लॉलिपॉप

अँड्रॉईड व्हर्जन डाऊनग्रेड करणे

Submitted by पियू on 12 June, 2015 - 15:47

नुकतेच युनाईट २ (मायक्रोमॅक्स १०६) वर अँड्रॉईड लॉलीपॉप अव्हेलेबल झाले आणि मोठ्या उत्सुकतेने मी ते डाऊनलोड केले. माझा युनाईट २ किटकॅट चा लॉलीपॉप केला नी पस्तावले.

काही फिचर्स वगळता लॉलीपॉप व्हर्जन ने मोबाईलमधली इतकी जागा खाल्लीये कि बस.
याव्यतिरीक्त बटणे विचित्र जागी असल्याने फोनवर बोलता बोलता फोन म्युट होणे, स्पीकर ऑन होणे असले भयाण प्रकार होत आहेत.

तरी आता लॉलीपॉप डाऊनग्रेड करुन किटकॅट करणेचे आहे. तूनळीवर सर्च केले असता फास्टबूट नी लॅपटॉपला अ‍ॅटॅच करून रुट करणे इत्यादी मार्ग दिसताहेत. तर हे न करता डाऊनग्रेड करणे शक्य आहे का? कारण अपग्रेड करतांना मला असं काहीच करावं लागलं नव्ह्तं.

Subscribe to RSS - लॉलिपॉप