नविन वर्ष

नवीन वर्ष सुखात जाओ

Submitted by भागवत on 1 January, 2015 - 06:47

नवीन वर्षाचे स्वागत करायला शब्द सुचेना
मागील वर्षाचा आढावा घ्यायला वेळ पुरेना

जुने वर्ष सरले, नवीन वर्षाचा प्रारम्भ झाला
सूर्यास्ता नंतर आशेचा नवीन किरण उगवला

मागील वर्षी लावलेल्या रोपाचे आता वृक्ष होईल
मागील वर्षीच्या संकल्पांची आता पूर्तता होईल

नवे वर्ष, नवे-जुने संकल्प, नव्या जोमात
कार्यास सिद्धि लाभेल आता पुरी करण्यात

काही कार्य राहिल्यास करूया खुप जास्त परिश्रम
त्याआधी मौज-मस्ती, सेलिब्रेशन यांना देऊ अग्रक्रम

शब्दखुणा: 

२०१३ रिकॅप - फोटो आणि व्हिडीओ क्लिप

Submitted by तन्मय शेंडे on 1 January, 2014 - 11:07

आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शूभेच्छा !!

२०१३ हे वर्ष भरपूर सुंदर आठवणी देउन संपल. स्वप्नातल्या बर्याच जागांना भेटी देउन झाल्या यलोस्टोन, टीटान, ग्रॅन्ड कॅनीयन....
काही चांगली माणसं भेटली त्याच्याशी संवाद साधता आला, आणि बरचं काही.....

मागच्या वर्षी फोटोग्राफी छंद मी खूप एन्जॉय केला आणि येणार्या नविन वर्षात माझ्या छंदात प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

माझ्या २०१३ च्या काही खास आठवणी या छोट्या व्हिडीयो क्लीप मध्ये सामावल्या आहेत. फोटोवर किंवा लींक वर क्लिक HD व्हिडीयो बघता येईल.
रेकमेंडेड - HD फूल स्क्रीन व्ह्यू, क्लिपची वेळ : २ मिनीटे

नविन वर्षाचे स्वागत इकेबाना सोबत

Submitted by सावली on 31 December, 2010 - 11:43

जपान मधे नविन वर्षाच्या स्वागतासाठी घराघरांवर फुलापानांची सजावट करुन लावतात. घराच्या आत सुद्धा एका स्पेशल कोपर्‍यात, टेबलावर अशी सजावट करुन नविन वर्षाच स्वागत करण्याची प्रथा आहे. आता दरवाज्यावर लावण्यासाठी प्लॅस्टीकच्या पण हुबेहुब खर्‍यासारख्या दिसणार्‍या रचना विकतही मिळतात पण खरी सजावट काही वेगळीच. अशा घरामधे करणार्‍या सजावटीला इकेबाना असं नाव आहे.
म्हणुनच अशाच एका रचने द्वारे तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नविन वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नविन वर्ष