ती

Submitted by @पर्ण on 26 September, 2018 - 13:45

ती
एक मिटलेली कळी,
स्वतः त रमणारी,
अखंड बोलणारी,
ती
स्वतः च अस्तित्व शोधणारी,
नकुशीच अदृश्य ओझं मनात साठवलेली,
ती
परंपरांच्या साखळदंडात गुंतलेली_
तो तोडायचा की पैंजण बनवायचं यात अडकलेली
ती
रानात ले स्वछंदी पाखरू,
डोळ्यातल्या स्वप्नांना गगनाची आस असणारी,
पण त्याची गुढी स्वतःच खाली उतरवणारी
कोणीतरी तिचे हे हात धरावे_
थरथरणाऱ्या मनावर फुंकर घालावी,
तिच्या काळ्या पांढऱ्या कुंचल्यातून इंद्रधनू उमटावे_
अन मिटलेल्या कळीचे हसरे फुल व्हावे.

Group content visibility: 
Use group defaults