हिंदी, मराठी गाण्यांचे नोटेशन्स !!!!!
Submitted by हौसा on 21 January, 2010 - 05:13
मराठी, हिन्दी गाण्यांच्या नोटेशन करिता हा बी बी चालु केला आहे. आपणास माहीत असलेल्या गीतांचे नोटेशन या ठिकाणी लिहू शकता. नोटेशन लिहिन्यासाठी पुढीलप्रमाणे नियमांचा वापर करावा.
०१. गाण्याची ओळ प्रथम लिहुन त्या खालच्या ओळीत नोटेशन्स लिहावेत.
०२. मंद्र सप्तकासाठी ठळक टाइप वापरावा. जसे कि,
म मॅ प ध॒ ध नी॒ नी
०३. मध्यम सप्तकासाठी रेगुलर लिहितो तसे लिहावे.
०४. तार सप्तकासाठी स्वरांच्या वर अनुस्वार दयावा. जसे कि,
सां रं॒ रें गं॒ गं मं मॅं पं धं॒ धं नीं॒ नीं