मायबोली गणेशोत्सव २०११

नैवेद्यम् समर्पयामि

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:24

nevaidya_0.jpg

गणपती घरी आले की त्यांच्या कोडकौतुकात घर कसं रमून जातं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार योग्य रितीने झाला पाहिजे याकडे सगळे लक्ष ठेऊन असतात, हो की नाही? बाप्पांकरता हरतर्‍हेचा नैवेद्य केला जातो, छानपैकी ताट सजवून बाप्पाला जेवू घातलं जातं. गणपतीचे लाडके मोदक तर असतातच पण शिवाय घरोघरच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींनी गणेशाला तृप्त केलं जातं.

विषय: 

सुप्रसिध्द आणि अप्रसिध्द गणपती मंदिरे

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:13

काही गणपती मंदिरे जगभर प्रसिध्द पावतात. मग ते एखाद्या मोठ्या शहरातील असो वा लहानशा गावातील. नवसाला पावणारे बाप्पा सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे. पण याबरोबरच काही वैशिष्ट्यपूर्ण बाप्पा असतात. त्यांची ख्याती दिगंत पसरली नसली तरी त्या ठिकाणच्या लोकांसाठी ते महत्त्वाचे असतातच.

आपल्याला माहित आहेत असे काही सुप्रसिध्द किंवा अप्रसिध्द गणपती मंदिरे?

TitwalaTemple3.jpg

विषय: 

विविध शहरांतील यंदाचे सार्वजनिक गणपती २०११

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:56

सार्वजनिक गणपती म्हटले की भव्य मूर्ती, आकर्षक, नेत्रदिपक आणि आगळीवेगळी, मोठ्या प्रमाणावरची सजावट, समयोचित विषयांना वाहिलेले देखावे, लखलखीत दिव्यांची आरास आणि भक्तजनांचा महासागर .... आलं ना चित्रं आपल्या डोळ्यापुढे!

इथे आपापल्या शहरातील काही महत्त्वांच्या गणपती उत्सवांची या वर्षीची प्रकाशचित्रे टाकावीत जेणेकरून सगळ्यांना घरबसल्या देशभरचे आणि परदेशातीलही सार्वजनिक गणपतींचे दर्शन होईल.

dagdusheth-ganpati 0831.jpg

विषय: 

आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:09

गणपती एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते.

आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. इथे आपण आम्हाला आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन फोटोद्वारे देऊ शकता. सजावट कशी केली आहे, त्यामागील उद्दिष्ट, कल्पना, उत्सव कसा साजरा करता इ. सर्व काही आम्हाला ऐकायला आवडेल.

Lajojee Ganpati 0831.jpg

(लाजोच्या घरचा यंदाचा गणपतीबाप्पा)

विषय: 

स्वरचित आरत्या, श्लोक, स्तुती, ओव्या, काव्य

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:00

e543_olde_tyme_writing_set-594x1024.jpg

देवाची अर्चना कोणी साग्रसंगीत पूजा करून करतात तर कोणी मानस-पूजा करतात. मार्ग कोणताही असो, मनापासून केलेली प्रार्थना देवाला पोहोचते.

देवाच्या चरणी आपली ओंजळ वाहावी असे सर्व भक्तांना वाटतच असते. त्यातून गणपती हा सर्व कलांचा अधिष्ठाता. त्याच्या चरणी जर कोणाला आपली काव्यपुष्पे वाहायची असतील तर इथे अर्पावीत ....

विषय: 

हास्य-दालन

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:53

मायबोलीचे सदस्य, भाऊ नमसकर, त्यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. यंदाच्या गणेशोत्सवाकरता त्यांनी सर्व भक्तांना हसवायचा नियम केला आहे. दर दिवशी एक नवे व्यंगचित्र या हास्य-दालनात आपले स्वागत करेल .....

स्मितरेषा ११

bhau11.jpg

स्मितरेषा १०

bhau10.jpg

स्मितरेषा ९

bhau9.jpg

स्मितरेषा ८

विषय: 

गणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38


बोला, गणपती बाप्पा मोरया!
विषय: 

कथा पूर्ण करा, शीर्षक द्या, लेखक/लेखिका ओळखा : शेवटचं वळण (कथा २) आणि प्रवेशिका

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 05:06

स्वेटर विणताना शेजारी जोरात आवाज करत खेळण्यातील गाडी चालवत असलेल्या आपल्या नातवाला म्हणजे अमेयला आजींनी आवाज कमी करण्याचा सल्ला दिला आणि नेहमीप्रमाणेच तो न ऐकता अमेय उलट अधिक आवाज करू लागला. समोरच्या फोटोतील पतीच्या चेहर्‍याकडे सहज नजर गेली आणि आजींचा श्वास रोखला गेला. मनातील विचारांना व्यक्ततेचे अमूर्त स्वरूप मिळाले तसे विचार सैरावैरा डोळ्यातून वाहू लागले.

विषय: 

कथा पूर्ण करा, शीर्षक द्या, लेखक/लेखिका ओळखा : शेवटचं वळण (कथा १) आणि प्रवेशिका

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 05:04

1188833234_vyas-vinayk.jpgही स्पर्धा नाही, पण तुमच्यातल्या लेखिकेला / लेखकाला आवाहन आहे. खाली एक अधुरी कथा दिली आहे. एका टप्प्यावर आणून ती सोडून दिली आहे. आता, ती तुम्ही पूर्ण करायची आहे.

याकरता, 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमध्ये एक वेगळा लेखनाचा धागा उघडा. त्यात ही अर्धवट कथा कॉपी पेस्ट करा आणि त्याखालीच तुमची कथा लिहा. मात्र इथल्या प्रतिसादात आपल्या धाग्याची लिंक जरूर द्या.

विसरू नका : कथा पूर्ण करण्याबरोबरच तिला शीर्षकही द्यायचे आहे.

विषय: 

गणेशोत्सव : काही आठवणी - दिनेशदा

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:59

सर्वसाधारण मुंबईतील कोकणस्थ म्हणत असतात, तसा आमचा गणपती गावाला. आमचे मूळ गाव राजापूर. म्हणजे आमच्या घराण्याचा मूळ गणपती तिथेच असतो. मला मात्र इतक्या वर्षात कधीही तिथे जाता आले नाही. पूर्वीदेखील गणपतीला एस्टीच्या जादा गाड्या सोडत असत. आताही असतात, आता तर रेल्वेच्या जादा गाड्या पण असतात. पूर्वी लोक गणपतीच्या सजावटीचे सामान घेऊन कोकणात जात असत. खूपदा गावचे घर बंदच असे. मग तिथे जाऊन साफसफाई करावी लागे. आता निदान कोकणातील घरात लोक राहतात.

गणेशचतुर्थीच्या आधी काही दिवस मात्र, मुंबई गोवा हायवे नुसता भरून वाहत असतो. एस्टीबरोबरच आता खाजगी गाड्याही भरपूर दिसतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०११