स्त्री आणि पुरुष स्वभाव

Submitted by pkarandikar50 on 24 October, 2018 - 09:07

लोक्स,

स्त्री भावनाप्रधान असते आणि पुरुष बुद्धीप्रधान असतो; किंवा स्त्रीया त्यांच्या मेन्दूचा उजवा गोलार्ध जास्त करून वापरतात तर पुरुष डावा. असे काही मान्यताप्राप्त समज आहेत. इतके की त्यांना गृहीत धरले जाते. माझ्या ‘कदाचित’ या कवितेत मी स्त्रीच्या नजरेने ‘ब्रेक अप’ कडे पाहीले. पुरुष हळुवार, तरल भावभावना समजावून घेताना कुठेतरी उणा पडतो असा काहीसा विचार त्या कवितेतून उमटला, अशी शंका मलाच येते.

पण स्त्री-स्वभाव आणि पुरुष-स्वभाव यांविषयीचे हे समज कितपत शास्त्रशुद्ध आणि शास्त्राधारीत आहेत? गेल्या २५ वर्षात आकलन विषयक मज्जाशास्त्र (Cognitive Neuro Science) खूपच प्रगत झाले आहे. शास्त्रद्न्य आता मेंदूचे नकाशे काढतात, आतल्या निरनिराळ्या सर्कीट्सची कार्यप्रणाली उलगडतात. विचारांची उत्पत्ती मेंदूत कुठे आणि कशी होते; विचारांचे रुपांतर कृतीत कसे होते यासारख्या प्रश्नांवर जगभरात भरपूर संशोधन झाले आहे आणि सुरू आहे. यातून स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदू-रचनेत आणि कार्य्-प्रणालीत असे काही मूलभूत फरक सापडले आहेत काय? संगोपन काळात जे संस्कार होतात त्यामुळे असे conditioning सार्वत्रिक स्तरावर होते काय? आपण आपली गृहीते मज्जाशास्त्राच्या कसोटीवर नव्याने तपासून पहायला हवीत का?

प्रभाकर (बापू) करंदीकर.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्त्रियांना जितके पुरूषस्वभाव ठाऊक असतात तितके पुरूषांना स्त्रीस्वभाव उलगडत नाहीत,
याचे कारण मूल लहानपणापासून स्त्रियांकडे असते. मुलगा आणि मुलगी यांच्या नैसर्गिक तर्‍हा तेव्हांपासून स्त्रियांना समजतात. स्त्रियांचा स्वभाव बोलून न दाखवण्याचाही असतो. (आता बदल होताहेत ते या प्रतिसादापुरते बाजूला ठेवू). त्यामागे काम काढून घेणे, विनाकारण पंगे न घेणे आणि विनातक्रार तरून नेणे हे हेतू असतात.
पुरूषाला स्वतःला आपण आता पुढच्या प्रसंगात पंगा घेणार आहोत हे समजत नाही. हे कंडीशनिंग आहे कि स्वभाव ?

काही भेद निसर्गाने बनवलेत तर काही समाजाने
समाजाने बनवलेले भेद झिडकारून समानता आणावी आणि निसर्गाने बनवलेले ज्याच्या त्याच्यावर सोडावेत..

स्त्री असो की पुरुष यातील प्रत्येक व्यक्ती ही जवळपास ९०% सामाजिक (यात धर्म, जात, रेस, संस्कृती, समजूती, मिथके, मिथॉलॉजी, घराण्यातील रितीरिवाज, फोमो, पिअर प्रेशर, स्त्री/पुरुषवाद इ. सर्व काही आले) जडणघडणीचे प्रॉडक्ट असते, त्यातून एक भूमिका वठवत असते, केवळ १०% बुद्धीप्रधान असते असे मला वाटते. (टक्केवारी फक्त तफावत दाखवण्या उद्देशाने दिली आहे, आपण बुद्धीवादी फार कमी आणि सामाजिक साच्यातून बनलेले खूप जास्त असतो हे दाखवण्यास.)

तेव्हा मला या विषयावर पडणारे काही प्रश्न आहेत.

अशा सामाजीक साच्यातून घडलेल्या न्यूरल नेटवर्कच्या परिणामामुळे, मेंदूतील ठराविक भाग कमी/जास्त वापरल्या गेल्याने स्त्री पुरुषांचे मेंदूचे नकाशे असे वेगवेगळे होतात का, की ब्रेन मॅपिंग मध्ये याचा काही संबंध नाही?

निसर्गतःच भेद असतो असे म्हणताना यातील सगळे खरंच निसर्गत: आहेत की काही/बरेच वर म्हटलेल्या परिणामाचे आहेत? याबद्दलही संशोधन झाले आहे का ज्यातून ठामपणे हे अमुक निसर्गतःच भेद आहेत असे निर्विवाद पणे म्हणता येईल?

"ती"ची कहाणी- निरंजन घाटे, समकालीन प्रकाशन या पुस्तकात या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला आहे. मी पुस्तक वाचले नाही पण अनुभव मासिकात आलेला भाग वाचला आहे. शिवाय सेक्सायन या निरंजन घाट्यांच्या पुस्तकात त्याचा उहापोह आहे.

