"सेफ, अ‍ॅण्ड फोर" - रिची बेनॉ

Submitted by फारएण्ड on 10 April, 2015 - 13:03

७०-८० च्या दशकातील इंग्लंडमधल्या एखाद्या मैदानावर चाललेली टेस्ट. तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा साधारण पॅव्हिलियन च्या बाजूने एक कॅमेरा लावलेला असे, आणि बराचसा खेळ त्यावर दिसत असे. त्यामुळे मुख्य पिच व जवळचे फिल्डर्स त्यावर दिसत. बाकीचे कॅमेरे अधूनमधून टीव्ही कव्हरेज वर येत. अशीच एक मॅच. बॅट्स्मन एक फटका हवेत मारतो आणि तो स्क्रीन वर दिसणार्‍या भागाच्या बाहेर हवेत जातो. अशा वेळेस दुसरा कॅमेरा आपल्याला तिकडे नेइपर्यंत बघणार्‍याच्या डोक्यात येणार्‍या दोन प्रश्नांची उत्तरे रिची बेनॉ कमीत कमी शब्दांत देतो, "Safe, and Four"! तेथे कोणी कॅच घेतला का, आणि नसेल तर फोर गेली का, बास!

सध्याच्या फिल्डर पेक्षाही जास्त बॉल बडबडीत चेस करणार्‍या, लांबच लांब वाक्ये बोलून तरीही फारशी माहिती न देणार्‍या ("Raina is going after it, will it cross the boundary, it probably will... no he stops it inches before. will they run 3?...") कॉमेण्टेटर्सच्या तुलनेत या जुन्या मॅचेस मधल्या कॉमेण्टरीचे वेगळेपण लगेच जाणवते.

खरे सांगायचे तर एक जबरी कॉमेण्टेटर यापेक्षा बेनॉबद्दल खूप सखोल माहिती नाही. तो खेळाडू म्हणूनही ग्रेट होता, चांगला स्पिनर आणि कप्तान होता, भारतातही चांगला खेळून गेला आहे हे वरवरचे माहीत आहे. पण एक कॉमेण्टेटर म्हणून त्याचा खेळाचा, खेळाडूंचा अभ्यास जबरदस्त होता. त्यापेक्षाही खेळातील विविध स्टेजेस मधे आपल्याला समोर जे पटकन समजत नाही ते सहज 'पिक' करून ते सांगण्याची त्याची पद्धत इतरांपेक्षा त्याचा वेगळेपणा दाखवून द्यायची.

चॅनेल ९, इएसपीन, स्टार स्पोर्ट्स वगैरे वर रिची बेनॉ, बिल लॉरी, इयान चॅपेल, बॉयकॉट, गावसकर, वगैरे लोक असले की कॉमेण्टरीला एक वेगळाच क्लास आहे असे वाटते. त्यात सहसा रिची बेनॉ बरोबर एक दोन भरपूर बोलणारे कॉमेण्टेटर असत. पण त्याचबरोबर समोर जी गेम चालू आहे ती जज करण्याचे, व त्याबद्दल कमीत कमी शब्दांत बोलण्याचे कौशल्य, हे रिची बेनॉच्या कॉमेण्टरीला वेगळेच वजन देउन जायचे. त्यामुळे तो बोलू लागला की लोक लक्ष देउन ऐकत.

त्याचे असंख्य कोट्स माझे फेवरिट आहेत. जे आत्ता लक्षात आहेत ते खाली देत आहे. जसे आणखी आठवतील, सापडतील तसे देइन. तुम्हीही द्या.

"That’s it. Well I think it's only logical. If you need to get 24 runs to avoid follow-on, why wouldn’t you get it in 4 hits"
१९९० च्या लॉर्ड्स कसोटीत भारताच्या ९ विकेट्स गेल्या होत्या व कपिल स्ट्राईक वर होता. २४ रन्स हवे होते. एडी हेमिंग्ज च्या त्या ओव्हर मधे त्याने ४ सिक्सेस मारून फॉलो ऑन टाळला (आणि पुढच्या ओव्हर मधे हिरवानी आउट झाला). तेव्हा बेनॉ ची ही कॉमेण्ट.

"Oh no! Now that could be the match!"
पुन्हा कपिल. १९८५ च्या वर्ल्ड सिरीज कप मधे न्यूझीलंड विरूद्ध सेमी फायनल मधे आधीचे लोक वेगात खेळू न शकल्याने "आस्किंग रेट" बराच वाढला होता. तेव्हा कपिल खेळायला आला. त्यानंतर साधारण १८ वर असताना त्याचा कॅच किवीज नी सोडला. तेव्हा ही भविष्यवाणी. नंतर कपिल ने ३० बॉल्स मधे ५० मारून मॅच जिंकून दिली.

