भुंगा आणि बागुलबुवाच्या आमंत्रणाला मान देउन
*********************************
मुरांबा
कैरी आणि साखरेसारखे
भिन्न स्वभावाचे आपण
एकमेकांच्या आयुष्यात आलो
एकमेकांना संभाळत
कधी मनाला मुरड घालत
वर्षानुवर्षे एकत्र राहिलो
आता नाते इतके मुरल्यावर
खराब होण्याच्या भितीपोटी
वेगळी काळजी घेण्याची
गरजच उरली नाही!
*********************************
पापड
लग्नापुर्वी माझ्याच विचारात
सदैव मश्गुल तू
आता जेव्हा कायम
मला दुर्लक्षित करतोस
तेव्हा
प्रेमात पडल्यावर काय काय
पापड लाटले होते
ह्या आठवणीनेही
माझा तिळपापड होतो!
*********************************
चटणी
साधु महाराजांनी
दोघांना सुखी संसाराचे
कानमंत्र दिले
रोजची भांडणे संपली
आणि सुरुवात झाली
गोड गोड संसाराला
काही दिवसातच
कंटाळले दोघेही
वरवरच्या गुळचट पणाला
शेवटी न रहावुन
झालीच एकदाची भांडणे
आता कसे तृप्त तृप्त वाटतेय
गुळचट जेवणात खमंग
चटणीची चव काही ओरच!
*********************************
कोशिंबीर
प्रेम म्हणजे नक्की काय
सुख-दु:ख, आवड्-निवड
एकमेकांबरोबर शेअर करणे...
डोळ्यावर पट्टी बांधुन
फक्त मनाने
दुसर्याच्या मनाचा ठाव घेत
आंधळी कोशिंबीर खेळणे
मिसळलेल्या मनाच्या कोशिंबीरीवर
सहजीवनाची फोडणी
म्हणजेच खमंग आयुष्य!
>>>>>>>>>>>>>>>>>>>
भुंग्या हापिसात आल्यापासुन तासभर हेच खरडतेय... तुझ्या डाव्या बाजुच्या नादात माझी नोकरी गेली तर जेवणाचे ताट मिळणे मुश्कील
___________/\_____________
___________/\_____________
मार्क्सिस्ट कुठली
मार्क्सिस्ट कुठली
बयो
बयो गं,
तोडलस,
फोडलस,
चाबूक,
वगैरे सगळं...
आता भुंग्याच्याच घरी जेवायच आमंत्रण येईल बघ तुला
(No subject)
(No subject)
छान जमले !
छान जमले !
वर्षा अगदी सुटलीयस तू लई
वर्षा अगदी सुटलीयस तू लई भारी !
चला मग आता पुरणपोळी,
चला मग आता पुरणपोळी, पापड-पापडी-कुरडया, भजी, मसालेभात, वरण-भात, बटाट्याची भाजी यांचीच कमी आहे.
मजा आली कविता वाचताना, सोप्या
मजा आली कविता वाचताना, सोप्या शब्दात संपुर्ण जीवनाचं सार मांडलत !!
सहिच ! मस्तच !
वर्षे म हा न आ हे स _/\_
वर्षे म हा न आ हे स _/\_
कोशिंबीर सगळ्यात चविष्ट!!!
आता पंचपक्वान्न पण येऊ देत पुपो, श्रीखंड, गुजा, खीर आणि आमरस
<<< कोण म्हणतय रे सोमरस पण पाहिजे >>>>
वर्षामाय कहर आहेस तु अगदी.
वर्षामाय कहर आहेस तु अगदी. ___/\___. घरी एकदा वाचून दाखवच ह्या 'काकाक'. पोटातल्या कावळ्यांची गोची होईल.
खुप छान अमोल केळकर
खुप छान
अमोल केळकर
लय भारी..
लय भारी..
वर्षे माय! महान आहेस !!
वर्षे माय! महान आहेस !!
छान जमलीय डावी बाजू
छान जमलीय डावी बाजू
(No subject)
__/\__
__/\__
मस्तच... वर्षा नविन कविता आलि
मस्तच... वर्षा नविन कविता आलि की इतक्या लवकर कसे काय तुम्हि विडंबन तयार करता..??? सहिच..
वर्षे धन्य आहेस खरच !
वर्षे धन्य आहेस खरच !
अशक्य आहे वर्षाबाई!!
अशक्य आहे वर्षाबाई!!
(No subject)
अरे वाह केवढं चवदार काव्य...
अरे वाह केवढं चवदार काव्य...
आधी गुळाच झालं
मग पापड लाटालाटी
मग किसकिस चटणी
आणि कोशींबीरीची वाटणी
राहीली लोंणच्याची फोड
आता नुसती मारझोड...
सांडगे, दहीमिरच्या असं अजुन बरच बाकी आहे
आवडलं.
आवडलं.
सही....डावी बाजू अगदीच उजवी
सही....डावी बाजू अगदीच उजवी झाली आहे....
वर्षे, साष्टांग नमस्कार तुला
वर्षे, साष्टांग नमस्कार तुला
देवा... चला मग आता पुरणपोळी,
देवा...
चला मग आता पुरणपोळी, पापड-पापडी-कुरडया, भजी, मसालेभात, वरण-भात, बटाट्याची भाजी यांचीच कमी आहे
येऊद्या लवकत.. पाट पाणी घेऊन बसलेय..
आता पोळीपण आली आहे.... ती पण
आता पोळीपण आली आहे....
ती पण खा लोक्स!
http://www.maayboli.com/node/27277
धन्यवाद लोक्स बाकीचे पदार्थ
धन्यवाद लोक्स
बाकीचे पदार्थ पण आणलेत
http://www.maayboli.com/node/27286
हे मस्तय ग वर्षे..
हे मस्तय ग वर्षे.. निंबुडाला मोदक..
आता बाकीच्या पदार्थांकडे बघाय्ला पाहिजे..
भुंग्या हापिसात आल्यापासुन
भुंग्या हापिसात आल्यापासुन तासभर हेच खरडतेय... तुझ्या डाव्या बाजुच्या नादात माझी नोकरी गेली तर जेवणाचे ताट मिळणे मुश्कील
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
वर्षामाई...... विडंबनं करायला सुरुवात कर, संग्रह काढ..... तुझ्ह्या ताटाची सोय होईल आणि वर प्रसिध्दी सुध्दा मिळेल.
Pages