हार्मनी म्हणजे काय?

Submitted by गजानन on 24 April, 2011 - 11:26

पाश्चात्य संगीतातली हार्मनी (Harmony) म्हणजे काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानन,
'थोर संगीतकार' या पुस्तकात प्रो. बी. आर. देवधरांनी 'हार्मनी' म्हणजे काय, आणि ती हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आहे की नाही, यावर बरंच लिहिलं आहे.

चिन्मय, हो. मी ते वाचले आहे.
मला थोडेफार कळले. त्यांनी त्यात सांगितल्याप्रमाणे भारतीय संगीतात ती नाही. हार्मनीवर इथल्या जाणकारांची अधिक चर्चा होईल अशी आशा आहे.

चांगला धागा, हार्मनीबद्दल माहिती वाचायला आवडेल. Happy हार्मनी हे रेझोनन्स बेस्ड संगीत आहे. असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतं. हे रेझोनन्स बेस्ड असल्याने यात कॉर्ड्सचा वापर प्रामुख्याने केला जातो.
हार्मनीबरोबर मेलडीबद्दल वाचायलाही आवडेल.

हार्मनी हा शब्द बर्‍याचदा फ्युजन संगीत प्रकारात ऐकण्यात आला आहे. त्यानिमित्ताने इथे काहीतरी वाचायला मिळालं.
http://aneeshpradhan.com/fusion-music-confusion-or-confluence/

लोकसत्तेत आलेल्या अच्युत गोडबोल्यांच्या लेखातून :

कुठल्याही संगीतात ‘मेलडी‘ (melody), ‘हार्मनी‘ (harmony) आणि ताल (rhythm) या तीन गोष्टी लागतात. भारतीय संगीतात ‘मेलडी‘वर खूप भर आहे, तर पाश्चिमात्य संगीतात ‘हार्मनी‘वर. ‘मेलडी‘मध्ये एक चाल असते- जशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशीत असते, तशीच. हिंदी वा मराठी गाण्यांना चाल लावली म्हणजे एका ठिकाणाहून सुरू करून इतर सुरावटींच्या जाळ्यातून संचार करून पुन्हा मूळ ठिकाणी यावं लागतं. म्हणजेच ती चाल किंवा ते वर्तुळ (सर्कल) पूर्ण होतं. समेवर येण्यामागचीही हीच कल्पना आहे. अर्थातच हे सगळं एका ठराविक तालावर चाललं असल्यानं ताल किंवा रिदम (rhythm) हा ‘मेलडी‘चाच एक महत्त्वाचा भाग मानायला हरकत नाही. यामुळेच हिंदुस्थानी संगीत मेलडी आणि ताल यांच्यावर आधारित असतं. याउलट, पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत मात्र वेगवेगळ्या वाद्यांच्या किंवा आवाजांमधल्या ‘हार्मनी‘वर आधारित असतं. हार्मनी म्हणजे अनेक सूर एकाच वेळी वाजवून त्यातून एक एकत्र चांगला इफेक्ट निर्माण करणं. यात तीनच सूर असले तर त्याला ‘ट्रायड‘ म्हणतात. यात ‘मेलडी‘सारखी ‘चाल‘ वगैरे नसते.

अरुंधती, इथे माझा गोंधळ आहे -

१. पाश्चात्य संगीतात ताल असतोच की.
२. पाश्चात्य संगीतात चाल असतेच की.
३. हार्मनी (म्हणजे व्याख्येनुसार एका सुरावटीला अनुकूल अशी दुसर्‍या सुरांची साथ) ही फक्त सौंदर्य खुलवण्यासाठी असावी असा माझा समज होता. पण त्यावरच ते संगीत आधारीत आहे म्हणजे काय?

डॉ. स्क्रिंझींकडे पाश्चात्य संगीतशास्त्राचे रितसर धडे घेतलेले प्रा. देवधर आपल्या संगीतात हार्मनी नाही असं ठामपणे सांगतात.