“Is it possible that Imran Khan might just be getting Greg Chappell’s measure?”
ही क्लिप माझ्या दुसर्‍या ("बाउन्सर्स आणि यॉर्कर्स") लेखातही आहे. इम्रान ग्रेग चॅपेल ला ज्या तर्‍हेने सेट अप करत होता ते बहुधा रिची बेनॉ ने ओळखले. नंतर पुढच्याच बॉल ला ग्रेग चॅपेल ची दांडी उडाली.

याखेरीज अनेक अॅशेस मॅचेस, ऑस्ट्रेलियातील इतर टेस्ट्स, भारताच्याही अनेक मॅचेस मधे तो होता. १९९८ च्या शारजाच्या (डेझर्ट स्टॉर्म) स्पर्धेतही त्याने कॉमेण्टरी केलेली आहे. आता त्यातील क्लिप्स पुन्हा बघायला हव्यात.

तुम्हीही द्या माहीत असतील तर अजून!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! रिची बेनॉ ह्या नावाचा उच्चारही नीट माहित नव्हता (बेनॉड असं म्हणलं जायचं) त्या वयापासून 'क्रीकेट म्हणजे रिची बेनॉचा आवाज ' हे समीकरण डोक्यात पक्क बसलं आहे. मॅच चालू असताना, पाहणार्‍या प्रत्येकालाच जे सहजपणे दिसतं, त्यापेक्षा अधिक काहीतरी त्याला दिसायचं आणि त्याबद्दल तो अतिशय योग्य आणि मोजक्या शब्दात बोलायचा कॉमेंट्री करताना ही त्याची खासीयत मला फार आवडायची.
त्याचा खेळ फारसा कधी पाहिला नाही, पण त्याच्यामुळे खेळ पहायची/ ऐकायची आवड लागली...
जुन्या क्लीप्स पहायला हव्यात !

मस्त लेख !! काय गंमत असते, नुस्ते त्या कपिल च्या खेळीचं वर्णन, ड्रॉप्ड कॅच हे ४ ओळीत वाचलं तरी एक्साइट व्हायला होतंय Happy ती मॅच तर बघितलीच नाहिये मी!

बेनॉबद्दल वाचून फार वाईट वाटले. रेस्ट ईन पीस रिची.

छान लिहिलंय! मैदानाबाहेर राहूनही क्रिकेटचं जंटलमन स्पिरिट जपणार्‍या आणि वाढवणार्‍या लोकांत रिची बेनॉ कायम अग्रगण्य राहिल.

वरच्या यादीत टोनी ग्रेगचे नाव राहिले. Happy
टोनी ग्रेग निवर्तल्यानंतर बेनॉची एक मस्त मुलाखत आली होती टोनी आणि एकंदर क्रिकेट व कॉमेंट्रीबद्दल.
लिंक शोधून टाकतो इथे.

कॉमेंटेटर आणि खेळाडू म्हणूनही श्रेष्ठ असलेला रिची बॅनो!

मात्रं १९९१-९२ च्या वर्ल्डकपमधील सेमी फायनलचा ज्या पावसाच्या नियमामुळे फियास्को झाला (तो डकवर्थ - लुईस नियम नव्हता. तो नंतर आला), त्याचा एक जनक रिची बॅनॉ होता हे किती जणांना माहीत आहे?

http://www.espncricinfo.com/ci/content/story/508066.html

याच निमयाचा त्याच वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये आपल्याला फटका बसला होता.

मस्त लेख फा! शारजामध्ये पण तो होता हे आठवत नाही. आम्ही टोनी ग्रेग आणि जेफ्री बॉयकॉटलाच जास्ती ऐकल्याचे आठवते. शारजातली सिरीज परत पहावी लागेल खरोखर!

He was one of the best all-rounders. लेगस्पिनर ला साजेशी अ‍ॅटकिंग बॅटीग. He was one of the thinking captain. लहानपणी ज्यांचे उच्चार कळू शकायचे अशातला एक होता. क्रिकेटबद्दल काहि समजण्यामागे ज्या दोघांचा वाटा आहे त्यातला एक (दुसरा बॉयकॉट). त्याची detach राहून केलेली मार्मिक नि अचूक commentary हा माझा आवडता प्रकार होता.

रेस्ट ईन पीस रिची !!!

---
अवांतर : हाजेनबर्ग तू ह्याबद्दल म्हणतो आहेस का ?
http://www.espncricinfo.com/australia/content/story/598960.html
http://www.telegraph.co.uk/sport/cricket/news/9770748/Richard-Benaud-rem...

