कपडे व गणवेश व्यावसायिका संगीता गोडबोले : एक परिचय : संयुक्ता मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 April, 2012 - 04:44

आयुष्यात एक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःची वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही!

प्रोफेशनल नेटवर्किंग-एक गरज

Submitted by आशूडी on 10 February, 2012 - 04:57

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रोफेशनल नेटवर्किंग करणं बर्‍याचदा आवश्यक होऊन बसतं. तुमच्या नोकरी - व्यवसायातल्या समस्या, प्रश्न यावर उपाय शोधण्याचं ते एक माध्यम बनतं. मग ते ऑनलाईन असो वा ऑफलाईन. मायबोलीवर 'मराठी उद्योजक' गृप अशाच जाणीवेतून सुरु झाला.
तुम्हाला हे खरंच आवश्यक वाटतं का? त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला? तुम्ही तुमचे 'कॉन्टॅक्ट्स' कसे बनवता, सांभाळता, वाढवता? एकमेकांच्या मदतीने नवीन नेटवर्किंगचे तंत्र आणि मंत्र शिकूया. Happy

Pages

Subscribe to RSS - व्यवसाय