जपानी कला

ऑरिगाता- कागदी फुले-ज्वेलरी बॉक्स आणि फोटो फ्रेम.

Submitted by प्रज्ञा९ on 29 March, 2011 - 11:51

IMG_4619.JPGमी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!

यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्‍या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.

मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.

गुलमोहर: 

नविन वर्षाचे स्वागत इकेबाना सोबत

Submitted by सावली on 31 December, 2010 - 11:43

जपान मधे नविन वर्षाच्या स्वागतासाठी घराघरांवर फुलापानांची सजावट करुन लावतात. घराच्या आत सुद्धा एका स्पेशल कोपर्‍यात, टेबलावर अशी सजावट करुन नविन वर्षाच स्वागत करण्याची प्रथा आहे. आता दरवाज्यावर लावण्यासाठी प्लॅस्टीकच्या पण हुबेहुब खर्‍यासारख्या दिसणार्‍या रचना विकतही मिळतात पण खरी सजावट काही वेगळीच. अशा घरामधे करणार्‍या सजावटीला इकेबाना असं नाव आहे.
म्हणुनच अशाच एका रचने द्वारे तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नविन वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - जपानी कला