आम्हाला फिजीक्समध्ये अ‍ॅकॉस्टिक्समध्ये हार्मनी आणि मेलडी असे दोन टॉपिक्स होते बुवा. त्यावर प्रश्नही येत . अभ्यासक्रमातच असल्याने परीक्शा झाल्यावर विसरणे ओघाने आलेच Proud

संगीताशी त्याचा असलेला संबंध प्रॅक्टिकली कधी कळला नाही

गजानन, मी ''हार्मनी'' गाऊन दाखवून शकते... पण मलाही त्या विषयाची तांत्रिक माहिती नाही Proud
पण ह्या विषयातील माहितगार लोकांकडून काही ज्ञानकण मिळाले तर फारच छान. वरच्या माहिती खेरीज हार्मनी साठी हा दुवा वाचा : http://en.wikipedia.org/wiki/Harmony

छान धागा...
ह्म्म्म्म हार्मनी आणि मेलडी यावर अनेक तज्ञांची अनेक भाष्ये ऊपलब्ध आहेत.. गुगलून पाहिलेत तर लिंक सापडतील.
माझ्या अनुभव/माहितीनुसारः हार्मनी हे मूळ पाश्चात्त्य संगीतात वापरले जाते. हिंदुस्तानी संगीतात मुळात सुरांना मह्त्व अधिक आहे. तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला आपल्या संगीतातील काळी १, पांढरी २ वगैरे गायनाच्या/गायकाच्या/वाद्याच्या "पट्ट्या" आणि पाश्चात्त्य संगीतातील "कॉर्ड्स" या संकल्पना मुळात माहित असतील तर हार्मनी म्हणजे काय आणि त्याचे वेगळेपण लक्षात यायला मदत होईल.
अगदीच संक्षिप्तात लिहायचे तर, सा पासून नी पर्यंत एका सप्तकातील सूर व त्यांच्या ठराविक क्रमाने बांधलेल्या रचनांवर (आरोह, अवरोह, वगैरे) आपले राग अन एकंदर संगितीक रचना मुळात आकार घेतात. अशा रचनेचा एक थाट्/बाज असतो. त्या सर्वांचा मिळून एक शास्त्रीय राग तयार होतो... ज्याची स्वताची वैशीष्ट्ये, लक्षणे असतात (शुध्द स्वर, कोमल स्वर ई.) जो गाण्याची वेळ, ठरलेली असते. त्या संपूर्ण स्वर रचनेला पूरक असेच स्वर अख्ख्या गीताच्या चालीत आले तरच ती संगीत रचना अन ते स्वर एक सुसंबध्ध अन ठराविक अनुभव देवून जातात. ऊ.दा. "या चिमण्यांनो परत फिरा रे" या पुरिया धनाश्री रागातील विरह भाव, आगतिकता, वगैरे कायम आहेत... त्या रचनेत "ही चाल तुरू तुरू" या गीतातील स्वर (क्रम) बसू शकत नाहीत... त्याने मूळ रचनेच्या भावनेला तडा जाईल. थोडक्यात तिथे कुठलेही सूर वापरून चालणार नाहीत. यालाच पूर्णतः स्वरावर आधारीत रचना म्हणाता येईल..
गम्मत अशी आहे की कुठल्याही एका सप्तकातील शेवटचा "सा" ह पहिल्या "सा" चे तीव्र फ्रिक्वेंसी रूप असते. तेव्हा एखाद्या गाण्यात पहिल्या (मूळ) सप्तकातील सूर वापरून केलेली रचना आणि तीच रचना पुन्हा "तीव्र" सप्तकातील तेच सूर वापरून असे दोन्ही एकत्र वाजवले वा म्हटले तर कानांना फारसे खटकत नाही... मूळ सप्तक व तीव्र सप्तक यातील सुरांचा फरक जाणवतो पण एकंदर रचनेवर्/गीताच्या भावावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. तसेच मूळ सप्तकापेक्षा खालच्या सप्तकात तेच स्वर एकत्रीतपणे वाजवले तरीही विपरीत परिणाम होत नाही-- काही थोडेसे अपवाद आहेत. याच्प्रमाणे एकाच सप्तकातील तीन वा अधिक सूर एकत्रीतपणे वाजवल्यास त्यातून एका वेगळ्याच मिश्र सूराचा आवाज येतो (mixed frequency) ज्यामूळे एक वेगळ्या प्रकारचा भाव ध्वनित होतो. अशा एकत्रीतपणे तीन वा अधिक सूरांच्या संचाला "कॉर्ड्स" म्हणतात. पाश्चात्त्य संगीतात कुठल्या कॉर्ड्स वाजवल्या की आनंद, दु:ख, उन्माद, ईत्यादी भाव सूरातून ध्वनीत होतात याचे काही नियम्/लक्षणे आहेत. अगदी तसेच जसे आपल्या संगीतात शुध्ध्/तीव्र सूरातून अनुभवास येणारे भाव व कोमल सुरातून अनुभवास येणारे भाव वेगळे असतात तसेच..