कविता वाचली…
सुंदर लिहिलंय. वैभव जोशींचा प्रतिसादही छान आहे.
कविता सद्यपरिस्थितीला अनुसरून आहे….
पण
अश्मयुगीन काळी टोळीची प्रमुख स्री होती. टोळीची सुरक्षितता तिच पाहायची. तिच शिकारीत पुढाकार घ्यायची. टोळीतील सगळ्यांना शिकार वाटून द्यायची. म्हणून तिला देवी सारखे पुजत. शिकारी संबंधी आणि अन्य निर्णय तिच घ्यायची. तिला आवडेल त्या पुरुषाशी रतायची. तेव्हा स्री सत्ताक संस्कृती होती. तेव्हा कदाचित ही कविता पुरुषाने स्रीला उद्देशून म्हटली असती….
माणूस जसजसा प्रगत होत गेला तसतसा स्री पुरुषातही बदल होत गेला. या बाबतीत मानवच्या वरील मताशी सहमत आहे. अगदी मेंदूतही असे बदल होत असावेत. बर्फाळ प्रदेशात बेडूकही बर्फवृष्टी होत असते तेव्हा गोठलेल्या अवस्थेत पडून राहतो मेल्यासारखा. श्वास ही खूप हळू घेतो. आपण तर माणसं आहोत.
आपणच म्हणतो Change is the law of nature. स्री किंवा पुरुष दोघेही भावनिक आणि बुद्धीप्रधान असावेत. अन्यथा साने गुरुजी नसते आणि कल्पना चावला सुध्दा नसती. पण ही असामान्य माणसं.
स्री सत्ताक संकृती आता नसली तरी येऊ शकते.
अलीकडे तर नोकरीला लागताना तुमच्या बुध्यांका एवढेच महत्व भावनांकाला दिले जाते.
आईचं छत्र हरपलं तर बापाला/भावाला आईही व्हावं लागतं . तसंच मोठ्या बहिणीला बाप, आई व्हावं लागतं.
मला वाटतं निसर्गदत्त दोन्ही गोष्टी स्री पुरुषात असाव्यात. त्यात परिस्थिती नुसार बदल होत गेले.
माणूस म्हणून जगायला जितकं हळवं मन आवश्यक आहे तेवढंच बुध्दीजीवी असणं ही गरजेचं आहे. तुमचा हळवेपणा प्रसंगी कठोरतेत बदलता आला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट बुध्दिच्या कसोटीवर खरी उतरावी असा अट्टाहासही नसावा.

जशा गाई ,म्हैस ह्यांच्या विविध जाती आहेत.
प्रत्येक जातीचे गुणधर्म,शारीरिक क्षमता वेगळी असते
त्यांची शरीर यष्टी वेगळी असते.
स्वभाव वेगळा असतो.
तशा माणसाच्या पण अनेक जाती आहेत
आफ्रिकन लोकांची जी शारीरिक क्षमता आहे ती भारतीय लोकात कधीच येवू शकतं नाही.
फक्त भेद भाव निर्माण होवून अन्याय होवू नये म्हणून स्वीकारले जात नाही
तसे स्त्री आणि पुरुष हे भिन्न आहे त्यांच्यात अनेक बौद्धिक आणि शारीरिक फरक
आहेत.
फक्त ते स्वीकारले जात नाहीत.
व्यापक परिणाम काय होईल ह्याचा विचार करून

जशा गाई ,म्हैस ह्यांच्या विविध जाती आहेत.
प्रत्येक जातीचे गुणधर्म,शारीरिक क्षमता वेगळी असते
त्यांची शरीर यष्टी वेगळी असते.
स्वभाव वेगळा असतो.
तशा माणसाच्या पण अनेक जाती आहेत
आफ्रिकन लोकांची जी शारीरिक क्षमता आहे ती भारतीय लोकात कधीच येवू शकतं नाही.
फक्त भेद भाव निर्माण होवून अन्याय होवू नये म्हणून स्वीकारले जात नाही
तसे स्त्री आणि पुरुष हे भिन्न आहे त्यांच्यात अनेक बौद्धिक आणि शारीरिक फरक
आहेत.
फक्त ते स्वीकारले जात नाहीत.
व्यापक परिणाम काय होईल ह्याचा विचार करून

भेद स्विकारले जातात की..
पुरुषांच्या आणि महिलांच्या स्पर्धा वेगळ्या गटात असतात.
ईतकेच नाही तर एखाद्या महिलेत पुरुषांचे हार्मोन्स जास्त असले तरी तिला स्त्रियांच्यात भाग घेऊ देत नाहीत.

तापसी पन्नूने रश्मी रॉकेट या चित्रप्टातून याला वाचा फोडली आहे.

वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात ह्याचा अर्थ सरळ आहे स्त्री आणि पुरुष ह्या मध्ये शारीरिक फरक आहे
बौद्धिक परीक्षा स्त्री आणि पुरुष ह्यांच्या साठी एकच असते .
म्हणजे त्या क्षेत्रात दोघात फरक नाही
सेक्स विषयी गुन्हे ह्या मध्ये पुरुष आणि स्त्री ह्या साठी वेगळे कायदे आहेत ..
म्हणजे सेक्स ह्या क्षेत्रात दोघात फरक आहे.

