मृगजळ

सत्यासत्य

Submitted by पुरंदरे शशांक on 6 September, 2017 - 00:44

सत्यासत्य

लटिका संसार । गुंतवितो फार । सावलीचा भार । तैसे होय ।।

मृगजळी पूर । भय ते जीवास । साच अविनाश । दिसेचिना ।।

कृपाळुवा तुम्ही । सर्व संत जन । दाखवी निधान । सत्य थोर ।।

दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।

घेता अनुभूती । सत्याचीच सदा । गोंधळूक कदा । होईचिना ।।

निवांत निश्चल । होवोनिया मन । श्रीहरी चरण । चिंतीतसे ।।

ॐ तत् सत् ।।

निधान = ठेवा, खजिना

मृगजळ

Submitted by प्रेमांश on 29 October, 2013 - 01:11

ठगले नयनांनी तुझीया
हे मृगजळ मजला खरे दीसे
तू दीधली वीराहाची साथ मज अन तुटक होतसे मन श्वासे....
तू दीधाला मज अर्थ नवा अन
अनर्थ करुनी गेलीस तु
हदय सोडुनी गेलीस तु
अन जखम देउनी वीलागालीस तु
आठवतो मज तो स्पर्ष तुझा
अन तव मीठीचा हर्ष मला
रीत्या आठवणी मन ही रीते
अन तव वीराहाच्या झळ। मना
सुगंध तुझीया केसांचा बघ
श्वासान्मध्ये गुम्फीत्से
आठव येती तव साथीच्या अन
भकास मन हे होत पीसे
तुझवाचुन मी असे एकटा
आयुष्याच्या या वाळनी
न परत फीरे न क्रमन करे
मन वीव्हळत्से तुझ वाचोनी

शब्दखुणा: 

असंभव

Submitted by क्रांति on 20 September, 2011 - 08:26

पुन्हा एक भुलवणारा मिसरा!

मनासारखे घडतच नाही, म्हणून इतके अकांडतांडव?
कशास त्याची वाट पहावी? जे घडणे आहेच असंभव?

बुद्धी सांगे स्थितप्रज्ञ हो, मन गुणगुणते, हवे तसे कर
मन-बुद्धीच्या द्वंद्वामध्ये एकदा तरी मनास जिंकव!

रंग, कुंचला, कोरा कागद बघून हाती गगन बोलले,
किती तोकडे चित्र काढशिल? घे, या सार्‍या दिशाच रंगव!

भूतकाळ सरकत्या सावल्या, भविष्य वाळूवरचे मृगजळ
वर्तमान अनमोल देणगी, तुझी संपदा त्यातच गुंतव

जेव्हा जेव्हा तिला दिली मी मात, बोलली चिडून नियती,
वजीर कुठला, प्यादे कुठले? आधी या वादाला संपव!

अहंकार उन्मत्त गर्जला, मी हे केले, मी ते केले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मृगजळच

Submitted by सुधिर मते on 24 August, 2011 - 07:17

बंद ही दारे अशी
मोकळी मी करीत आहे
या ऊजाड माळराणावर
वाट तुझी बघत आहे

कढत् आहे, सलत आहे
ऊरात हे रुतत आहे
सागराला पुर आला
आसवेही वाहात आहे

जागलो मी, पेटलो मी
विझलो कधी नव्हतोच मी
ऊत्कटता दबुन होती
ह्रुदयास ग, या आस होती

फोडेन मी तोडेन मी
बन्धने ही कारागृहाची
फडफड ही काळजाची
सहवास का! दुर्मीळ आहे

अंत आहे, ही खंत आहे
महंत मी मुळीच नाही
बेवफा तुला कसे म्हणु
तो.. दुसरा पण संत नाही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मृगजळ