पाश्चात्त्य संगीतात मूळ "चाल" असली तरी ते गीत फुलवण्यासाठी "कॉर्ड्स" वर भर दिलेला असतो. अर्थातच तीन्-चार सप्तकातील अशा अनेक कॉर्ड्स एकमेकास पूरक असू शकतात (frequency progressions based on common difference!) त्यामूळे पाश्चात्त्य संगीतात एकाच चालीत्/गीतात अशा अनेक कॉर्ड्स वाजवून एक वेगळेच प्रस्तुतीकरण करता येते. चर्च मध्ये जर ऑर्केस्ट्रा ऐकला असेल तर पुरुष व स्त्री गायक अशा वेगळ्या कॉर्ड्स वा सप्तकात गावून देखिल स्वरांचा एकत्रीत परिणाम एकमेकास पुरक असाच ठरतो.
थोडक्यात, कानाला न खटकता, मूळ चालीच्या सजावटीत एक वेगळीच भर घालण्याचे वा प्रस्तुतीकरण करायचे काम हार्मनी मूळे शक्य होते. थोडक्यात कुठल्याही सप्तकातील कॉर्ड्स च्या सहाय्याने मूळ सुरावटीला धक्का न देता ती रचना/गीत फुलवणे हे हार्मनी मूळे शक्य होते.
आपल्या संगीतात मात्र एकदा एखादी रचना एखाद्या भावनेच्या अंगाने स्वरबध्ध केली की त्यात कुठलाही ईतर दुसरा सूर टाकला तर तो कानाला खटकतो.
बाकी ईतर तांत्रिक गोष्टी खूप आहेत जसे की विविध सप्तकातील सात सुरांचे एकमेकांशी असलेले frequency relation...
पंचम (आर्.डी.बर्मन) ने या हार्मनी वा पाश्चात्त्य संगीताचा वापर आपल्याकडे सर्वात जास्त केला.. त्याच्या अनेक रचनांमधून कॉर्ड्स, हार्मनी मध्ये वाजणारी वाद्ये, हार्मनीमध्ये गाणारा कोरस, ईत्यादी चा अतीशय कौशल्यपूर्ण वापर आढळतो. बेस गीटार, ट्रंबोल, ईत्यादी अनेक वाद्ये त्याने "प्रथम" वापरली.
हिंदी गाण्यांची दोन ऊ.दा. ऐकलीत तर हार्मनी म्हणजे काय हे नेमके लक्षात येईलः
१. जानेजा ढूंडता फिर रहा (जवानी दिवानी): या गीतात पहिल्या कडव्यांनंतर किशोरदा पुन्हा ध्रुव पद म्हणतात त्याबरोबर आशा ताईंनी गायलेला आलाप हा हार्मनीमध्ये आहे.
२. जानेमन जानेमन तेरे दो नयन (चित्रपटः छोटीसी बात): यात पहिल्या कडव्यानंतर येशू दास पुन्हा ध्रुव पद म्हणतो तेव्हा आशा ताईंनी त्याबरोबर गायलेली सुरावट हार्मनी मध्ये आहे.
३. सत्ते पे सत्त मधिल फेमस गीत "प्यार हमे कीस मोड पे ले आया"... यात पहिल्या खालच्या सुरांतील ओळी झाल्यावर नंतर थेट तीव्र स्वरात गायलेले गीत (ते सर्वजण गाडीत बसतात तेव्हा) हे देखिल हार्मनी चे उत्कृष्ट ऊदाहरण आहे.

आपल्या संगीतात हार्मनी नाहीच असे मी म्हणणार नाही... कारण आपल्याकडे देखिल सा, ग, प हे तीन सूर एकत्रीतपणे वाजवून (उदाहरणादाखल) एखाद्या बंदीशीत वा रचनेत काही विशीष्ट ऊठाव आणला जातो. आपले संगीत मुळात सूर अन त्यांचा क्रम्/रचना यावर आधारीत आहे. कारण सूर absolute frequency आहेत, कॉर्ड्स मात्र derived frequencies आहेत. दोघे एकमेकाला पुरक असणे एव्हडेच महत्वाचे आहे!

