अक्षरवार्ता

'बाइकवरचं बिर्‍हाड' - अजित हरिसिंघानी / अनु. सुजाता देशमुख

Submitted by चिनूक्स on 15 July, 2010 - 17:07

जे.आर.डी. टाटा नेहमी म्हणत - 'Live the life a little dangerously. आयुष्यात किंचित धोका पत्करल्यामुळेच त्यातला थरार आणि स्वान्तसुखाय तृप्ती मला मिळवता आली.' जे. आर.डी हे अजित हरिसिंघानींचे आदर्श असल्यानं साहजिकच वेडी धाडसं करणं, किंवा सुरक्षित, बंदिस्त आयुष्य न जगणं, यांत हरिसिंघानींना काही जगावेगळं वाटत नाही. अजित हरिसिंघानी हे वाचोपचारतज्ज्ञ आहेत. पुण्यात राहतात. पुण्यातच प्रॅक्टिसही करतात.

कर के देखो - संपा. श्री. सदा डुंबरे

Submitted by चिनूक्स on 1 June, 2010 - 08:01

दांडीयात्रेच्या वेळी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला होता. पण त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल शंका असणारे, घेणारे भरपूर होते. या मिठाच्या सत्याग्रहानं नक्की काय साध्य होणार? ब्रिटिश सत्ता हलायचीसुद्धा नाही तुमच्या चिमूटभर मिठाने.. अशी शंका घेणारे केवळ सामान्य लोकच नव्हते, तर मोतीलालजी नेहरूंसारखे नेतेही होते. मोतीलालजींनी गांधीजींना एक मोठ्ठं बावीस पानी पत्र लिहिलं. मोतीलालजी होते बॅरिस्टर. त्यांना नवीन मुद्दे मांडून समोरच्याला नामोहरम कसं करायचं, ते पुरतं ठाऊक होतं. 'या सत्याग्रहानं काहीही साध्य होणार नाही. झालंच तर हसं होईल.

अज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई

Submitted by चिनूक्स on 20 April, 2010 - 15:16

मोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे.

पाचट - श्री. योगीराज बागूल

Submitted by चिनूक्स on 22 March, 2010 - 00:21

बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतला मोठा दलित समाज ऊसतोडणीच्या कामाला लागला. या वर्गाला शिक्षणाचा गंध नव्हता. गाठीशी जमिनी नव्हत्या. असल्या तरी त्या बहुतेक निकस. पोट कसं भरायचं हा मोठाच प्रश्न उभा राहिला. अशातच सहकारी चळवळ उदयास आली. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपेढ्या भराभर स्थापन झाल्या. हे सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठी दारिद्र्यात खितपत असलेला, हाताला कामाची आणि पोटाला भाकरीची गरज आहे, अशा कामगाराची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे अनायासेच साखर कारखान्याच्या अगदी पायरीतल्या कामात, म्हणजे ऊसतोडीत हा साराच्या सारा समाज अलगद ओढला गेला.

विषय: 

त्रिपदी - श्री. गो. नी. दाण्डेकर

Submitted by चिनूक्स on 17 February, 2010 - 02:18

'त्रिपदी' हा श्री. गो. नी. दाण्डेकर या बहुआयामी आणि बहुप्रसव लेखकाच्या चोखंदळपणे निवडलेल्या स्फुटलेखांचा नवीन संग्रह. वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या निमित्तानं लिहिले गेलेले हे लेख आजवर कुठेही संग्रहित झाले नव्हते, ते आता या पुस्तकाच्या रूपाने एकत्रित वाचकांसमोर आले आहेत. या लेखांची प्रकृती लक्षात घेता या लेखांची सामान्यतः व्याक्तिविषयक, आत्मपर आणि ललितलेख अशी विभागणी करता येईल. म्हणून या लेखांच्या संग्रहाचं नाव 'त्रिपदी'.

