मोबाईल

गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 July, 2014 - 04:02

मध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का?
एक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
दुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय?

असाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

नवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.
मात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का?

सॅमसंग टॅब २ ७.० - ईबुक रिडर अ‍ॅप्स एसडी कार्ड्मध्ये ट्रान्सफर कसे करावे?

Submitted by यशस्विनी on 22 July, 2013 - 22:23

माझ्याकडे सॅमसंग टॅब २ ७.० आहे. ज्याची अंतर्गत स्टोरेज कॅपॅसिटी ८ जीबी व बाह्य स्टोरेज कॅपॅसिटी १६ जीबी आहे. मी मुख्यतः या टॅबचा उपयोग ईबुक्स वाचण्यासाठी करते. कोबो व बुकगंगा हे दोन इबुक रिडर्स मी वापरते. हे दोन्ही रिडर्स टॅबचे इनबिल्ट स्टोरेज वापरत आहेत, जो ४.४९ जीबी दाखवत आहे. या दोन्ही रिडर्समध्ये भरपुर प्रमाणात ईबुक्स डॉउनलोड केल्यामुळे माझी इनबिल्ट स्टोरेज कॅपॅसिटी खुपच कमी झाली आहे.

शब्दखुणा: 

बेटे, फोन तो सिर्फ बात करने के लिए होता है..?(!)

Submitted by इब्लिस on 7 April, 2013 - 13:27

मोबाईल कोणता घ्यावा या धाग्यावर एक प्रतिसाद टाईप करताना डोक्यात अचानक एक किडा वळवळला. म्हणून हा धागा. किड्याची समरी वर टायटल मधे आहेच. इतके बोलून, नमन झाल्यानंतर उरलेले घडाभर तेल पुढे ओततो -

फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे सुमारे ४थी-५वी मधे असताना आमच्या अख्ख्या कॉलनीत एक फोन होता. तो देखिल लँडलाईन. फोन कसा करतात याची ओ की ठो जाणकारी आम्हाला नव्हती. फोनवाले घर शेजारीच होते. वडीलांच्या ऑफिसात फोन ऑफकोर्स होताच. एकदा आईने मला शेजारी जा अन तुझ्या वडिलांना अमुक निरोप फोन करून सांग असे काम सांगितले.

विषय: 

काळ्या रंगाचे चकाकणारे चटकस्क्रीन फोन.

Submitted by अंड्या on 12 November, 2012 - 06:24

Finally the wait is over!!!
Feels good to hold this sleek chick in my hand!!
iPhone 5!!!!!!!!!!!!!

---------------------------------------------------------------

* Congrats . . . .for getting ur SLIMMER life back. . . .

* Thats what we call a GEEK. a cool 45 K.

* Yep!!! Worth a spend

* i have already got one.. u just keep on waiting.. !!

* यार मुझे भी लेना था, कहा से ले रहा है..

*
*
*

मित्राने फेसबूकवर आपल्या नवीन फोनची जाहीरात केली आणि पाठोपाठ अभिनंदनाची रणधुमाळी सुरू झाली.
अभिनंदनाच्या पलीकडे ही एक वेगळीच चढाओढ सुरू झाली आणि तासाभरात पन्नास कॉमेंट पडल्या.

विषय: 

माकडाच्या हातात मोबाईल

Submitted by मंदार-जोशी on 15 January, 2012 - 03:34

सर्वसाधारणपणे आपल्या देशात आधी वस्तू येते, मग त्या वस्तूच्या संदर्भातले कायदे आणि सगळ्यात शेवटी येते ती वस्तू कशी वापरायची याची अक्कल. भ्रमणध्वनी उर्फ मोबाईल हा गाडी चालवताना वापरू नये ही अक्कल आजही अनेकांना नाहीच. उलट तसे न करण्याविषयी सुचवताच आपलीच अक्कल काढली जाते.

विषय: 
शब्दखुणा: 

घर संचार

Submitted by रणजीत धर्मापुरीकर on 20 August, 2011 - 05:42

तु घरी नसतेस तेंव्‍हा घर कसे डायलटोन गेलेल्‍या फोन सारखे वाटते । तो म्‍हणाला
तुम्‍ही घरी नसता तेंव्‍हा घर कसे सिमकार्ड नसलेल्‍या मोबाईल सारखे वाटते । ती म्‍हणाली
मुलं जवळच होती, ती म्‍हणाली आई, बाबा तुम्‍ही घरी नसता तेंव्‍हा आंम्‍हाला कसा फ्रिटॉक टाइम मिळाल्‍या सारखा वाटतो. आई, बाबा मुलांना म्‍हणली बेटयांनो तुम्‍ही घरी नसता तेंव्‍हा आंम्‍हाला घर कसे कव्‍हरेज क्षेत्राच्‍या बाहेर गेल्‍या सारखे वाटते ।

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मोबाईल आणि गेम्स -भाग २

Submitted by आदित्य चंद्रशेखर on 22 April, 2011 - 07:15

नमस्कार मित्रांनो,

आज बघूया गेमिंग कंपन्यांचं काम कसं चालतं ते!
गेमिंग कंपन्यांचं काम बरचसं आपल्या फिल्म इंडस्ट्रीसारखं आहे! कसं ते सांगतो.
चित्रपटाला प्रोड्यूसर असतो, गेमलाही असतो.
चित्रपटाला कथा असते, गेमलाही असते.
तिथे एका चित्रपटासाठी काम करणा-यांचा एक संघ असतो,(टीम असते, यात कलाकार आणि तंत्रज्ञ सगळेच आलेत.), इथेही तसंच असतं.
इतकंच नाही तर जिथे चित्रपट बनतो त्या जागेला स्टुडिओ म्हणतात, तसं इथेही स्टुडिओच म्हणतात, असे बरेचसे साम्यस्थळ आहेत.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मोबाईल