योग उत्तम पोस्ट. शास्त्रीय संगीतासारखे बरेच डोक्यावरून गेले पण थोडी कल्पना आली. शक्य झाल्यास आण्खी उदाहरणे दिल्यास अधिक कळेल...

योग, चांगली पोस्ट.
खालील वाक्य कन्फ्युसींग आहे म्हणुन थोडा खुलासा:
> कारण सूर absolute frequency आहेत, कॉर्ड्स मात्र derived frequencies आहेत.

absolute च्या ऐवजी pure (म्हणजे एकच कंपनांक) आणि derived च्य ऐवजी composite (म्हणजे एकापेक्षा जास्त कंपनांक)
कारण तसे पाहिल्यास पाश्चात्य स्वर absolute असतात तर भारतीय relative (म्हणजे दोन लोकांचे 'सा' सारखेच असायची आवश्यकता नसते - पाश्चात्य संगीतात मात्र C# म्हणजे C#)

चार-चार "voices" मध्ये हार्मनाईज करण्यात बाख पटाईत होता. त्या चांगल्या व्हाव्या म्हणुन तो अनेक क्लिष्ट नियम वापरायचा. येथे काही आढळतीलः http://aaowen.com/index2.php?option=com_content&do_pdf=1&id=28

या बाखच्या दुव्यातील मला काही कळते असे नाही Happy

योग, मस्त माहिती. धन्यवाद.

>> absolute च्या ऐवजी pure (म्हणजे एकच कंपनांक) आणि derived च्य ऐवजी composite
अनुमोदन.

योग, अनेक धन्यवाद. तुमच्या पोस्टमुळे हार्मनी समजून घ्यायला मदत होतेय. मला पूर्ण कल्पना आली आहे, असे नाही पण मी पुन्हा वाचून माझे काही प्रश्न असतील तर विचारतो.

अरुंधती, हार्मनी एकट्याने गाऊन दाखवता येते? कशी? (म्हणजे एकाच वेळी एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या वारंवारतेचे स्वर कसे काढू शकेल?)

>>absolute च्या ऐवजी pure (म्हणजे एकच कंपनांक) आणि derived च्य ऐवजी composite (म्हणजे एकापेक्षा जास्त कंपनांक)

आश्चिग,
धन्यवाद! अगदी अचूक लिहीलेस...

आपल्याकडे रविंद्र संगीत हे हार्मनी च्या सर्वात जास्त जवळ जाणारे आहे असे मला वाटते. बंगाल मध्ये विशेषतः पेटी वा सूर वादनात कॉर्ड चा वापर करायची फार जुनी परंपरा आहे. किंबहुना बंगाली पेटी एकसुरी नसते, जास्त भरलेली वाटते असे अनेकांचे मत आहे. गझल गायनात देखिल कॉर्ड्स चा वापर खूप प्रमाणात केला जातो. पंजाबी संगीतात, गुरुद्वारा मध्ये वगैरे देखिल निव्वळ एका सुरात नाही तर कॉर्ड्स्/हार्मनी मध्ये असणारे सादरीकरण असते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की निव्वळ शास्त्रीय संगीत आणि त्याचे सादरीकरण याचा मुख्ख्य हेतू/फोकस हा "सूर" असतो. सुराभोवती मग ताना, फिरत, ख्याल, ताल ईत्यादीची सजावट असते. भावगीत्/रविंद्र संगीत्/गझल्/भजन ईत्यादी मध्ये सुराबरोबरच किंवा त्यापेक्षा थोडा अधिक फोकस "भाव" यावर असतो. अशा वेळी सादरीकरण करताना, हार्मनी, कॉर्ड्स, ईत्यादी अत्यंत ऊपयुक्त ठरतात. "भर आणि जोड" देण्याचे काम त्यामुळे होते. पूर्वी नाट्यसंगीतात ऑर्गन्/पायपेटी वाजवणारे अत्यंत निष्णात वादक सूर आणि कॉर्ड्स्/हार्मनी याचा अतीशय उत्तम वापर करत असत. मूळ ऑर्गन चे वादन हे कॉर्ड्स /हार्मनी वर अधिक खुलणारे आहे. तेव्हा ते दोन्ही हाताने वाजवले जाते. पेटीचे तसे नाही... निव्वळ सूरातून पेटी वादन सजवले जाते.
बर्‍याचश्या भजन गायनात तुम्हाला तीन चार प्रकारच्या झांज, मंजुळा वाजवलेल्या आढळतील. त्या सर्व वेगवेगळ्या सूरात (मुख्ख्य फ्रीक्वेंसी) वाजत असल्या तरी एकत्रीतपणे त्यांचा परिणाम एक वेगळीच मजा देवून जातो.
प्रत्त्येक वाद्याचा स्वताचा एक सूर्/ध्वनी असतो तो दुसर्‍या कुठल्या वाद्याशी पुरक्/सुसंगत ठरेल हे कळणे म्हणजेच हार्मनी कळण्यासारखे आहे... थोडक्यात एकेमेकास पुरक अशी सूर/वाद्य यांची एकत्रीत रचना यास हार्मनी म्हणता येईल. हार्मनी च्या दृष्टीकोनातून खालील "जोड्या" लावता येतील:

