मागच्या महिन्याची गोष्टं! मी भारतात चाललोय हे बर्याच लोकांना माहिती होते. जाणे एका आठवड्यावर आले होते. तेवढ्यात 'फेसबुक' वर ह्याचा संदेश आला. 'गेले बरेच दिवस आपण ठरवतोय.....एकत्र मैफल करायची आहे...कधी करूया? आता तर तू चालला आहेस!' मी म्हणालो ह्या एका आठवड्यात कधीतरी जमवुया. लगेच दुसऱ्या दिवशी ह्याने परत उत्तर पाठवले 'शुक्रवारी दुपारी जमेल का? माझा सकाळी क्लास झाला, की मी मोकळा आहे...दुपारी दोन वाजेपर्यंत आहे...तू ६०३ नं ची बस पकड....माझ्या घराच्या समोर थांबते! जाताना ८.०० वाजता तुला परत घरी जायला बस आहेच! आणि खाली त्याने त्याचा पत्ता पाठवला. मी लगेच होकार कळवला.
रेडिओवर किंवा घरी सीडी वरती आपल्या आवडीचे गाणे लागते. नकळत आपण गुणगुणू लागतो.. गाण्याबरोबर मन आणि मान दोन्ही डोलायला लागते... बरोबर कुणी गानवेडा किंवा गान वेडी असेल तर त्याच्या बरोबर नकळत गाण्याची तारीफ, चर्चा , गायक, कवी , संगीतकार या पैकी एक किंवा सगळ्यांचे योग्य ते कौतुक होत असते. कधी कधी शब्द अगदी सर्वसाधारण असूनही संगीतकाराने काय कमाल केली आहे वगैरे चर्चा सुरु होते. मग कुठे, काय, आणि कसे वापरले आहे, सतार काय सॉलिड आहे किंवा काय गिटार चा पीस टाकला आहे, अमुक अमुक म्हणजे अफलातून संगीतकार आहे किंवा आहेत अशी जोरदार चर्चा पण होते.....

बरेचसे चित्रपट नाटके सहजपणे काळाच्या पदद्याआड जातात. साधारण एक वर्षानंतर चित्रपट साफ विसरले जातात. अनेक वर्ष लोकांना आठवतात. लोक पुन्हा आवर्जुन पहातात असे फारच थोडे चित्रपट व नाटके असतात.
चित्रपट पुन्हा पहायला काहीच अडचण नसते. ज्यांना चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट पहायचे असतात त्यांच्यासाठी सदाबहार चित्रपट पुन्हा पुन्हा येत रहातात. आजकाल सी.डी./डी.व्ही.डी च्या युगाततर हा पर्याय आणखीनच सोपा झालाय.
मराठी, हिन्दी गाण्यांच्या नोटेशन करिता हा बी बी चालु केला आहे. आपणास माहीत असलेल्या गीतांचे नोटेशन या ठिकाणी लिहू शकता. नोटेशन लिहिन्यासाठी पुढीलप्रमाणे नियमांचा वापर करावा.
०१. गाण्याची ओळ प्रथम लिहुन त्या खालच्या ओळीत नोटेशन्स लिहावेत.
०२. मंद्र सप्तकासाठी ठळक टाइप वापरावा. जसे कि,
म मॅ प ध॒ ध नी॒ नी
०३. मध्यम सप्तकासाठी रेगुलर लिहितो तसे लिहावे.
०४. तार सप्तकासाठी स्वरांच्या वर अनुस्वार दयावा. जसे कि,
सां रं॒ रें गं॒ गं मं मॅं पं धं॒ धं नीं॒ नीं