गोड पदार्थ

Cinnamon swirl sour cream cake

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

Nut Mixture:

१/४ कप साखर
१ टेबलस्पून दालचिनी पावडर
१/४ कप अक्रोडाचा चुरा

केकसाठी :

२ कप मैदा (चाळून)
१ टिस्पून बेकिंग पावडर
१ टिस्पून बेकिंग सोडा
१/४ टिस्पून मीठ
१/२ कप बटर ( ११० ते ११३ ग्रॅम्स)
१ कप साखर
१ टिस्पून व्हॅनिला इसेन्स
२ अंडी
8-oz sour cream


(हा जरा पूर्वी केलेला तेव्हाचा फोटो. साखर साधी वापरल्याने व दालचिनीची पूड घरी केल्यामुळे नट मिक्ष्चर काही छान दिसत नव्हते, व सिनॅमन स्वर्ल देखील धड आला नव्हता. त्यामुळे परत केला केक.. )

क्रमवार पाककृती: 

१) अव्हन ३५०डिग्रीजला प्रिहिट करायला ठेवा.
२) नट मिक्ष्चर तयार करून ठेवा. मी साध्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर वापरली.
३) मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या.
४) साखर, बटर व व्हॅनिला एकत्र मिक्सरमधून काढून एका भांड्यात ठेवा.
५) त्यात अंडी एकावेळेस एक अशातर्‍हेने नीट beat करा.
६) या मिश्रणात (मैदा+बेपा+बेसो) व सावर क्रिम घालून ते सर्व स्मुद होईपर्यंत ब्लेन्ड करा.
७) बटर लावून तयार केलेल्या केकच्या अव्हनच्या भांड्यात अर्धे मिश्रण घालून त्यावर नट मिक्ष्चर पसरा व उरलेले केकचे मिश्रण घालून त्यावर उरलेले नटचे मिक्ष्चर पसरा.
८) ४० मिनिटे किंवा केकमध्ये खुपसलेली सुरी क्लिन येईपर्यंत बेक करा..
९) मायबोलीवर पाकृ द्या किंवा फोटो अपलोड करा! फिदीफिदी
१०) मगच खा! कॉफीबरोबर अमेझिंग लागतो हा केक!

वाढणी/प्रमाण: 
दोघांना २-३ दिवस पुरावा, माझ्यासारखा हावरटपणा न करता खाल्ला तर. :फिदी:
माहितीचा स्रोत: 
मी जसाच्या तसा पुढील लिंकवरून केला आहे. इथे देण्यासाठी मराठीत पाकृ लिहीली.. :) http://www.insidethekaganoffkitchen.com/2010/04/24/old-fashioned-sour-cream-cake/

तिळाची मलई बर्फी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तीळ+शेंगदाण्याची पावडर - अर्धा कप
कन्डेन्स्ड मिल्क - अर्धा कप
दूध - अर्धा कप
मिल्क पावडर - दोन चमचे शीगोशीग भरून
जायफळ पावडर किंवा वेलची पावडर किंवा केशर किंवा केशर वेलची सिरप - स्वादासाठी - आपल्या आवडीनुसार
सजावटीसाठी - पांढरे तीळ किंवा सुकामेवा - आपल्या आवडीनुसार

क्रमवार पाककृती: 

तीळ आणि शेंगदाणे खमंग भाजून थंड झाल्यावर मिक्सरमधून काळजीपूर्वक हळूहळू फिरवत अगदी बारीक कूट - पावडर - करून घ्या.
सगळे जिन्नस मायक्रोवेवप्रूफ भांड्यात एकत्र करून व्यवस्थित मिसळून घ्या. गुठळ्या राहू देऊ नका.
मायक्रो मोडवर हाय पावरला तीन (एक+एक+एक) मिनीटांसाठी ठेवा. एकेका मिनिटानंतर भांडं बाहेर काढून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण साधारण दीड मिनीटासाठी (३० सेकंद + ३० सेकंद + ३० सेकंद) पुन्हा मायक्रोवेवमधे ठेवा. मिश्रण साधारण आळले की तूप लावलेल्या ताटात थापा. सजावट करा आणि थंड झाल्यावर बर्फ्या कापा.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात २ सेंमी x २ सेंमी आकाराच्या साधारण वीस बर्फ्या झाल्या.
अधिक टिपा: 

तिळाचं कूट नको, पावडरच करा, तरच बर्फी छान गुळगुळीत होईल.