धावण्याची स्पर्धा,वजन उचलण्याची स्पर्धा,क्रिकेट ची स्पर्धा ,
स्त्री आणि पुरुष अशी कधी झाली आहे का?
टेबल टेनिस ,wholy बॉल,हॉकी , बास्केट बॉल .
अशा अनेक स्पर्धा त्या मध्ये add करता येतील..
बुद्धिबळ खेळाची स्पर्धा पण स्त्री आणि पुरुष अशी होत नाही
ह्याचा सरळ अर्थ आहे स्त्री आणि पुरुष ह्या मध्ये अनेक फरक आहेत

ह्याचा सरळ अर्थ आहे स्त्री आणि पुरुष ह्या मध्ये अनेक फरक आहेत >>ओह! यावरून कळते तर. नाहीतर अवघडच होतं.

स्वभाव
पुरुषांना वृध्द आई वडील ह्या विषयी प्रेम असते
स्त्रियांना वृध्द लोकांविषयी बिलकुल प्रेम नसते .
वृध्द, गरोदर स्त्री,लहान मूल असलेली स्त्री ह्यांना बसायला जागा स्त्रिया कधीच देत नाहीत ते पुरुष देतात.
शरीराचे उन्नत दर्शन पुरुष करत नाहीत.
स्त्रिया शरीराचे उन्नत दर्शन करण्यात मोठेपणा मानतात.
सध्या इतकेच

टाईम ट्रॅव्हल चा लोचा दिसतो माबोवर. 1735, 1847, 1927 आणि 3023 सालचेही सदस्य एकाच वेळी लॉगीन होताहेत. एकच सदस्य इकडून तिकडे झुलत असेल ही शक्यता पण आहे.

स्वभाव तर जगातल्या कुठल्याही दोन व्यक्तींचा भिन्न असतो. स्वभावाच्या लाखो तर्‍हा. पण त्यात स्त्री पुरुष यावरून भेद नसावा. माझी आज्जी म्हणायची बाळ ऋन्मेष, जगात फक्त दोन प्रकारचे लोकं असतात. चांगले आणि वाईट. यात स्त्री-पुरुष, हिंदू-मुसलमान, कोकणातले-देशावरचे, आस्तिक-नास्तिक, शाकाहारी-मांसाहारी यापैकी कोणीही येऊ जाऊ शकते. त्यामुळे मी लोकांना चांगले वाईट या निकषावरच बघतो आणि ईतर कुठलेच भेद मानत नाही. त्यामुळे मी माझी जात धर्मही कधी लावत नाही ना लिंगावरून स्वतःचे वेगळेपण ठरवतो. आपला प्रयत्न नेहमी चांगले-वाईट पैकी चांगले गटात राहण्याचा असावा.

मा़झी आज्जी म्हणायची "बाळ ! उद्याच्या मायबोलीचा आयडी, शांत माणूस " ती मला खर्‍या नावाने कधीच बोलवायची नाही.
सगळ्यांच्या घरी असेच असेल, नाही का ?

>>>>>कविता वाचली…
सुंदर लिहिलंय. वैभव जोशींचा प्रतिसादही छान आहे.
कविता सद्यपरिस्थितीला अनुसरून आहे….

कोणती कविता? कुठे आहे लिंक किंवा उल्लेख?

शांत माणूस
माझे लहानपणीचे लाडाचे नाव ऋन्मेष होते. तेच नाव मी पुढे आयडीनाव म्हणून घेतले.
आज्जी मला ऋन्मेऽऽष अशी हाक मारायची म्हणून एक्झॅक्टली ते नाव घेतले.. माझ्या आज्जीची मला मारलेली हाक आहे ती Happy

माझे पण लाडाचे नाव शांत माणूस होते. तेच मी आयडी म्हणून घेतले.
माझी आज्जी तर मायबोली नावाची वेबसाईट भविष्यात निघणार आहे. तिकडे थापा मारू नकोस असे शिकवायची. खरे खरे लिहीत जा. बरे वाटेल असे लिहू नको असे तिने मला शिकवले. त्यामुळे मी शान्त झालो.

अरे वाह खूप छान.

मी घरचे लाडाचे नाव मायबोलीवर आयडी नाव वापरल्यानंतर सोशलसाईटवर असे नाव घेण्याचा एक ट्रेंडच आला Happy

धागा आता पुन्हा हायजॅक होतोय वाटते.. लोकंच माझा विषय काढतात. बिल माझ्यावर फाटते Happy

चला हे मा शे पो Happy

अरेच्चा ! मी माझ्या आजीबद्दल लिहीले तर धागा हायजॅक झाला ? दुसर्‍यांनी लिहू नये असा नियम आहे का ? तसं असेल तर माझ्या आज्जीच्या पोस्ट्स काढून टाकतो. अ‍ॅक्च्युअली, पणजीच्या पण लिहीणार होतो... आता जाऊ दे.