तालवाद्ये:
तबला-ढोलकी (पूर्वीच्या चित्रपटातील अनेक लोकगीते)
नाल्-ढोलक (सरसो का साग आणि जोहर, चोप्रा मंडळींचे चित्रपट- सिलसिला चित्रपटातील गीते)
म्रुदुंग्-घटम (दाक्षिणात्त्य... रेहमान बाबा फेमस!)
खोल (बंगाली वाजवतात ते, स.दे. बर्मन फेमस...) - डुग्गी

तारवाद्ये:
सितार्-सरोद
गिटार्-सरोद (रैना बिती जाये, मेरा कुछ सामान)
मेंडोलीन्-बुलबुलतरंग (अनेक कव्वाल्या)
व्हायोलिन्-सितार्-सॅक्सोफोन (तारवाद्य नाही- हवा वाद्य) (बडे अच्छे लगते है- बालिका वधू)

हवावाद्ये:
बासरी-शेहनाई-बीण (दूर कोई गाये धून ये सुनाये..., पूर्वीची अनेक गीते)
बासरी-सॅक्सोफोन
बीण्-पुंगी (नागिन आधारीत गाणी)
बाजा-अ‍ॅकॉर्डीयन (राजकपूर हातात घेवून वाजवायचा ते)
अ‍ॅकॉर्डीयन्-व्हायोलीन (अजीब दासता है ये....)

ताल/बोल वाद्ये:
झांज्-तबला
झांज्-घुंगरू (लावण्या, काही भक्तीगीते)
संतूर्-जलतरंग

ईतरही अनेक वाद्ये आहेत... थोडक्यात एकाच गटातील वाद्ये वा सर्व गटातील वाद्ये एकमेकाबरोबर कल्पकतेने रचनेत एकत्रीत बांधली तर एक ऊत्तम हार्मनी तयार होते. तीन चार वाद्ये एकत्रीत करून एक वेगळेच सांऊड टेक्स्चर देण्यासाठी देखिल हार्मनी या संकल्पनेचा उत्तम ऊपयोग केला जातो. (पंचम ने या गीताला दिलेले संगीत- धन्नो की आखो मे चांद का सुरमा... या गीतातील वाद्य संगीत ऐका. गूढ्/विचीत्र/खोलवर रूजणारे अशा भावनांचा संगम अनुभवास येतो...) मराठीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनीही त्यांच्या अनेक रचनांतून कॉर्ड्स, हार्मनी याचा अतिशय ऊत्तम वापर केला आहे.

आजकाल बीण, शेहनाई, बासरी ईत्यादी एकत्रीत करून एक वेगळ्याच प्रकारचे साऊंड टेक्स्चर बनवले जाते त्याला "टूटी" म्हणतात. "गण गण गणात गणपती" या अलबम मधिल शेवटच्या निरोप गीतात ते आम्ही वापरले होते.

असो. ईतर रसिक आणि तज्ञांची मते ऐकायला आवडतील..