विषय: 

कुमार माझा सखा! - डॉ. चंद्रशेखर रेळे

Submitted by चिनूक्स on 17 January, 2010 - 21:49

पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वेगळंच वळण दिलं हे सर्वश्रुतच आहे. विष्णु दिगंबर आणि त्यांच्या गांधर्व महाविद्यालयानं अनेक गायक व शिक्षक तयार केले. त्यांपैकीच एक प्रो. बी. आर. देवधर. विष्णु दिगंबरांनी ज्यांना गायनाबरोबरच शालेय शिक्षणाचीही परवानगी दिली, असे देवधर हे एकमेव विद्यार्थी. कलाशाखेची पदवी मिळवलेले देवधर मास्तर हे त्या काळी एकमेव शिक्षित असे गायक होते. विष्णु दिगंबरांच्या परवानगीने त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवले होते.

खरेखुरे आयडॉल्स - युनिक फीचर्स

Submitted by चिनूक्स on 22 December, 2009 - 01:29
दोन महिन्यांपूर्वी पुण्यात एका प्रसिद्ध वृत्तसमूहानं त्यांच्या एका साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम होणार होता. त्या आधी काही महिन्यांपूर्वीच प्रकाशकाका आणि मंदाकाकूंची एक मुलाखत तिथेच झाली होती. लोकांनी त्या मुलाखतीला प्रचंड गर्दी केली होती. तशीच गर्दी याही कार्यक्रमाला असेल, असं मला वाटलं होतं. म्हणून सहाच्या कार्यक्रमाला साडेपाच वाजता पोहोचलो, आणि थक्कच झालो. सभागृह अगोदरच प्रेक्षकांनी तुडुंब भरलं होतं. आतमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती.
शब्दखुणा: 

माझं नाव भैरप्पा - एस. एल. भैरप्पा / अनुवाद : उमा कुलकर्णी

Submitted by चिनूक्स on 1 December, 2009 - 13:12
लेखकाच्या, किंवा कुठल्याही कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि त्याने घडवलेल्या कलाकृतीचा संबंध असतो का? बहुतेक असावा. सृजनशील कलावंताचं आयुष्य आणि त्याच्या कलाकृती यांतील नातं तसं अगम्य असतंच. पण त्या कलावंताच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे थोडेफार समजले की मग ती कलाकृती अधिकच भावते. पिकासोचं आयुष्य, त्याच्या बायका, त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया यांच्याबद्दल कळलं की त्याची चित्रं सोपी होतात. त्याच्या चित्रातले रंग, त्याने वापरलेली प्रतिकं त्याचे मनोव्यापार कळले की लगेच उलगडतात.

रुमाली रहस्य - श्री. गो. नी. दाण्डेकर

Submitted by चिनूक्स on 2 November, 2009 - 12:24

श्रेष्ठ कादंबरीकार गो. नी. दाण्डेकर यांनी लिहिलेली एकमेव रहस्यकथा, किंवा कादंबरिका म्हणजे 'रुमाली रहस्य'. बालवयात गोनीदांवर नाथमाधव आणि ह. ना. आपट्यांच्या कथा-कादंबर्‍यांचा विलक्षण प्रभाव होता. 'ह. ना आपट्यांची कळस ही रहस्यकथा वाचूनच आपणही पुढे रहस्य प्रांतात शिरलो', असं गोनीदा म्हणाले होते.

'रुमाली रहस्य'चं कथानक अठराव्या शतकातल्या पुण्यात घडतं. मराठेशाही, नाना फडणवीस - घाशीराम कोतवाल - रामशास्त्री प्रभुणे यांच्या परिसर आणि सामाजिक - राजकीय पर्यावरणात घडणारी ही कादंबरिका गेली पंचेचाळीस वर्षे उपलब्धच नव्हती. मृण्मयी प्रकाशनाने ती नुकतीच पुनर्मुद्रित केली आहे.

शब्दखुणा: 

मैत्र जीवाचे - श्री. विदुर महाजन

Submitted by चिनूक्स on 6 October, 2009 - 01:16

माणूस एकटा येतो, आणि एकटाच जातो, हे काही खरं नाही. जाताना तो अनेकांचं सुख, झोप असं बरंच काही घेऊन जातो. अरुणा ढेर्‍यांच्या त्या कवितेतल्यासारखं.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अक्षरवार्ता