झट्पट -खंमग (शेगंदाण्याची) चटणी

Submitted by पियापेटी on 30 January, 2011 - 06:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी : शेंगदाण्याचा तयार कुट
१ चमचा : लाल तिखट् / मिर्ची पुड
१/२ चमचा : मिठ
२ चमचे : तेल
२-३ पकळ्या : लसुन

क्रमवार पाककृती: 

छोट्या कढईत /कडल्यात तेल गरम करायला ठेवायची,तोपर्यंत लसुन ठेचुन घ्यायचा.
शेंगदाण्याचा कुट्,तिखट्,मिठ एकत्र करुन ठेवायचा.गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा.
चटणी तयार!!

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
श्रीराम
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा>>>

अख्खा लसुण?

शेंगदाण्याची अशी चटणी करताना लाल तिखट जळते /करपते .त्याला उपाय?
<<<
गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.
मग गॅस बंद करावा.
मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा.
Happy

इंद्रा, तिने ठेचून घ्यायचा म्हणून लिहिले आहे ना ? नवशिक्यांसाठी बेसिक धडे घ्यायचा विचार करतोय !!>>

हे दिसलं च नाही.. करुन बघायला पाहीजे..

यात तेल प्रमाणाबाहेर घेउन केल्यास सहि लागते, तो कुट मस्त फसफसल्यासारखा होतो. डाएट कॉन्शस लोकांनी मात्र ट्राय करु नये.