मायबोली गणेशोत्सव २०११

भारतीय लोकगीतांमधील गणेश - अरूंधती कुलकर्णी

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:57

ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥

मराठी मातीच्या आणि मराठी माणसाच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे प्रेम, श्रद्धा, भक्ती खरी बहरून येते ती गणेशोत्सवाच्या काळात! जागोजागी गणेशभक्तांचे मेळे, मंडपांत विराजमान गणपती बाप्पा मोरयाच्या आगमनार्थ रचलेले सोहाळे, रोषणाई - सजावटी - मंगल आरत्या, पठणांसह घरांघरांतून उत्साह, मांगल्य व आनंदाला आलेले उधाण... खास महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होणारा असा हा उत्सव! ढोल, ताशे, झांजांच्या गजरात वाजत-गाजत येणार्‍या गणरायांच्या आगमनाची प्रत्येक घरातून सारे वर्ष आतुरतेने वाट पाहिली जाते.

विषय: 

आरती की 'आरती' - केदार

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:54

गणपती यायला फक्त एकच महिना बाकी होता पण आम्हा कार्यकर्त्यांच्या कामाची सुरुवात तेव्हाच होते. रीतसर शेजारच्या सरवरला कोपच्यात घेऊन मीच अध्यक्ष होणार हे 'समजावून' सांगून पुढची दोन वर्षे त्याला देऊन टाकली. पण गोष्ट ती नाही, तर गोष्ट आहे... प्रेमाची, म्हणजे प्रेमा नावाच्या मुलीची नाही तर इंग्रजीत क्रश ज्याला म्हणतात त्या प्रेमाची! तसं माझं अनेक मुलींवर प्रेम बसलं (आता प्रेम उभं टाकलं हे म्हणता येत नाही म्हणून नाहीतर ते ही म्हटलं असतं) पण त्यातल्या त्यात हे आगळंवेगळं, गणपती प्रेम. आणि म्हणून सांगण्याचा उपद्व्याप.

विषय: 

तुंदिलतनु तरी... - साजिरा

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:41

पहिल्यांदा घरात गणपती बसवायचा हट्ट धरला तेव्हा आम्ही भावंडं सात-आठ वर्षांची असू. त्या आधी का कुणास ठाऊक, पण आमच्या घरात गणपती बसवण्याची प्रथा नव्हती. दादांनी या गोष्टीला आधी नाही म्हणून पाहिलं. त्यामागचं कारणही तसंच होतं.

विषय: 

परंपरा वगैरे - मंजूडी

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:37

एखादा दिवस असा उगवतो की त्या दिवशी घडणार्‍या सगळ्याच गोष्टींना एक विशिष्ट संदर्भ असतो. योगायोगच तो.. पण होतं खरं असं.

त्या दिवशी ऑफिसात आले. रीतसर स्थानापन्न वगैरे होऊन कॉम्प्युटर चालू केला. इन्बॉक्सात पडलेल्या खंडीभर मेलींपैकी त्या एका मेलीने माझे लक्ष वेधून घेतले... 'दिनूचे बिल'. काहीतरी लख्खकन् मनात चमकून गेले. इतर कामाच्या मेलींकडे दुर्लक्ष करून सगळ्यात आधी तीच मेल उघडली.

विषय: 

दवंडी २ : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 23:29

davandi2_0.jpg

*******************************************************************************************

पेंद्या : काय किस्नद्येवा! आजकाल दिसंना झाले तुमी गायी वळाया! लयी बिजी झाला जनू!

कृष्ण : मग! मला बोलावणं आलंय मायबोलीनगरीत साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवासाठी! तयारी करतोय जोरदार!

विषय: 

"तुझ्या गळा माझ्या गळा...." : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 23:26

tuzyagala.jpg

*********************************************

मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."

*********************************************

सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.

विषय: 

मायबोली शीर्षकगीत स्पर्धा (नियम) : "ज्योतीने तेजाची आरती..." - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 08:54

jyotine_0.jpg

भारताचे राष्ट्रगीत ..... महाराष्ट्राचे महाराष्ट्रगीत ........ मग मायबोलीचं आपलं स्वत:चं मायबोलीगीत का बरं नाही???

आपल्या मायबोलीवर कितीतरी प्रतिभासंपन्न कवी-कवयित्री आहेत. त्या सगळ्यांना यंदा ही सुवर्णसंधी आहे. आपल्या लाडक्या मायबोलीचं सुंदर वर्णन, तिचं तत्वज्ञान, तिचे पैलू उलगडून सांगणारं, छानसं चालीवर बसवता येईल असं गीत तयार करायचं... खास "मायबोली शीर्षकगीत".

आमंत्रण लेखन स्पर्धा (नियम) : "आवताण... लै वरताण" : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 08:51

avataan.jpg

****************************************************************************

काय आवडलं आमंत्रण? आपल्याला अनेक प्रकारची लिखित आमंत्रणं येत असतात. लग्न, मुंज, बारसं, वाढदिवस, सत्कारसमारंभ, पुस्तक प्रकाशन, कवी-संमेलन .... अशी कितीतरी! कधी कधी मुख्य समारंभाआधीच या निमंत्रण पत्रिका आपली अत्यंत करमणूक करतात - कारण आपलं 'आवताण' अधिकाधिक 'वरताण' करण्यापायी लोक काहीही लिहितात.

प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:20

adakari_1.jpg

**********************************************************

"हे जीवन एक रंगमंच. कधी आपण असतो या रंगमंचावरचे कलाकार. एखाद्या नटसम्राटाप्रमाणे आपण आपल्या भावना कधी हावभावातून तर कधी नुसत्या नजरेतून व्यक्त करतो आणि कधी आपण बनतो या रंगमंचावरचे सूत्रधार. मग आपला कॅमेराच बनतो आपली नजर आणि घेऊन जातो एका अनोख्या दुनियेत. पण कधी असतो आपण फक्त एक प्रेक्षक. या जीवनाच्या रंगमंचावर उमटणार्‍या सुख-दु:ख, आशा-निराशा यांची दृश्य बघणारे... नजरेने अनुभवणारे....

कलाकुसर स्पर्धा (नियम) : "कायापालट" - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:17

Kayapalat_0.jpg

**********************************************************

makeoverposter.jpg

**********************************************************


"कायापालट" स्पर्धेचे नियम:

१. ही स्पर्धा फक्त मायबोलीच्या सभासदांसाठी आहे.
२. या स्पर्धेसाठी तयार केलेल्या वस्तू स्वतः तयार केलेल्या असाव्यात.
३. कलाकृतीसाठी वस्तू निवडून त्याचा कायापालट करायचा आहे.

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०११