DSCN1035.JPG

मी स्वादासाठी फक्त जायफळ पावडर घातली आहे.

माहितीचा स्रोत: 
सायोची मलई बर्फी आणि सुलेखाने तिळाच्या वड्या बाफवर दिलेल्या टिप्स

तीळाच्या वडया

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटया तीळ भाजुन त्याचे मिक्सर वर जाडसर कुट करुन घ्यावे..
१ वाटी [सपाट] भरुन भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कुट..
२ वाटी साखर..
साखर भिजेल इतके अर्धी वाटी पाणी..
वरुन लावायला खोबरा बुरा अर्धी वाटी..[बाजारात मिळणारा तयार बारीक खोबर्‍याचा किस.]

क्रमवार पाककृती: 

दोन ताटांना व एका वाटीला खालुन तुपाचा हात लावुन ठेवावा..या ताटात च वडयांचे मिश्रण टाकुन वडया पाडायच्या आहेत..तुप लावल्याने वडया सहज सुटतील..साखरेत पाणी घालुन गॅसवर दोन तारी पाक करावा..सतत ढवळावे..लाडुसाठी करतो तसा पाक करायचा आहे..
पाक तयार झाला कि गॅस बन्द करुन त्यात शेंगदाणा कुट टाकुन ढवळावे .नंतर तीळाचे कुट थोडे थोडे टाकत ढवळावे..सगळे मिश्रण एकत्र ढवळले कि घट्टसर गोळा तयार होईल..
तुप लावलेल्या ताटात मिश्रणाचा अर्धा गोळा टाकुन तुप लावलेल्या वाटीने ताटभर एकसारखा पसरावा..उरलेला गोळा ही असाच दुसर्‍या ताटात पसरावा..त्यावर खोबरा किस भुरभुरावा व वाटीने दाबावा.हे मिश्रण कोंबट असतानाच त्याच्या वडया पाडाव्या

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तितक्या..
अधिक टिपा: 

या प्रमाणात भरपुर वडया तयार होतात.आधी दाणेकुट नन्तर तीळ कुट टाकावे ..मिश्रण ढवळत असताना तीळ्कुटाचा अंदाज येतो..माळव्यात अशा साखरेच्याच वडया करतात..तर गुळाच्या पाकात भाजलेले तीळ घालुन पातळ पापड करतात..तसेच गुळाच्या पाकातली तीळ व दाणे घालुन गुड-दानी करतात..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..

अंजिर-खजुर-बदाम बटटी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बडोद्याला एका लग्नाला गेले होते..तिथे सकाळच्या ताज्या नाश्त्यामधे इडली-वडा-साबुदाणा खिचडी व २-३ गोड प्रकार त्यात खोबरे पाक्,बेसन चक्की बरोबर ही बट्टी होती..खुपच छान्,वेगळा प्रकार म्हणुन तिथल्या रसोइयाला कसे करतात ते विचारले..त्यानेही उत्साहाने सांगितले..थंडीत खायला हा प्रकार छान आहे..
काल च ही बट्टी करुन पाहिली.यासाठी थोडी पूर्व तयारी लागते..त्यासाठी लागणारे जिन्नस..
सुके अंजीर ८
खजुर १० ते १२ बिया काढुन..
अंजीर व खजुर भिजेल इतकेच गरम दुध अंदाजाने घेवुन त्यात ३-४ तास भिजत घालावे
बदाम ८ ते १० गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजवुन साले काढुन ते सुद्धा वरच्या आंजिर-खजुर मिश्रणात भिजत टाकावे..
आता मिक्सर मधुन हे मिश्रण वाटुन घ्यावे..घट्टसर असावे ..
आता मावेत झाकण ठेवुन १-१ मिनिट असा टाइम देवुन शिजवुन घ्यावे..
एक वाटी मैदा गरम तेलाचे मोहन २ चमचे,चिमुट्भर मीठ टाकुन दुधात घट्ट भिजवुन घ्यावा..
ही झाली पुर्व तयारी..
पाव वाटी साजुक तुप..

