अँड्राईड डिव्हाईस मॅनेजर

मदत हवीय.... अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने लॉक केलेला मोबाईल....

Submitted by सांश्रय on 29 January, 2016 - 01:14

अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने मोबाईल संगणकावरुन पासवर्ड देऊन लॉक केला, पण पासवर्ड टाकताना मागे मराठी युनिकोड लेआऊट सुरु असल्याने पासवर्ड युनिकोड मध्ये टाकला गेला. आता पासवर्ड मोबाईलवरुन टंकताना त्यातील एक अक्षर मोबाईलच्या किपॅडवरुन टाईपच होत नाही (ते अक्षर Shift + # असे आहे) त्यामुळे मोबईल अनलॉक होत नाही. सदर पासवर्ड मोबाईलला एसएमएस ने पाठवून बफरमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण तसे होत नाहियं, मोबाईलच्या क्लिपबोर्डमध्येही टाकण्याचा प्रयत्न केला पण तरीही पासवर्ड अनलॉक स्क्रीनवर येत नाही. एक्स्टर्नल ओटीजी केबलने किबोर्ड जोडली तर तो फक्त इंग्लिश 26 कॅरॅक्टर किबोर्ड घेतो.

Subscribe to RSS - अँड्राईड डिव्हाईस मॅनेजर