व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

*यशवंत यशवंत........!*

Submitted by ASHOK BHEKE on 18 November, 2018 - 02:36

उत्सव म्हणजे लखलखणाऱ्या लाख दिव्यांची झगमगणारी धरती. या वर्षी गणपती नवरात्र उत्सवाच्या वर्गणीवर उत्सव होईल का....? मंडळ कार्यकर्त्यांना नेहमी प्रमाणे पडलेला घोर प्रश्न. एक म्हणजे गणपती बाप्पा असो वा आई जगदंबा...! भक्ती असेल तेथे शक्ती धाव घेते. कार्यकर्त्यांच्या मनात बळ निर्माण करणारी ती अदृश्य शक्ती कोणी पाहिली नाही. पण गणपती बाप्पा, आई जगदंबा हे आपले त्राता आहेत. ते आहेत म्हणून हे जग आहे. त्यांना भक्तामध्ये विराजमान व्हायचे असेल तर ते त्याची तजबीज करूनच स्थानापन्न होतात. हा अनुभव आम्हांला अनेकदा आला. एक वेळ तर अशी होती, मूर्ती आणायची तर पैसे द्यायला हवेत...!

स्त्री आणि पुरुष स्वभाव

Submitted by pkarandikar50 on 24 October, 2018 - 09:07

लोक्स,

स्त्री भावनाप्रधान असते आणि पुरुष बुद्धीप्रधान असतो; किंवा स्त्रीया त्यांच्या मेन्दूचा उजवा गोलार्ध जास्त करून वापरतात तर पुरुष डावा. असे काही मान्यताप्राप्त समज आहेत. इतके की त्यांना गृहीत धरले जाते. माझ्या ‘कदाचित’ या कवितेत मी स्त्रीच्या नजरेने ‘ब्रेक अप’ कडे पाहीले. पुरुष हळुवार, तरल भावभावना समजावून घेताना कुठेतरी उणा पडतो असा काहीसा विचार त्या कवितेतून उमटला, अशी शंका मलाच येते.

शब्दखुणा: 

ती

Submitted by @पर्ण on 26 September, 2018 - 13:45

ती
एक मिटलेली कळी,
स्वतः त रमणारी,
अखंड बोलणारी,
ती
स्वतः च अस्तित्व शोधणारी,
नकुशीच अदृश्य ओझं मनात साठवलेली,
ती
परंपरांच्या साखळदंडात गुंतलेली_
तो तोडायचा की पैंजण बनवायचं यात अडकलेली
ती
रानात ले स्वछंदी पाखरू,
डोळ्यातल्या स्वप्नांना गगनाची आस असणारी,
पण त्याची गुढी स्वतःच खाली उतरवणारी
कोणीतरी तिचे हे हात धरावे_
थरथरणाऱ्या मनावर फुंकर घालावी,
तिच्या काळ्या पांढऱ्या कुंचल्यातून इंद्रधनू उमटावे_
अन मिटलेल्या कळीचे हसरे फुल व्हावे.

एक वेळ अशी येते कि

Submitted by सिद्धेश्वर विला... on 26 September, 2018 - 09:09

एक वेळ अशी येते कि

तुम्हाला झाडं जवळची वाटू लागतात

तुमच्याशी फुलं बोलू लागतात

सारे पक्षी तुमच्याकडेच बघून उडतायत

असं वाटू लागलं

कि समजा तुमची प्रेमळ पहाट झालीय

दूर मनाच्या आकाशात

एक प्रेमाची चांदणी उगवलीय

ती जशी टीम टीम करू लागेल

तसं प्रेम पसरेल चराचरी

नखशिखांत बनवेल प्रेम पुजारी

सुचतील रात्रीबेरात्री नवीन उखाणे

भल्या पहाटे द्याल कबुतरांस दाणे

गप्प घालाल विवेकानंदांची घडी

तोंडाचा होईल चंबू अन नजर सताड उघडी

मायबापास वाटेल जेव्हा

तुमचा काहीतरी बिघाड झालायं

व्यक्तिचित्रण ---आमचा आधार " पुष्पा " --- मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 22 September, 2018 - 10:45

आमच्या कोकणातल्या घरा वरचा आणखी एक लेख

पुष्पा, गो, ती मोठी कढई दे जरा पटकन घासून.

पुष्पा, तेवढं अळू दे चिरून आणि आठळ्या ही दे सोलून आळवात घालायला

पुष्पा, ह्या ओढणीचा रंग जातोय तेव्हा वेगळी धु.

पुष्पा , निखिलला घे जरा आणि आगरात फिरवून आण.... किती किरकिरतोय बघ.

तुम्ही ओळखलचं असेल ही पुष्पा कोण ते. हो बरोबर आहे … ही आमची कोकणातल्या घरची कामवाली . पु. लं च्या नारायणा सारखी हसतमुखाने सर्व आघाड्यांवर लढत असते दिवसभर.

वळूनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 21 September, 2018 - 03:42

वळूनी मागे मी बघता

शल्य बोचते मनाला

एक वेडा वाट चालला

एक वेडा वाहात चालला

वेळ दिसे काट्यावरी

कधी ना परतणारी

वाट पाहून कोमेजून गेली

वाटेवर फुललेली फुले सारी

शिंकण्यात पण झाला गुलाम तू

धरे नित्य हाती रुमाल तू

आठवतेय का ती शाळकरी शिंक तुला ?

खळाळून बाहेर पडलेला शेमबुड पिवळा

ताप खोकला सर्दी पडसे

सर्वाचीच काढली होती तू पिसे

ठेच लागता लावे माती

हसता हसता जोडे नाती

त्या नात्यांचे भान विसरला

जसा जसा कमावता झाला

धुंडाळ नव्या वाटा पुन्हा नव्याने

बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली

Submitted by सिद्धेश्वर विला... on 19 September, 2018 - 03:20

बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली

मस्त झोकात मोठ्ठा पाईप सोडून दिला

तिला नाही पण मला मात्र थंडावा वाटला

जमिनीची आलटूनपालटून मशागत केली

उदघाटनाची तयारी केली , बाई हलत डुलत आली

मी काढून केळ्याचे साल, झालो होतो तय्यार

एकाने भागले नाही , म्हणून घड काढलं चार

ना तिला कसला त्रास झाला , ना तिनं कुठला ढेकर दिला

जस्सच्या तस्स घड रिचवलं

एकेकाचे साल काढून , हैराण करून टाकला

बाईला आवडते म्हणून त्यानेत्याने केळे काढून आहेर दिला

बागेचा पुरा सत्यानाश झाला

ती एकदम झप्पाक होती

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 September, 2018 - 06:40

ती एकदम झप्पाक होती

बोले तो डिट्टो ऐश्वर्या

मी आवडायचो फक्त मित्र म्हणून

कारण पोटाने एकदम मोरया

एकदा सहज बोलून गेली

मला पिळदार अंग फार आवडते

तुझं रूप छान आहे पण पॉट बघितलं

तर मन पार गळपटते

खजील होऊन आरसा घेतला

पोटाचा घेर खालून वर बघितला

काम भारी जोखमीचं होतं

सहा बिस्कीट लावायची होती ,खाली करून पोतं

भरवून टाकली पोटाची शोकसभा

बनियान काढूनच होतो उभा

ढेरी पारच वाढलेली

सारे बघत होते पोटाची शोभा

मित्रपरिवार दुःखात शोकाकुल

कुणी देई धीर मजला

Hair Straightening : Iron or brush??

Submitted by _आनंदी_ on 16 August, 2018 - 02:05

Hair Straightening, Iron or brush घायचा आहे.
काय घ्यावा Iron की brush ???

ब्रश विषयी कोणाचा अनुभव आहे का?
मी Iron वापरली आहे ..
ब्रश ने फास्ट होईल असे वाटते..
माबोकरांचे काय अनुभव?

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व