क्रमवार पाककृती: 

शिजवलेले सारण थंड होइपर्यंत मैद्याचा पातळ लहान लहान पुर्‍या लाटाव्या..
एका पुरी वर लहान चमचा भरुन मिश्रण ठेवावे.वरुन दुसर्‍या पुरीने झाकुन दोन्ही पुरीच्या बाजु नीट दाबाव्या..बट्टीसारखा आकार दिसेल..हे रसोइयाने सांगितले होते..मी यात थोडा बदल केला एक मोठी पातळ पोळी लाटुन त्याचे चार भाग केले..प्रत्येक भागामधे थोडे सारण ठेवुन.उरलेल्या साइड च्या भागाने झाकुन टाकले..[चौघडी सारखे] मग जाड तव्यावर [एकावेळी ५-६ बटट्या] मंद आचेवर दोन्हीकडुन गुलाबीसर भाजले.
भाजुन झाल्यावर वरुन तुपाचा चमचा फिरवला..
यातल्या काही ओव्हन मधे भाजुन केल्या. वरुन तुप लावले नाही..

वाढणी/प्रमाण: 
एकावेळी फक्त २ च...
अधिक टिपा: 

या सारणात अजुन साखर घालायची नाही..खजुराची गोडी पुरते..
रसोइया म्हणाले कि यात गुलकन्द घालुन ही करतात..

माहितीचा स्रोत: 
अर्थात बडोद्याचे रसोइया..

डिंक--मेथी चे लाडु

लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

थंडी सुरु झाली कि या लाडवांची आठवण येते..वर्षभराच्या आरोग्याच्या बेगमीसाठी हे लाडु अवश्य खावे असे म्हणतात..त्यासाठी लागणारे जिन्नस हे काटेकोर मापाप्रमाणे घेतले नाही तरी चालते..सगळे जिन्नस घेतले नाही तरी चालते व अजुन नवे काही आयुर्वेदिक औषधी जिन्नसघातले तरी चालते..लाडु साठी तुप गायीचे अथवा घरी लोण्यातुन कढवलेले असावे..अगदी शक्य नसेल तर बाजारचे तुप पुन्हा एकदा गरम करुन वापरावे..खाली दिलेल्या प्रमाणात मी सगळे जिन्नस घेतले आहेत..कमी-जास्त प्रमाण चालु शकते..
१५० ग्राम मेथीची पुड..
ही पुड ,भिजेल इतके तुप घालुन २ दिवस पर्यंत भिजवुन ठेवावी..त्यानंतर च्या दिवशी लाडु करायचे आहेत..
१५० ग्राम/२ मुठ डि़क..डिंकाचे खडे बारीक करुन घ्यावे..
डिंक मावे.मधे १-१-१ मिनिट टाईम तुपाशिवाय -कोरडाच फुलवुन घेतला..मी घेतलेला डिंक अगदी बारीक होता..
१५० ग्राम मखाणे..हे दोनदा मावेत थोडे कुरकुरीत करुन घेतले..व त्याना हाताने चुरुन घेतले ..
१५० ग्राम बदाम..
१५० ग्राम काजु..
२५० ग्राम खारका..खारकेची बी काढुन खारीक पुड करुन घेणे..[खारीक गरम करायची नाही.]
१/२ वाटी सुके खोबरे किसुन मावेत परतुन घ्यावे..[१०-१०-१० सेकंद]
१०० ग्राम खसखस..मावेत गुलाबीसर परतुन याची बारीक पुड करुन घेणे..२ लहान चमचे भाजलेली कणीक घालुन वाटावी म्हणजे छान वाटली जाईल..
१ जायफळ व १२-१५ वेलची..
हे दोन्ही मावेत २० सेकंद गरम करुन त्याची पुड करुन घ्यावी..
२ वाटया कणीक व १ वाटी बेसन..हे तुपात वेगवेगळे खरपुस रंगावर भाजुन घ्यावे..
४ वाटया पिठीसाखर व १ वाटी गुळ..[हे प्रमाण आवडीप्रमाणे घ्यावे..]
या सगळ्या मिश्रणाचे लाडु वळण्या साठी गरम तुप..[अंदाजे पाउण किलो]
१ किलो तुपाचा एकुण अंदाज आहे..