Greatest Cricket analyst I have heard. Fair, impartial and an astute judge of cricket.

You only have to see and listen to what he said about the famous underarm incident to understand that.

http://www.hauraki.co.nz/news/sport/richie-benaud-reacts-to-the-underarm...

Richie Benaud's Rules of commentary

1. Never ask for a statement
2. Remember the value of a pause
3. There are no teams in the world called "We" and "They"
4. Avoid cliches and banalities
5. The Titanic was a "tragedy", the Ethiopian drought was a "disaster" and neither bears any resemblance to a dropped catch
6.Put your brain into gear before opening your mouth
7.Concentrate fiercly at all times.
8. Above all, don't take yourself too seriously, and have fun

True gentleman and a great cricketer!!

RIP!!!

मस्त लेख फा !

आम्ही टोनी ग्रेग आणि जेफ्री बॉयकॉटलाच जास्ती ऐकल्याचे आठवते. शारजातली सिरीज परत पहावी लागेल खरोखर! >>> अनुमोदन !

वॉर्नने दिवसाच्या शेवटच्या बॉलला बसित अलीची दांडी उडवली तेव्हा रिचीची कॉमेंट.
You wouldn't believe it. He's done him between his legs!

https://www.youtube.com/watch?v=7-YQ6pNLrZ8

ग्लेन मॅकग्राथ २ रन्सवर आऊट झाल्यावरची एक अजरामर कॉमेंट
Glenn Mcgrath got out just 98 run short of the century!

फारएण्ड, मस्त लेख!!!!

क्रिकेट कॉमेंट्री ऐकावी तर रिची बेनाँ, जेफ्री बॉयकॉट आणि टोनी ग्रेग यांच्या कडूनच. समालोचन करत असताना क्रिकेटमधील बारकावे सुध्दा एवढ्या सोप्या शब्दांत आणि सहजरितीने उलगडवून दाखवायचे की कोणालाही सहज समजेल.

समालोचक म्हणून रिची नि:संशय ग्रेटच होता. पण एक लेग-स्पीनर म्हणून मी त्याला आधीं पाहिला असल्याने ती प्रतिमा माझ्या मनात अधिक खोलवर रुजली असावी. इतर लेग-स्पीनरपेक्षा त्याची अ‍ॅक्शन वेगळी होती ती त्याच्या असामान्य उंचीमुळे. पण त्याचा 'रन-अप' व 'डिलिव्हरी' इतकी सहजसुंदर व शैलीदार होती कीं मी त्याला ' मॅजेस्टीक लेगस्पीनर ' असंच म्हणायचो.
कर्णधार म्हणूनही मला तो खूप आवडायचा कारण मैदानावर त्याचं वावरणं नेहमीं मैत्रीपूर्णच वाटायचं. तो कर्णधार म्हणून इथं आला होता तेंव्हा त्याच्या संघात मेकीफ हा उदयोन्मुख पोरगेलासा वेगवान गोलंदाज होता. त्याला सुरवातीला लय सांपडत नव्हती तेंव्हा रिची प्रत्येक चेंडूच्या वेळीं मेकीफबरोबर त्याच्या खांद्यावर हात ठेवून 'रन-अप'च्या सुरवातीपर्यंत त्याच्याबरोब चालत जात असे. तो अतिशय धूर्त कर्णधारही होता हें तर सर्वश्रुत आहेच .
आज शेन वार्ननं त्याला वाहिलेल्या श्रद्धांजलीत रिचीनं आपल्याला मित्र मानलं याचा अभिमानाने उल्लेख करत रिची हा क्रिकेटमधला सच्चा 'जंटलमन' होता असंही म्हटलंय.
क्रिकेटमधल्या रिची बिनॉ सारख्यांमुळेच आपलं भावविश्वही श्रीमंत होत असतं.त्याना आदरपूर्वक श्रध्दांजली.

...

धन्यवाद लोकहो.

मै - ती मॅच पाहिली नसशील तर (हायलाईट्स) पाहाच. जबरी होती ती.
https://www.youtube.com/watch?v=KKWBnZHxkr8
https://www.youtube.com/watch?v=ItC_fubzf_Y
https://www.youtube.com/watch?v=M73QJVEcpZY

भाऊ - सुंदर पोस्ट!

मधुकर - हो ती बासित अली च्या विकेटवरची कॉमेण्ट आठवते. तेव्हा बहुधा हायलाईट्स मधे पाहिली होती, कदाचित तेव्हाच्या "प्राइम स्पोर्ट्स" वर.