टोमॅटो-कांदा चटणी

Submitted by सशल on 7 January, 2010 - 17:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टोमॅटो,
कांदे,
कढिपत्ता,
सुक्या लाल मिरच्या बिया काढून,
आलं
ओलं खोबरं
मीठ,
फोडणीसाठी मोहरी, हिंग, कढिपत्ता

क्रमवार पाककृती: 

तेल तापवून त्यात कांदा, लाल मिरची, कढिपत्ता, आलं, टोमॅटो हे क्रमाने घालून नीट परतून घ्यावं आणि थंड झाल्यावर ओल्या खोबर्‍याबरोबर वाटून घ्यावं ..

वरून मोहोरी, हिंग, कढिपत्त्याची फोडणी द्यावी .. झाली तयार चटणी ..

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

दाक्षिणात्य लोकांची कृति वेगळी असू शकेल .. ही recipe मी अंदाजाने केलेली आहे ..

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वरच्याच साहित्यात दाक्षिणात्य लोक फोडणीला त्यात भिजवलेली हरभरा डाळ टाकतात नाहीतर तेलातच उडीद डाळ टाकून लाल झाली की बाकी जिन्नस टाकतात. टोमॅटो आंबट नसतील तर थोडी चिंच पण टाकतात.
हि चटणी रवा डोस्याला आतून लावून पण यम्मी लागते.

मी आजच केली. खुपच छान लागते. मी नवीनच ग्रुप जाईन केला आहे. मला खुपच इन्फो मीलते.
आता रोज हा बाफ बघते स्वयन्पाकाच्या आधी.

माझ्या एक दाक्षिणात्य मैत्रिणीच्या टोमॅटो खोबरं चटणी कृतीमध्ये ती टोमॅटो गॅसवर(भरताच्या वांग्यासारखा) काळसर भाजुन, सालं काढुन, हिरवी मिरची पण भाजुन घालते. कांदा नाही घालत. छान लागते ती पण चटणी.