क्रमवार पाककृती: 

साधारण पाऊण वाटी बदाम-काजु चे लहान तुकडे करावे .व उरलेल्याची पुड करावी..
मखाण्याची पुड करावी..
तुपात भिजवलेली मेथीपुड २ -३चमचे भाजलेली कणीक घालुन मिक्सरमधे फिरवुन घ्यावी..आता ही पुड मोकळी होईल..
खोबरे फक्त एकदाच मिक्सरमधे फिरवुन घ्यावे..
गुळ व ३-४ चमचे भाजलेली कणीक मिक्सरमधुन फिरवुन घ्यावी..
फुललेला डिंक व २-३ चमचे कणीक मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावा..
सगळे जिन्नस एका मोठया पातेल्यात एकत्र करावे वरुन गरम केलेले तुप टाकत ढवळत रहावे..लाडु वळण्याइतपत घट्ट झाले कि मध्यम आकाराचे लाडु वळावे..

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात ९० लाडु झाले..
अधिक टिपा: 

लाडु केल्यावर दुसरे दिवशी मुरतो तेव्हा मेथीचा कडुपणा जाणवत नाही..
कडु लाडु आवडत असतील तर कणीक कमी घालावी..
बेसनाचा खमंग स्वाद वेगळा जाणवतो..
कणीक व बेसन घातल्याने [एखाद वेळेस]दोन खाल्ले तरी चालेल..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..

सुंठ वडी..

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१०० ग्राम-- सुंठ पुड..
२०० ग्राम पिठी साखर ..
१०० ग्राम अंदाजे --साजुक तुप्..शक्यतो घरी केलेले घ्यावे..

क्रमवार पाककृती: 

तुप पातळ करुन घ्यावे..
चमचाभर पिठी साखर वगळावी..
एका ताटलीला तुपाचा हात फिरवुन वरुन वगळलेली पिठी साखर भुरभुरावी..
एका लहान पातेलीत सुंठ पुड व साखर चमच्याने एक्त्र करुन घ्यावी..
आता वरुन पातळ केलेले तुप थोडे-थोडे ओतावे..घट्टसर गोळा होईपर्यंत ढवळत रहावे..
तयार गोळा तुप लावलेल्या ताटलीत थापावा..
बोटाच्या एक पेराएवढ्या लहान लहान वड्या पाडाव्या..
रोज सकाळी एक वडी खावी ..थंडीपासुन रक्षण होते..

वाढणी/प्रमाण: 
रोज प्रत्येकी फक्त एक्च खावी..
अधिक टिपा: 

इथे सुंठ पुड तयार लिहीली आहे..पण घरी केलेली असली तर स्वाद,वास,गुण खुपच छान येतो..
बाजारातुन दुधीया सुंठ आणावी.याची ओळख म्हणजे ही पांढरी असुन ,फुगरी-फुगरी म्हणजेच फुगलेली असते..आतुन फोसरी/हलकी असते..
ही सुंठ फोडणे थोडेसे जिकीरीचे काम आहे..पण बत्ता/दगड्/अडकित्ता वापरुन लहान तुकडे [१ चे ४]करुन घ्यावे..मिक्सर मधुन बारीक वाटुन चाळुन घ्यावी..ही पुड वापरावी ..वरचे चाळण [रेषाळ भाग्]चहा करताना वापरावा..

माहितीचा स्रोत: 
माझी आई..

बदामाच्या वड्या / बर्फी

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप बदाम
१ कप खवा
१ कप साखर
१/२ कप दुध
केशर्,वेलदोडा पुड (आवडिनुसार)

क्रमवार पाककृती: 

१ कप बदाम रात्रभर पाण्यात भिजत घालावे,सकाळी बदाम सोलुन दुध घालुन मिक्सरवर बारिक वाटावे (फार गुळगुळित वाटायचे नाहिये)एका जाड बुडाच्या भांड्यात बदामाचे मिश्रण घालुन परतायला घ्यावे मध्यम आचेवर अजिबात लागु न देता परतावे दुध जरा आटले कि १ कप खवा जरा मोकळा करुन त्यात घालावा ,साखर घालावी मग सगळे मिश्रण बर्‍याच वेळ हलवावे गोळा जमायला लागला आणी हाताला चिकट लागले नाही की झाले अस समजावे आच बंद करुन एका तुप लावलेल्या खोलगट डिश मधे जाड बर्फी थापावी.
वड्या हव्या असतिल मिश्रण अजुन जास्त कोरडे होवु द्यावे मग ताटात घालुन थापावे आणी सुरिने वड्या पाडाव्या.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराच्या ४०-४५ वड्या होतात.
अधिक टिपा: 

हिवाळ्यात खायला अतिशय उपयुक्त्,मिश्रन गोळा होत आल्यावर केशर वेलदोडा पुड घालता येईल .मला बदामाचा ओरिजिनलच स्वाद आवडल्याने मी घातलेली नाहिये.तयार बदाम पावडर वापरून्ही या वड्या करुन बघितल्या होत्या त्यामानाने पटकन होतात पण्,चवित बराच फरक पडतो.मी नानक ब्रँडचा खवा वापरला.या वड्या हाताला मऊसरच लागतात ईतर वड्यांसार्ख्या कोरड्या होत नाहित्.खवा वापरलेला असल्याने फ्रिजमधेच ठेवाव्या.

माहितीचा स्रोत: 
आई

झटपट चुर्मा लाडु ( माय्क्रोवेव मधले)

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. २ कप गव्हाचे पिठ ( कणिक)
२. १/२ वाटी तुप
३. दीड कप चिरलेला गुळ
४. १/२ कप सुके खोबरे ( डेसिकेटेड)
५. १/२ कप कोमट पाणी
६. वेलची पावडर , थोडे बदामाचे काप

क्रमवार पाककृती: 

१. एका मावे च्या भांड्यात कणिक भाजुन घ्या. १००% पॉवर वर ५ मिनिटे. मधे मधे हलवावे.
२. भाजलेले पिठ एका ताटात काढावे. त्यात १/४ तुप आणि कोमट पाणी घालुन चांगले मिक्स करावे.
३. हे पिठ मग परत मावे च्या भांड्यात घालुन ६०% पॉवर ला ५ मिनिटे ठेवावे. मधुनच हलवावे. खमंग वास येवु लागतो.
४. आता हे तसेच गरम असताना मिक्सर मधुन दोनदा टर्र करावे.
५. मावे च्या भांड्यात गुळ आणि उरलेले तुप घालुन १ मिनिट ठेवावे. गुळ पातळ झाला पाहिजे.
६. आता पातळ गुळ+तुप्+मिक्सर मधले पिठ+वेलची+बदाम+ सुके खोबरे सगळे एकत्र करावे.
७. हाताला थोडे तुप लावुन लाडु वळावे. निवल्यावर गट्ट्म करावे.

अतिशय खमंग लागतात. ह्यात कणके बरोबरीने नाचणी पीठ ही घेता येते. माझा लॅपटॉप सध्ध्या माझ्या मोबाईल च्या सोफ्टवेअर वर रुसला आहे. त्या मुळे फोटो टाकता येत नाहीत.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराचे साधारण १५-१७ लाडु होतात.
अधिक टिपा: 

पहीले जी कणिक भाजणार तेंव्हा अजिबात तुप घालु नये. नंतरच घालावे. मधे मधे नक्कि हलवावे, नाहीतर पिठ जळण्याचा संभव असतो.

