ज्योतीने तेजाची आरती

मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - शाम

Submitted by -शाम on 10 September, 2011 - 12:51

अमुची मायबोली

मायमराठी नव्या युगाचा
साज नवा हो ल्याली
रंग मराठी उधळत आली
अमुची मायबोली.....||धृ||

गुलमोहराचे बहर जणू हे
कथा कविता गझला
रंगबिरंगी लेखमालिका
अवघा धागा सजला
हितगुज करती एकमेकीशी
कला गुणांच्या वेली....||१||

कुणी दाखवी पाककला तर
कुणी दाखवी किल्ले
कुणी चालवी अपुला धागा
इथे झेलुनी हल्ले
लुटूपुटूची शब्द लढाई
हसू उमटते गाली......||२||

मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - UlhasBhide

Submitted by UlhasBhide on 2 September, 2011 - 15:41

मायबोली-शीर्षकगीत

भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउनी ध्यास आली उदयास ‘मायबोली’ ║धृ║

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात ‘मायबोली’ ║१║

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली
साहित्य वाङ्मयाची, ही खाण ‘मायबोली’ ║२║

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली
सार्‍या नवोदितांची, ही माय ‘मायबोली’ ║३║

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची
परिणती सुसंवादी, घडविते ‘मायबोली’ ║४║

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’ ║५║

मायबोली शीर्षकगीत स्पर्धा : "ज्योतीने तेजाची आरती..." - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:38

मायबोली शीर्षकगीत स्पर्धा : "ज्योतीने तेजाची आरती..." - नियम

"ज्योतीने तेजाची आरती..." या मायबोली शीर्षकगीत स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

***************************************************

प्रवेशिका :

विषय: 
Subscribe to RSS - ज्योतीने तेजाची आरती