आंतरजाल आणि प्रताधिकार कायदा यांतले परस्पर संबंध यात भरपूर अस्पष्ट गोष्टी आहेत. पण दिवसेंदिवस या गोष्टी स्पष्ट होत आहेत. आज अमेरिकेत यावर भरपूर खटले चालू आहेत आणि काही खटल्यांचे निकाल या स्पष्टीकरणाला मदत करत आहेत. "Fair use" हे तत्व म्हणजे नक्की काय आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत जाते हे ही या खटल्यांमधे तावूनसुलाखून निघते आहे. या खटल्यांमधून भरपूर पैशांची उलाढाल चालू आहे.
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्या, त्यांना कुस्करणार्या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.