माहितीचा स्रोत: 
अंतरजाल

सिताफळ आईसक्रिम

लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

दूध - ५०० मिलि.
साखर - ८ ट॓बल स्पून
आईस्किम ईसेंन्स - १/४ टी स्पून
GMS Powder - १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून
CMC Powder - १/४ टी स्पून
cornflour - १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून
सिताफळांचा गर - १ वाटी किंवा १० मध्यम आकारांच्या सिताफळांचा गर
अॅल्युमिनियमचा पसरट गोल डबा झाकणासहित

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम एका स्टीलच्या पातेल्यात दूध, साखर, GMS Powder , CMC Powder, cornflour एकत्र करा.
२. पातेल गॅसवर मंद आचेवर ठेवा व सतत चमच्याने ढवळत रहा.
३. १० मिनटांनी मिश्रण थोड दाट होईल. गॅस बंद करुन त्यात आईस्किम ईसेंन्स घालून ढवळावे.
४. मिश्रण थंड झाल्यावर अॅल्युमिनियमच्या डब्यात ओतून झाकण लावून डबा डिप फ्रिजर मध्ये ठेवा आणि डिप फ्रिजर HIGH वर ठेवा.
५. ६ तासांनी आईस्किम सेट होईल.
६. सेट झालेल्या मिश्रणाचे दोन भाग करा.
७. अर्ध मिश्रण म्किसरच्या भांडयात घालून ५ मिनट फिरवाव.
८. उरलेल्या अर्ध्या मिश्रणात अर्धि वाटी सिताफळचा गर घालून, म्किसरच्या भांडयात घालून ५ मिनट फिरवाव.
९. अॅल्युमिनियमच्या डब्यात दोन्हि मिश्रण घालून त्यात उरलेला सिताफळचा गर घालून, मिश्रण चमच्याने व्यवस्थित ठवळा.
१०. डब्याला झाकण लावून डिप फ्रिजर मध्ये ठेवा आणि डिप फ्रिजर MEDIUM वर ठेवा.
११. मिश्रण ४ तासांनी सेट होते.

अधिक टिपा: 

अॅल्युमिनियमचा पसरट गोल डबा झाकणासहित नसेल तर केकचा अॅल्युमिनियमच भांड वापराव व त्यावर एक ताट ठेवा.

१ ते ५ क्रमवार पा़ककृती हि बेसिक आईसक्रिमची आहे.
क्रमांक ६ पासून तुम्ही वेगवेगळी फळ (सट्रबेरी, आंबा, चिकू, काळी द्राक्ष), काजू, बदाम, पिस्ता, काळी मनूका, चोकलेट, कोको पावडर घालून आईसक्रिम तयार करु शकता.

काजुकतली (फोटोसह)

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिठी साखर १ वाटी
काजू पावडर २ वाट्या
दुधाची घट्ट साय २ चमचे
पाणी पाव वाटी
तुप १ चमचाभर

क्रमवार पाककृती: 

कढई किंवा जाड बुडाचे पातेले तापायला ठेवावे.
काजूची पुड केली नसेल तर करुन घ्यावी. तयार पुड दोन वाट्या भरायला हवी.
कढईमध्ये एक वाटी साखर, दोन चमचे साय व पाव वाटी पाणी घालून साखरेत साय एकत्र होईल असे मिसळावे. गॅस मिडीयम हाय वर ठेउन सतत ढवळत रहावे.
साखर वितळेल व बाजुने बुडबुडे यायला सुर्वात होईल मग लगेच त्यात काजु पावडर घालून मिश्रण ढवळावे. मिश्रण गोळा व्हायला लागले की लगेच गॅस बंद करुन कढई खाली उतरवावी.
ताटाला किंवा पोळपाटाला तुप लाउन भरभर गोळ्याची पोळी लाटावी. हवा असल्यास चांदीचा वर्ख लावावा. मग लगेच धारदार सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या स्मित

शंकरपाळ्याच्या आकारत कापताना कडेचे तुकडे उगाच अर्धवट पडतात. म्हणून ह्या साध्या सोप्या चौकोनी स्मित

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

कोणतीही बर्फी किंवा वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा होत आला की चमचाभर पिठीसाखर भुरभुरवायची आणि पटकन मिक्स करुन मग वड्या थापायच्या/लाटायच्या. असे केल्याने वड्या/ बर्फी चिकट न होता एकदम खुटखुटीट होते.

काजू सादळलेले(मउ) असतील तर काजु पावडर निट होत नाही.
काजु पावडर बनवताना मिक्सर फर्स्ट स्पीड वर किंवा ईंच वर चालवावा एक एक मिनिटाच्या गॅप ने. दोन ते तिन मिनिटात चांगली सपीट पावडर बनते.

माहितीचा स्रोत: 
बहीण