गाजराची चटणी
Submitted by एम्बी on 21 December, 2011 - 07:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
भुंगा आणि बागुलबुवाच्या आमंत्रणाला मान देउन
*********************************
मुरांबा
कैरी आणि साखरेसारखे
भिन्न स्वभावाचे आपण
एकमेकांच्या आयुष्यात आलो
एकमेकांना संभाळत
कधी मनाला मुरड घालत
वर्षानुवर्षे एकत्र राहिलो
आता नाते इतके मुरल्यावर
खराब होण्याच्या भितीपोटी
वेगळी काळजी घेण्याची
गरजच उरली नाही!
*********************************
पापड
लग्नापुर्वी माझ्याच विचारात
सदैव मश्गुल तू
आता जेव्हा कायम
मला दुर्लक्षित करतोस
तेव्हा
प्रेमात पडल्यावर काय काय
पापड लाटले होते
ह्या आठवणीनेही
माझा तिळपापड होतो!
इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.