योग, सोप्या भाषेत उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद. Happy

गजानन, मी तुम्हाला एक ओळ गायला लावली असती व त्या सुरावटींना साजेशी हार्मनी गाऊन दाखवली असती Proud Lol

>>गजानन, मी तुम्हाला एक ओळ गायला लावली असती व त्या सुरावटींना साजेशी हार्मनी गाऊन दाखवली असती
पुढील गटग ला हा आयटम ठेवायला हरकत नाही Happy

गजानन, मी तुम्हाला एक ओळ गायला लावली असती व त्या सुरावटींना साजेशी हार्मनी गाऊन दाखवली असती <<<

अरे बापरे! ह.दि.दे.चु.स. मधले 'चिंगारी कोई भडके' आठवतंय? ते पार्श्वगायन माझंच आहे, असं वाटावं इतकं ते माझ्या गायकीशी मिळतंजुळतं आहे. Proud

योग, धन्यवाद. तुम्ही नमूद केलेली ही गाणी आता बारकाईनं ऐकायला पाहिजेत.

>>अरे बापरे! ह.दि.दे.चु.स. मधले 'चिंगारी कोई भडके' आठवतंय? ते पार्श्वगायन माझंच आहे, असं वाटावं इतकं ते माझ्या गायकीशी मिळतंजुळतं आहे
गजानन,
त्यातच "हवा का झोका" पण आहे... तेही जुळते का? Happy ती एक विस्मयजनक हार्मनी ठरेल!
~ हलके घ्या !

एकेमेकास पुरक अशी सूर/वाद्य यांची एकत्रीत रचना यास हार्मनी म्हणता येईल>>>> योग... समजण्याच्या जवळ पोचतोये असे वाटते आहे. छान लिहिलेस!

हं! विशारदला असताना सरांनी खूप छान नोट्स दिल्या होत्या हार्मनी आणि मेलडीवर.
पाश्चात्य संगीतात हार्मनी असते आणि हिंदुस्थानी संगीत मेलोडियस असते असं काहीसं आठवतंय.
योग आणि अश्चिग छान सांगताय !

छान

जामोप्या तुम्हाला असले धागेही वर काढता येतात हे नव्हते माहित. धन्यवाद.

योग खूप सोप्या शब्दात समजावून सांगितलेत. बरेचसे कळले. राजू भारतन यांचा एक लेख होता त्यात त्यांनी काही हिंदी चित्रपट गीते दिली होती हार्मनीवरची. आता एकच आठवत आहे - ओ दूर के मुसाफीर हम लो भी साथ ले रे ले

इंग्रजी चित्रपटातले मला कळलेले हार्मनीचे उदाहरण 'सिस्टर अ‍ॅक्ट २' यात आहे. व्हूपीच्या शाळेची मुले जो कॉयर(?) सादर करतात तो. सराव करून घेताना व्हूपी प्रत्येक विद्यार्थ्याला अथवा एका समुहाला सूर ठरवून देते. मग अंतिम सादरीकरणात को परीणाम साधतो आणि 'joyful joyful' या गाण्यातून आपल्याला खरेच joyful वाटते ते मला कळलेले हार्मनीचे उदाहरण. यात प्रत्येकाचा सूर वेगळा आहे कधीकधी तर चाल ही मागे चालणार्‍या समुह गायनापेक्षा वेगळी आहे. (यात तो एक मुलगा एक खूप वरचा सूर लावतो - आपल्या बेगम अख्तर सारखा किंचीत फाटलेला - तेंव्हा तर रोमांच येतात अंगावर)

मला जितके समजलेय त्यावरून -
साधारणतः भारतीय संगीत हे 'vocal follower' आहे. त्यामुळे सुरांची बढत एकामागोमाग एक अशी होते. साधारण पणे म्हणूनच, भारतीय वाद्द्ये सुद्धा 'vocal' आवाज काढायला जातात.. गळ्यातून एका वेळी एकच सूर निघू शकतो म्हणून भारतीय संगीत हे 'मेलडी' प्रधान आहे..
पाश्चात्य संगीत तसे नाही. त्यांचा भर हा 'vocal follower' नाही. म्हणून त्यांच्या संगीतात एकावेळी अनेक सूर वाजवून वातावरण निर्मिती केली जाते . म्हणून 'हार्मनी'.

Pages