क्रॅनबेरीची चटणी

Submitted by लालू on 5 December, 2009 - 14:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५ कप क्रॅनबेरीज (शक्यतो ताज्या)
१ मोठे सफरचंद
१ कप लाल कांदा
१ कप बेदाणे
१ मोठा चमचा लसूण (ऐच्छिक)
१ मोठा चमचा आले
१ कप लाईट ब्राऊन शुगर, किंवा साधी साखर
पाव कप लिंबाचा रस
१ छोटा चमचा दालचिनी पूड (ऐच्छिक)
१ छोटा चमचा लवन्ग पूड (ऐच्छिक)
१ चमचा क्रश्ड रेड पेपर किंवा तिखट

क्रमवार पाककृती: 

क्रॅनबेरीज धुवून चॉपरमधून जरा छोटे तुकडे करुन घ्याव्यात. तसेच सफरचंद, कांदा, लसूण आले बारीक करुन घ्यावे.

सगळे साहित्य एकत्र करुन जाड बुडाच्या पातेल्यात घालून विस्तवावर ठेवून उकळवावे. १० मिनिटे लागतील.

मग १० -१५ मिनिटे आच कमी करुन सतत ढवळत मिश्रण दाटसर होईपर्यंत ठेवावे.

थंड झाल्यावर बाटलीत भरावे. फ्रीजमध्ये बरेच दिवस रहाते. १-२ दिवसांनी मुरल्यावर जास्त चांगले लागते. क्रॅनबेरीची चव बघून साखरेचे, सफरचंदाचे प्रमाण कमी जास्त करावे.

chutney.jpg

अधिक टिपा: 

लसूण नाही घातला तरी चालेल. लवन्ग-दालचिनी पूड मी नेहमी घालत नाही. लिंबाच्या रसाऐवजी ड्राय रेड वाईन घालता येते.

माहितीचा स्रोत: 
मॅगेझिन, बहुतेक 'वर्किन्ग मदर'
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे रेसिपी. कॅनबेरी तब्बेतीसाठी खूप चांगली असते असे ऐकून आहे पण आत्तापर्यंत कधीच खाल्लेली नाही. त्याच्या आत बी नसते का ? चवीला साधारण कशी असते ?

परवा आणलेली क्रॅनबेरी. चव आंबट तुरट अशी लागली खरतर नाही आवडली. जुईने खाउन टाकल्या उरलेल्या बेर्‍या...
बी असते कि नाही कळलच नाही मला अगदी छोट्या बिया असाव्यात.
चटणी इंटरेस्टींग दिसत्ये.

क्रॅनबेरीज (cranberries) म्हणजे ही फोटोतली चटणी आहे त्याच रंगाची करवंदाएवढी फळे असतात.

त्यांची चव आंबट - तुरटच असते. त्या नुसत्या खाताच येत नाहीत. Happy चटणी, लोणचं, सॉस, पाय असं काहीतरी करुन खायच्या. dried, sweetened मिळतात त्यांना craisins असं म्हणतात. त्या नुसत्या खायला चांगल्या लागतात.

ही चटणी चपातीबरोबर किंवा स्प्रेड म्हणून चांगली लागते.

रंग लै भारी. याचा हलवा करा ना. सायो म. बर्फी रेसीपी त घालून. या बेरीज चा ज्युस फार लोकप्रिय आहे ना उस्गावात?

ब्रेड चे छोटे चौकोनी तुकडे करायचे टोस्ट करून बटर लावून वर ही चट्णी घालायची. बाइट साइज स्नॅक. यम. यम. जिभल्या चाटणारी जाडी भावली.

हा घ्या फोटो .

cranberries.jpg

क्रॅनबेरीची ह्या कृतीने चटणी बनवायचे माझे तिसरे वर्षं . आमच्याकडे आत्ता यू.एस. च्या क्रॅनबेरीज मिळतात . सॉलिड मस्त लागते ही चटणी . थँक्स लालू ( शर्मिला लिहायची सवय अजून झाली नाही . Happy )

अय्या लालु म्हणजे शर्मिला होय.
लालु पण ही चटणी परत एकदा मिक्सरवर वाटायला लागणार नाही का? एकदा मिश्रण दाट झाले की?

अगो, अमृता सन ड्राइड क्रॅनबेरीज सॅलडमधे खूप मस्त लागतात. नुसत्या खायला पण छान लागतात.