प्राजक्त

Submitted by मंदार खरे on 31 August, 2016 - 03:00

शुभ्र पांढरे पंख सानुले
नाजुक नार षोडशेपरी
जन्मजात वैराग्य लाभले
केशर कंठ श्वेतांबरी

शामल चंद्र प्रितीची
अलगद पसरे प्रभावळी
असह्य करती रविकिरणांनी
पारिजातक झडे पुष्पगळी

स्पर्शानेही कोमेजुनी जाती
अल्प आयुष्य ऊरी
मरतानाही गिरकी घेवुनी
सडा पसरावा पारिजातकापरी

समर्पण असे असावे
जगणे व्हावे गंधाली
कुळात कुठल्या जन्माहुनही
मुळात बहरावी प्राजक्तफुली

©मंदार खरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users