मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - शाम

Submitted by -शाम on 10 September, 2011 - 12:51

अमुची मायबोली

मायमराठी नव्या युगाचा
साज नवा हो ल्याली
रंग मराठी उधळत आली
अमुची मायबोली.....||धृ||

गुलमोहराचे बहर जणू हे
कथा कविता गझला
रंगबिरंगी लेखमालिका
अवघा धागा सजला
हितगुज करती एकमेकीशी
कला गुणांच्या वेली....||१||

कुणी दाखवी पाककला तर
कुणी दाखवी किल्ले
कुणी चालवी अपुला धागा
इथे झेलुनी हल्ले
लुटूपुटूची शब्द लढाई
हसू उमटते गाली......||२||

गंध मातीचा मराठमोळा
नसानसांनी भिनला
दूर विदेशी अता मराठी
आवाज हो दुमदुमला
अम्ही लेकरे सरस्वतीची
बोलू तिचीच बोली......||३||

. .............................................................शाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच.